Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Success Story: एका माजी शिक्षिकेने मुलासोबत कसे उभारले १५ कोटींचे साम्राज्य? जाणून घ्या एका क्लिकवर..

Thekua success story news : माजी शिक्षिका वीणा देवी आणि मुलगा समीर यांनी बेंगळुरूमध्ये 'मॉम्स मेड' ब्रँड सुरू करून १५ कोटींची कंपनी उभी केली. घरातून सुरू झालेल्या या यशस्वी प्रवासाची यशोगाथा सविस्तर वाचा..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jul 28, 2026 | 02:17 PM
moms brand

moms brand

Follow Us
Follow Us:

Success Story: बिहारचा प्रसिद्ध पारंपारिक गोड पदार्थ ‘ठेकुआ’ (Thekua) संपूर्ण देशभरात पोहोचवणारी एका आई-मुलाची कहाणी आज हजारो लोकांसाठी मोठी प्रेरणा ठरली आहे. एकेकाळी केवळ घराच्या स्वयंपाकघरापुरता मर्यादित असलेला ‘ठेकुआ’ आता एका मोठ्या ब्रँडचा भाग बनला आहे. बिहारमधील एका माजी शिक्षिका वीणा देवी यांनी त्यांचा मुलगा समीर याच्यासोबत घरूनच एक छोटेसे काम सुरू केले होते, ज्याचे रूपांतर आज करोडो रुपयांच्या व्यवसायात झाले आहे. त्यांची कंपनी आता दररोज हजारो ग्राहकांपर्यंत पारंपारिक स्नॅक्स पोहोचवत आहे. चला तर मग जाणून घेऊया या आई-मुलाच्या जोडीने ही कमाल कशी केली आणि ठेकुआ विकून १५ कोटींचा बिझनेस कसा उभा केला.

घरातूनच सुरू केले ‘अपना किचन’

वीणा देवी १५ वर्षे शाळेत शिक्षिका म्हणून काम केल्यानंतर त्यांचा मुलगा समीर याच्यासोबत बेंगळुरू येथे आल्या. नवीन शहरात आल्यानंतर शांत बसणे त्यांना कठीण वाटू लागले. याच काळात त्यांनी त्यांच्या हाऊसिंग सोसायटीमध्ये अनेक महिलांना घरातूनच ‘फूड बिझनेस’ चालवताना पाहिले. यापासून प्रेरित होऊन त्यांनीही स्वतःचे ‘होम किचन’ सुरू करण्याचा निर्णय घेतला.

वीणा देवी यांनी ‘अपना किचन’ नावाने काम सुरू केले आणि सर्वात आधी नमकीन ठेकुआ, गोड ठेकुआ आणि दाल भुजा यांसारखे पारंपारिक पदार्थ बनवण्यास सुरुवात केली.

IIM मध्ये प्रवेश घ्यायचाय? CAT 2026 परीक्षेची तारीख अन् पात्रता जाहीर; कुठे अन् कसा कराल अर्ज? जाणून घ्या

सुरुवातीला त्यांना मोजकेच ऑर्डर्स मिळत असत, परंतु व्यवसायात खरा बदल तेव्हा आला जेव्हा त्यांचा मुलगा समीर याने छठ पूजेमध्ये बनवला जाणारा गुळाचा ठेकुआ तयार करण्याचा सल्ला दिला. गुळापासून बनवलेला ठेकुआ लोकांना इतका आवडला की, जिथे रोज १० ते ५० ऑर्डर्स मिळत होत्या, तिथे काही काळातच हा आकडा १०० च्या पार गेला. वाढत्या मागणीसोबत त्यांचा व्यवसाय सतत पुढे जात राहिला.

आज रोज पूर्ण होतात १,००० हून अधिक ऑर्डर्स

काळाच्या ओघात वीणा देवींचे हे छोटेसे होम किचन ‘मॉम्स मेड’ (Mom’s Made) नावाच्या स्नॅक्स ब्रँडमध्ये बदलले. आता ही कंपनी दररोज १,००० हून अधिक ऑर्डर्स पूर्ण करते आणि त्यांचे वार्षिक उत्पन्न सुमारे १५ कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते.

हा ब्रँड केवळ ठेकुआच नाही, तर निमकी आणि चना डाळ यांसारखे पारंपारिक स्नॅक्सही ग्राहकांपर्यंत पोहोचवत आहे. या उत्पादनांच्या माध्यमातून विविध राज्यांतील पारंपारिक चव देशभरातील लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला जात आहे.

Harsh Dubey NEET Controversy: कोण आहे हर्ष दुबे? ज्याच्या एका वक्तव्यानंतर सोशल मीडियावर पेटले ‘Reservation Hatao Andolan’!

५० महिलांना मिळाला रोजगार

व्यवसाय वाढण्यासोबतच रोजगाराच्या संधीही वाढल्या आहेत. सध्या कंपनीत सुमारे ५० महिला काम करत आहेत, ज्या स्नॅक्स बनवणे आणि त्यांच्या पॅकेजिंगचे काम सांभाळतात. अशा प्रकारे हा व्यवसाय केवळ एका कुटुंबाच्या यशापुरता मर्यादित राहिला नाही, तर अनेक महिलांच्या उपजीविकेचे साधन बनला आहे.

Web Title: Success story veena devi moms made thekua business 15 crore

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 28, 2026 | 02:17 PM

Topics:  

  • Business
  • education
  • Teacher

संबंधित बातम्या

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!
1

UGC NET 2026 : नॅशनल टेस्टिंग एजन्सीकडून उत्तरतालिका रिलीज, अशी तपासा रेकॉर्डेड रिस्पॉन्स शीट!

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?
2

History of 9-to-5 Job : ९ ते ५ ची नोकरी आणि शाळांचा इतिहास; हा पॅटर्न नेमका कसा तयार झाला?

Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!
3

Parbhani Medical College: डॉ. विश्वजित पवार यांच्याकडे परभणी वैद्यकीय महाविद्यालयाचा अधिष्ठातापदाचा अतिरिक्त कार्यभार!

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज
4

AI College : भारतीय वंशाच्या दांपत्याची कमाल! त्यांच्या दानत्वातून उभे राहणार नवीन AI कॉलेज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.