Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Politics: सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

महायुतीने सहाही प्रभाग सभापतीपदे आपल्या खात्यात जमा केली असून भाजपला पाच तर शिवसेना (Eknath Shinde faction) ला एक सभापतीपद मिळाले आहे. ठाकरे गट आणि काँग्रेसने माघार घेतल्यामुळे निवडणूक एकतर्फी झाल्याचे चित्र दिसले.

  • By श्वेता झगडे
Updated On: May 01, 2026 | 04:31 PM
सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे; ठाकरे गट, काँग्रेसची माघार: भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती

Follow Us
Follow Us:
  • सहाही प्रभाग सभापतीपद महायुतीकडे
  • ठाकरे गट, काँग्रेसची माघार
  • भाजपचे पाच, शिंदे सेनेचा एक सभापती
नाशिक : महापालिकेच्या सहाही प्रभाग सभापतीपदावर महायुतीने आपले वर्चस्व राखले असून, पुर्व प्रभाग व नाशिकरोडच्या प्रभागासाठी अर्ज दाखल केरलेल्या काँग्रेसच्या नाझिया अत्तार व ठाकरे गटाच्या प्रमिला मैद या दोघांनीही सभागृहात माघार घेतल्याने बिनविरोध पार पडलेल्या या निवडणूकीत भाजपाचे पाच तर शिंदे सेनेचा एका सभापती विजयी झाला आहे. प्रभाग समितीच्या वर्चस्वामुळे सत्ताधारी गटाची पुन्हा एकदा सरशी झाली आहे.

“मिसिंग लिंक नव्हे, ही तर…”; नव्या मार्गिकेच्या उद्घाटनावेळी मुख्यमंत्र्यांचा जुन्या सरकारवर टोला, प्रवाशांची माफीही मागितली

बिनविरोध निवडीमुळे सत्ताधारी भाजप-शिंदे सेनेला मिळाले बळ

महापालिकेच्या सहा प्रभाग समिती सभापती पदाची निवडणूक गुरूवारी (दि. ३०) मनपाच्या स्थायी समिती सभागृहात घेण्यात आली. त्यासाठी मंगळवारी नामांकन दाखल करण्याच्या दिवशीच या निवडणूकीचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले होते. भाजपाने पंचवटी, नवीन नाशिक, सातपूर, पूर्व आणि पश्चिम या पाच प्रभागांसाठी उमेदवार दिले होते तर नाशिकरोडची जागा शिंदे सेनेसाठी सोडली होती. गुरुवारी अपर विभागीय आयुक्त अजय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली. सकाळी दहा वाजता पूर्व प्रभागाची बैठक घेण्यात आली. त्यात काँग्रेसच्या नाझिया अत्तार यांनी आपला अर्ज मागे घेतल्याने भाजपाच्या मंगला नन्नावरे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. तर त्यानंतर पश्चिम प्रभागाच्या बैठकीतही भाजपाचे सुरेश पाटील यांचा एकमेव अर्ज असल्याने त्यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषीत करण्यात आले. अशाच प्रकारे पंचवटी प्रभागासाठी रोहीणी पिंगळे, सिडकोत बाळकृष्ण शिरसाठ व सातपुरला समाधान देवरे यांचीही निवड करण्यात आली.

नाशिकरोडची उत्सुकता संपुष्टात

नाशिकरोड प्रभाग सभापतीपदासाठी भाजप-शिंदे गटाकडून रमेश धोंगडे यांनी उमेदवारी अर्ज भरला होता तर ठाकरे सेनेच्या प्रमीला मैद यांनीही अर्ज दाखल केला. या प्रभागची सदस्य संख्या २३ असून, त्यात भाजपचे नऊ, शिवसेनेचे चार तर उबाठाची १० इतकी सदस्य संख्या असल्याने ठाकरे गटाचे वर्चस्व दिसत असले तरी, भाजप-शिंदे सेनेचे तेरा सदस्य होते. त्यामुळे निवडणूक होते की काय असे वाटत असतांना प्रत्यक्षात सभागृहात ठाकरे सेनेच्या प्रमीला मैद यांनी माघार घेतली. त्यामुळे रमेश धोंगडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

तत्पूर्वी शिंदे सेनेचे उपमहापौर विलास शिंदे, गटनेते अजय बोरस्ते यांनी ठाकरे गटाचे गटनेते व नगरसेवकांची बैठक घेवून बिनविरोध निवडीसाठी चर्चा केली. त्यात सकारात्मक प्रतिसाद देण्यात आला. त्यानंतर सभागृहात मैद यांनी माघार घेतल्यानंतर योगेश गाडेकर व त्यांनी काढता पाय घेतला तर गटनेते केशव पोरजे हे सभागृहातच आले नाही. त्यामुळे वेगळीच चर्चा रंगली होती.

एक वर्षासाठी सर्वांना मिळणार संधी

प्रभाग सभापतीपदाचा कार्यकाळ एक वर्षांचा असून, महायुतीने सर्व सदस्यांना पाच वर्षे विभागून सत्तेची संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पहिल्या वर्षासाठी सभापतीपदासाठी नावे निश्चीत करतांना महायुतीत कोणतीही खळखळ झाली नाही. दोन्ही पक्षांकडून प्रत्येक वर्षी नवीन चेहऱ्याला संधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. स्थायी समितीसाठी देखील हाच नियम लागू होणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.

ठाण्यातही डबल डेकर बसची एंट्री! टीएमटी ताफ्यात ३०० नव्या बसेसची भर, प्रवाशांना मोठा दिलासा

Web Title: Mahayuti wins all ward chairman posts bjp 5 shinde sena 1 thackeray congress withdraw

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 04:31 PM

Topics:  

  • BJP
  • maharashtra
  • Maharashtra Politics
  • Mahayuti

संबंधित बातम्या

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक
1

MVA Meeting: ठाकरांचे ६ खासदार फुटल्याने खळबळ! महाविकास आघाडी कमालीची सावध; घेतली तातडीची मोठी बैठक

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट
2

Manisha Kayande : सोलापूर ITI मध्ये १५० मुलींच्या कथित धर्मांतरण छळाचा आरोप; विधान परिषदेत डॉ. मनीषा कायंदे यांचा गौप्यस्फोट

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल
3

Alibaug News : हलगर्जीपणाचा फटका! अपूर्ण पुलामुळे देहेन गावाचा संपर्क तुटला, ग्रामस्थ आणि शाळकरी विद्यार्थ्यांचे हाल

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार
4

RTO Employees Strike : आरटीओ कर्मचाऱ्यांचा बेमुदत संप अखेर मागे; राज्यातील परिवहन विभागाचे कामकाज पूर्ववत सुरू होणार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.