Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 4 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

उष्णतेच्या लाटेमुळे दूध उत्पादनात मोठी घट; जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांसाठी नियमावली जाहीर

वाढत्या उष्म्याचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसण्याची भीती असून, जनावरांमध्ये उष्माघात, दूध उत्पादनातील घट आणि निर्जलीकरणासारख्या समस्या उद्भवू शकतात.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 01, 2026 | 01:50 PM
उष्णतेच्या लाटेमुळे दूध उत्पादनात मोठी घट; जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांसाठी नियमावली जाहीर

उष्णतेच्या लाटेमुळे दूध उत्पादनात मोठी घट; जिल्हा प्रशासनाकडून पशुपालकांसाठी नियमावली जाहीर

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात तापमानाचा पारा दिवसेंदिवस वाढत असून, आगामी काळात उष्णतेच्या तीव्र लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या वाढत्या उष्म्याचा सर्वाधिक फटका पशुधनाला बसण्याची भीती असून, जनावरांमध्ये उष्माघात, दूध उत्पादनातील घट आणि निर्जलीकरणासारख्या समस्या उद्भवू शकतात. या पार्श्वभूमीवर, पुणे जिल्हा प्रशासनाच्या पशुसंवर्धन विभागाने पशुपालकांसाठी विशेष मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या असून, पशुधनाचे संरक्षण करण्याचे आवाहन केले आहे.

कडक उन्हामुळे जनावरांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होतात. यामध्ये प्रामुख्याने जनावरांची भूक मंदावणे, शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे (निर्जलीकरण) आणि गंभीर परिस्थितीत मृत्यू ओढवण्याचा धोका असतो. दुभत्या जनावरांच्या दूध उत्पादनावरही याचा मोठा परिणाम दिसून येतो. हे टाळण्यासाठी पशुपालकांनी वैज्ञानिक पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे असल्याचे पशुसंवर्धन विभागाने म्हटले आहे.

पाणी आणि आहार व्यवस्थापन

उन्हाळ्यात जनावरांना दिवसभर मुबलक, स्वच्छ आणि थंड पाणी उपलब्ध करून देणे अनिवार्य आहे. पाण्याच्या टाक्या वेळोवेळी स्वच्छ कराव्यात आणि शक्य असल्यास पिण्याच्या पाण्यात इलेक्ट्रोलाईट किंवा खनिज मिश्रणांचा वापर करावा. आहाराच्या बाबतीत बदल करताना, दुपारी कडक उन्हात खाद्य देणे टाळावे. त्याऐवजी सकाळी लवकर किंवा सायंकाळी उशिरा हिरवा व पौष्टिक चारा द्यावा. आहारात मीठ आणि खनिज मिश्रणाचा संतुलित वापर करावा, जेणेकरून जनावरांची प्रतिकारशक्ती टिकून राहील.

गोठ्यातील वातावरण आणि थंडावा

जनावरांना थेट उन्हात बांधणे टाळावे. गोठ्यांवर शेडनेट, गवताचे आच्छादन किंवा ताडपत्रीचा वापर करून तापमान नियंत्रित ठेवावे. गोठ्यात हवा खेळती राहील याची काळजी घ्यावी. दुपारी उष्णतेची तीव्रता जास्त असताना जनावरांच्या अंगावर पाणी शिंपडावे किंवा गोठ्यात पंखे, फॉगर्सचा वापर करावा. विशेषतः म्हशींना पाण्यात बसण्याची सोय असल्यास ती फायदेशीर ठरेल.

वाहतुकीवर मर्यादा

उन्हाच्या तीव्रतेचा विचार करता, सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत जनावरांची कोणत्याही प्रकारची वाहतूक करू नये. बाजार, स्पर्धा किंवा लांब अंतराची ने-आण केवळ सकाळी किंवा संध्याकाळीच करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.

कुक्कुटपालनासाठी खबरदारी

पोल्ट्री व्यवसायालाही उन्हाचा मोठा तडाखा बसतो. त्यामुळे शेडमध्ये पुरेसे वायुवीजन ठेवावे, पक्षांना थंड पाणी द्यावे आणि शेडमध्ये पक्षांची गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी.

“उष्णतेच्या लाटेपासून पशुधनाचे संरक्षण करण्यासाठी पशुपालकांनी सतर्क राहणे आवश्यक आहे. जनावरांना धाप लागणे, जास्त लाळ येणे, सुस्ती येणे किंवा शरीराचे तापमान वाढणे अशी लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क साधावा.” — डॉ. विष्णू गर्जे, सहायक आयुक्त, पशुसंवर्धन विभाग

Web Title: Milk production is declining sharply due to heat wave in the state

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 01:50 PM

Topics:  

  • Farmers
  • maharashtra
  • Milk Production

संबंधित बातम्या

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा
1

Gondiya News: बिबट्याच्या हल्ल्यात शेतकरी जखमी! बिबिटोलातील घटना नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण, वनविभागाने लावला पिंजरा

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ
2

Bhandara News: भंडारा जिल्ह्यातील तरुण बांगलादेशातील कारागृहात; राष्ट्रीयत्व पडताळणीसाठी पोलिसांची धावपळ

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित
3

आमदार सुनील शेळके यांच्या प्रयत्नांना यश; आंध्र धरण पाणी प्रकल्पासाठी साडेतीन एकर जागा नगरपरिषदेला हस्तांतरित

Business Investment: यातही गुजरातने मारली बाजी? उद्योगांसाठी कोणतं राज्य सर्वोत्तम? सरकारकडून यादी, महाराष्ट्राचा कितवा नंबर?
4

Business Investment: यातही गुजरातने मारली बाजी? उद्योगांसाठी कोणतं राज्य सर्वोत्तम? सरकारकडून यादी, महाराष्ट्राचा कितवा नंबर?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.