फोटो सौजन्य- सोशल मीडिया
ONGC Recruitment 2026 official notification: सार्वजनिक क्षेत्रातील नवरत्न कंपनी ‘ऑईल अँड नॅचरल गॅस कॉर्पोरेशन’ने ग्रॅज्युएट ट्रेनी पदांसाठी भरती जाहीर केली आहे. कंपनीने या भरतीची संक्षिप्त अधिसूचना (शॉर्ट नोटिफिकेशन) आपल्या अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केली आहे. ही भरती अभियांत्रिकी आणि भूविज्ञान विषयातील ग्रॅज्युएट ट्रेनीची पदे भरण्यासाठी केली जात आहे. भारतातील प्रमुख ऑईल आणि गॅस कंपनीसोबत करिअर करू इच्छिणाऱ्या पात्र उमेदवारांनी सविस्तर अधिसूचना जारी झाल्यानंतर नक्की अर्ज करावा.
ओएनजीसीच्या या भरतीची सविस्तर नोटिफिकेशन १७ जुलै रोजी जारी केली जाईल. याच दिवसापासून ऑनलाईन अर्ज प्रक्रिया देखील सुरू होणार आहे. पात्र उमेदवार ओएनजीसीच्या ongcindia.com या अधिकृत वेबसाइटवर जाऊन अर्ज करू शकतात.
ग्रॅज्युएट ट्रेनी (इंजिनिअरिंग): उमेदवारांकडे संबंधित शाखेतील बी.ई. किंवा बी.टेक पदवी असणे आवश्यक आहे. यामध्ये सामान्य, ईडब्ल्यूएस आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना किमान ६०% गुण (किंवा समतुल्य CGPA) असणे अनिवार्य आहे.
ग्रॅज्युएट ट्रेनी (जियोलॉजिस्ट): या पदासाठी उमेदवारांनी जिओलॉजी विषयामध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजेच एम.एससी. (MSc) किंवा एम.टेक (MTech) केलेले असावे किंवा अधिसूचनेत ठरवून दिलेली समतुल्य पदवी असावी.
ओएनजीसीच्या या ग्रॅज्युएट ट्रेनी भरतीसाठी उमेदवारांनी GATE 2026 परीक्षा उत्तीर्ण केलेली असणे आवश्यक आहे. अंतिम निवडीसाठी ‘गेट’ स्कोरसोबतच (GATE Score) भरती प्रक्रियेतील इतर ठरवून दिलेले टप्पे पार करावे लागतील.
सामान्य प्रवर्गासाठी कमाल ३० वर्षे वयोमर्यादा निश्चित करण्यात आली आहे तर ओबीसी,एससी, एसटी आणि दिव्यांग उमेदवरांसाठी सरकारी नियमानुसार सुट देण्यात आली आहे.
ओएनजीसीमध्ये ग्रॅज्युएट ट्रेनी पदावर निवड झालेल्या उमेदवारांना E1 ग्रेडनुसार पगार दिला जाईल. सुरुवातीचा इन-हँड पगार पोस्टिंग आणि भत्त्यांनुसार दरमहा साधारणपणे ७०,००० ते ९०,०००+ रुपयांपर्यंत असू शकतो. वार्षिक सीटीसी (CTC) सुमारे २० ते २५ लाख रुपयांपर्यंत पोहोचतो; ज्यामध्ये बेसिक पे (मूळ पगार), आयडीए (IDA), एचआरए (HRA) किंवा कंपनीचे निवासस्थान, परफॉर्मन्स रिलेटेड पे (PRP) आणि इतर वैद्यकीय व कल्याणकारी सुविधांचा समावेश असतो.






