
इंग्रजी नवोपक्रम अभ्यासक्रमाला विद्यार्थ्यांचा प्रतिसाद
बालभारती अभ्यासमंडळ सदस्य संतोष नाटीकर हे जिल्हा परिषदशाळा खाड्याचा पाडा येथील उपक्रमशील शिक्षक काम पाहतात. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास साधण्यासाठी संभाषण कौशल्याचे महत्व असाधारण आहे. इंग्रजी भाषा बोलण्या संबंधी एक रामबाण उपक्रम म्हणजे झटपट बोलूया इंग्रजीत असा हा उपक्रम आहे. कर्जत तालुक्यातील खाड्याचापाडा येथील शाळेवर कार्यरत शिक्षक संतोष नाटीकर यांचा हा उपक्रम सध्या कर्जत तालुक्यातील अनेक अनेक शाळांमध्ये विद्यार्थ्यांचे आकर्षण बनला आहे.
मुलांनी आकलन पूर्वक अस्खलित इंग्रजी बोलावे यासाठी 20-60 दिवसाचा हा उपक्रम अनेक शाळांमध्ये यशस्वी ठरलेला दिसतो आहे.इंग्रजी भाषेवर प्रभुत्व मिळवन्यासाठी असे उपक्रम शाळांमध्ये राबवणे गरजेचे आहे. या बाबत पंचायत समिती कर्जत चे गटशिक्षणाधिकारी अनंत खैरे यांनी या नवोपक्रमास शुभेच्छा दिल्या आहेत.भविष्यात हा उपक्रम विद्यार्थ्यांना प्रेरणादायी व इंग्रजी विषयाचे ज्ञान वाढण्यास मदत करणारा ठरणार असून संतोष नाटीकर यांनी आजपर्यंत अनेक शाळांमध्ये तज्ञ मार्गदर्शक म्हणून मार्गदर्शन केले आहे.
इंग्रजी विषय अभ्यासमंडळ सदस्य संतोष नाटीकर यांनी आपल्या इंग्रजी विषयाच्या ज्ञानाचा फायदा सर्वसामान्य व तळागाळातील विद्यार्थ्यांना व्हावा यासाठी एक नवोपक्रम राबविला आहे, या उपक्रमामुळे वाडीवस्तीवरील, गाव खेड्यातील, तांडा, पाडद्यावरील विद्यार्थ्यांना खूप फायदा झाल्याचं सिद्ध झाले असून, विद्यार्थ्यांना इंग्रजी विषयाची भीती दूर होण्यास मदत झाली असून, त्यांचा आत्मविश्वास वाढला आहे,संपूर्ण राज्यभरातील विद्यार्थ्यांनी व्हिडिओ च्या माध्यमातून आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या असून आम्हाला या नवोपक्रमाचा खूप फायदा झाल्याचे सांगितले.
इंग्रजी शिकवण्याच्या किंवा शिकण्याच्या पद्धतीत नवीन, सुधारित आणि प्रभावी तंत्र वापरणे, जसे की तंत्रज्ञानाचा वापर करून (पॉवरपॉइंट, पॉडकास्ट, वेब), विद्यार्थ्यांचा सहभाग वाढवणे किंवा त्यांच्या गरजांनुसार अभ्यासक्रम तयार करणे, ज्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये इंग्रजीची आवड निर्माण होऊन त्यांची कौशल्ये सुधारतात. यासाठी पारंपरिक पद्धतींऐवजी नाविन्यपूर्ण कल्पनांचा वापर केला जातो, जेणेकरून इंग्रजी भाषेतील संवाद आणि आकलन क्षमता वाढते, जे जागतिक स्तरावर महत्त्वाचे आहे.