Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 13 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Study in Germany: कमी खर्चात आंतरराष्ट्रीय शिक्षण! जर्मनीतील विद्यापीठांमध्ये प्रवेशासाठी ‘या’ परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य

Study in Germany cost and admission guide 2026: सुमारे ६० हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. जर्मनीतील नामांकित विद्यापीठांमध्ये प्रवेश मिळवण्यासाठी कोणत्या परीक्षा आणि कोणती कागदपत्रे आवश्यक आहेत, याची संपूर्ण माहिती वाचा.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 13, 2026 | 03:51 PM
JERMANY

JERMANY

Follow Us
Follow Us:

Study in Germany admission guide: प्रत्येकाची इच्छा असते की आपले उच्च शिक्षण एका चांगल्या आणि नामांकित विद्यापीठातून व्हावे, ज्यासाठी अनेक जण भारताबाहेर जाऊन शिक्षण घेण्याचा विचार करतात. परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासोबतच, जिथे त्यांना कमी खर्चात दर्जेदार शिक्षण मिळू शकेल अशा ठिकाणी ते प्रवेश घेतात. सहसा भारतीय विद्यार्थी अमेरिका, ऑस्ट्रेलिया, युरोप, जपान यांसारख्या देशांमध्ये जाऊन शिक्षण घेण्यास पसंती देतात. मात्र, काही विद्यार्थी असेही आहेत, जे परवडणाऱ्या शिक्षणासाठी जर्मनीला जाण्यास प्राधान्य देतात.

गेल्या काही वर्षांत जर्मनीला जाणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, सुमारे ६० हजार भारतीय विद्यार्थी जर्मनीमध्ये उच्च शिक्षण घेत आहेत. जर तुम्हीही जर्मनीला जाण्याचा विचार करत असाल, तर तिथे प्रवेश मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे आणि कोणत्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे, हे जाणून घेणे अत्यंत गरजेचे आहे.

जर्मनीमध्ये शिक्षणासाठी कोणत्या परीक्षा देणे आवश्यक आहे?

IELTS / TOEFL: परदेशात जाऊन शिक्षण घेण्यासाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान तपासणारी ‘IELTS’ किंवा ‘TOEFL’ ही परीक्षा उत्तीर्ण करावी लागते. या दोन्हीपैकी कोणतीही एक परीक्षा पास असणे आवश्यक आहे.

TestDaF / DSH: साहजिकच जर तुम्हाला जर्मनीला जायचे असेल, तर तुम्हाला तिथल्या भाषेचे किती ज्ञान आहे हे देखील पाहिले जाते. म्हणूनच ‘TestDaF’ किंवा ‘DSH’ ही जर्मन भाषा परीक्षा द्यावी लागते, ज्यामध्ये उत्तीर्ण होणे अनिवार्य आहे.

TestAS: जर तुम्हाला जर्मनीमध्ये अंडरग्रेजुएट अभ्यासक्रमासाठी प्रवेश घ्यायचा असेल, तर तेथील काही विद्यापीठे ‘TestAS’ परीक्षा देण्यास सांगतात, जी उत्तीर्ण होणे आवश्यक असते.

ONGC Recruitment 2026: ओएनजीसीमध्ये इंजिनिअर्ससाठी सुवर्णसंधी! दरमहा मिळणार ७० हजारांपेक्षा जास्त पगार

JEE Advanced: जर तुम्ही जर्मनीमध्ये टेक्निकल बॅचलर प्रोग्रामसाठी अर्ज करत असाल, तर काही विद्यापीठांकडून ‘आयआयटी-जेईई ॲडव्हान्स’  स्कोरची मागणी केली जाते.

GRE: जर्मनीमध्ये जर तुम्हाला सायन्स, टेक्नॉलॉजी, इंजिनिअरिंग आणि मॅथ्स या क्षेत्रांशी संबंधित मास्टर कोर्स करायचा असेल, तर ‘GRE’ परीक्षा देणे गरजेचे आहे.

GMAT: येथे जर तुम्हाला एमबीए (MBA) किंवा मॅनेजमेंटशी संबंधित मास्टर डिग्री घ्यायची असेल, तर ‘GMAT’ परीक्षा देणे आवश्यक आहे.

DMAT: जर्मनीमधील काही मास्टर कोर्सेससाठी डिजिटल मास्टर असेसमेंट टेस्ट देणे आवश्यक असते, जी तिथल्या अत्यंत महत्त्वाच्या परीक्षांपैकी एक मानली जाते.

CBSE Free Online Courses: विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! सीबीएसईने सुरू केले ‘हे’ मोफत ऑनलाईन कोर्सेस; पालकही घेऊ शकतात प्रवेश

‘APS’ प्रमाणपत्र आहे अत्यंत महत्त्वाचे

भारतीय विद्यार्थ्यांनी एका गोष्टीची विशेष नोंद घेतली पाहिजे की, जर्मनीच्या स्टुडंट व्हिसासाठी अर्ज करण्यापूर्वी सर्वात जास्त महत्त्वाचे म्हणजे तुमच्याकडे APS प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे. ‘ॲकॅडमिक इव्हॅल्युएशन सेंटर सर्टिफिकेट’ ही कोणतीही प्रवेश परीक्षा नाही, तर जर्मन दूतावासाकडून तुमच्या शैक्षणिक कागदपत्रांची आणि रेकॉर्ड्सची पडताळणी केल्याचा तो एक पुरावा असतो. स्टुडंट व्हिसा अर्ज प्रक्रियेसाठी हे एक मुख्य आणि अनिवार्य दस्तऐवज (डॉक्युमेंट) मानले जाते. हे प्रमाणपत्र मिळण्यासाठी साधारणपणे ४ ते ८ आठवड्यांचा काळ लागू शकतो.

Web Title: Study in germany indian students exams eligibility aps certificate visa process

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 13, 2026 | 03:51 PM

Topics:  

  • Admission Process
  • Germany
  • Student
  • study

संबंधित बातम्या

Study in India: भारताच्या उच्च शिक्षणाची जगात क्रेझ! ‘या’ राज्याला मिळतीये विद्यार्थ्यांची पहिली पसंती
1

Study in India: भारताच्या उच्च शिक्षणाची जगात क्रेझ! ‘या’ राज्याला मिळतीये विद्यार्थ्यांची पहिली पसंती

Indian Students Returning From Abroad: परदेशातील शिक्षणाची क्रेझ ओसरली? ‘या’ कारणामुळे दोन वर्षांत तब्बल ३१% विद्यार्थी घटले!
2

Indian Students Returning From Abroad: परदेशातील शिक्षणाची क्रेझ ओसरली? ‘या’ कारणामुळे दोन वर्षांत तब्बल ३१% विद्यार्थी घटले!

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने
3

CBSE 10th Result 2026: दुसऱ्या बोर्ड परीक्षेच्या निकालाला उशीर; ११ वीच्या प्रवेशाबाबत विद्यार्थ्यांसमोर ‘ही’ ३ मोठी आव्हाने

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!
4

Study in New Zealand: न्यूझीलंड स्टुडंट व्हिसा नियमांत मोठा बदल; अर्ज करताना ‘ही’ चूक केल्यास विद्यार्थ्यांचे नुकसान शक्य!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.