फोटो सौजन्य- सोशल मीडिया
इंडो-तिबेट बॉर्डर पोलिस फोर्स (ITBP) मध्ये नोकरी करण्याची सुवर्णसंधी. ITBP कडून सहाय्यक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल आणि कॉन्स्टेबल या गट ‘क’ (अराजपत्रित आणि अ-मंत्रालयीन) श्रेणीतील पदांसाठी रिक्त जागासंबंधी भरतीप्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. यासंबंधीची अर्ज प्रक्रिया सुरु झाले आहेत.
या भरतीप्रक्रियेमध्ये सहभागी होऊ इच्छिणारे उमेदवार ITBP itbpolice.nic.in च्या अधिकृत वेबसाइटद्वारे तात्काळ अर्ज करू शकतात. उमेदवारांना 26 नोव्हेंबरपर्यंत या अर्जप्रक्रियेकरिता अर्ज करता येईल. एकूण 9 पदांच्या 20 जागांसाठी ही भरतीप्रक्रिया सुरु आहे. या भरतीप्रक्रियेबद्दल अधिक जाणून घेऊया
ITBP मधील पदे आणि जागा
ITBP भरती वयोमर्यादा
या भरतीमध्ये अर्ज करण्यासाठी उमेदवारांचे वय किमान 18 ते 28 वर्षा दरम्यान असणे आवश्यक आहे. जाणून घेऊया विविध पदांकरिता असलेली वयोमर्यादा
ITBP अर्ज शुल्क
सामान्य, OBC आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत विभागातील (EWS) उमेदवारांसाठी अर्ज शुल्काची रक्कम ही 100 रुपये आहे. तर अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, महिला आणि माजी सैनिकांना या अर्ज शुल्कातून सूट देण्यात आली आहे.
ITBP भरती वेतन
या भरतीप्रक्रियेतून जे उमेदवार निवडण्यात येतील त्यांना शासनाच्या 7 व्या वेतन आयोगानुसार पे मॅट्रिक्स स्तर 3, 4 आणि 5 वर नियुक्त केले जाईल. या अंतर्गत वेतनश्रेणी खालीलप्रमाणे आहे.
हे देखील वाचा- देशातील ‘या’ शहरांमध्ये मिळतो सर्वाधिक पगार; कामासहित मोठी आर्थिक संधी
सूचना आणि अर्ज लिंक पहा
ITBP भर्ती 2024 अधिसूचना- https://recruitment.itbpolice.nic.in/rect/index.php या लिंकवर जाऊन होम पेजमध्येच न्यूज या कॉलममध्ये तुम्हाला या भरतीप्रक्रियेची पीडीएफ डाऊनलोड करता येऊ शकते.
ITBP भर्ती 2024 साठी अर्ज करण्यासाठी लिंक- https://www.itbpolice.nic.in/
ITBP निवड निकष
त्यामुळे या भरतीसाठी उमेदवारांनी तात्काळ अर्ज करणे अपेक्षित आहे.