Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra : समायोजन प्रक्रियेला स्थगिती द्या! प्रहार संघटनेची शिक्षणमंत्र्याकडे मागणी

राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची समस्या गंभीर असून त्रुटीपूर्ण संचमान्यतेमुळे समायोजन प्रक्रिया अडकली आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Nov 29, 2025 | 03:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Close
Follow Us:
  • १०–१२ हजार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन अशक्य
  • क्रिया स्थगित करून प्रथम पदोन्नती राबवावी
  • प्रहार संघटनेचा आरोप!
राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर बनत असून, उपलब्ध रिक्त पदांअभावी या शिक्षकांचे समायोजन अडकले आहे. अशा स्थितीत सुरू असलेली समायोजन प्रक्रिया थांबवावी, अशी ठाम मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेने शिक्षणमंत्री दादा भुसे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

शिक्षण संचालनालय, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक, पुणे यांनी २० नोव्हेंबर रोजी काढलेल्या आदेशानुसार शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मधील संचमान्यतेनुसार अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन ५ डिसेंबरपूर्वी पूर्ण करणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र सदर संचमान्यता त्रुटीपूर्ण असून, त्याविरोधातील नाराजी शिक्षकांमध्ये वाढत आहे.

चित्रकलेत विद्यार्थ्यांचे विशेष रस! परीक्षेत उमेदवारांची वाढ तर निकाल लवकरच…

त्रुटींचे निरसन न होताच प्रक्रिया सुरू

राज्यातील अनेक शाळांनी २०२४-२५ च्या संचमान्यतेत भौतिक सुविधांमध्ये, विद्यार्थ्यांच्या आकडेवारीत आणि तांत्रिक बाबींमध्ये मोठ्या त्रुटी असल्याची तक्रार केली आहे. मात्र संबंधित त्रुटींचे निरसन न झाल्याने अनेक शाळांची संचमान्यता चुकीच्या पद्धतीने जाहीर झाल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. याशिवाय, शासनाने दहा पटाखालील विद्यार्थ्यांची संख्या असलेल्या शाळांचे जवळच्या शाळांमध्ये एकत्रीकरण सुरू केले आहे. त्यामुळे शिक्षक संख्या, विद्यार्थी संख्या आणि पदनिर्मिती यातील गोंधळ आणखी वाढला आहे.

१२ हजार शिक्षक अतिरिक्त, जागाच उपलब्ध नाही

राज्यात सध्या अंदाजे १० ते १२ हजार शिक्षक अतिरिक्त ठरत आहेत. मात्र बहुतेक जिल्ह्यांमध्ये जिल्हा परिषदांच्या अधीन रिक्त जागाच उपलब्ध नसल्याने त्यांचे समायोजन करणे अशक्य झाले आहे. या पार्श्वभूमीवर प्रहार संघटनेने मागणी केली आहे की, तातडीने पदोन्नती प्रक्रिया राबवून नवीन रिक्त जागा निर्माण कराव्यात, ज्यामुळे अतिरिक्त शिक्षकांना सामावून घेता येईल.

आधार वैधता नसलेल्या विद्यार्थ्यांची गणना होत नाही

अनेक शाळांमध्ये आधार क्रमांक नसलेले किंवा आधार वैधता थांबलेले विद्यार्थी आहेत. विद्यार्थी रोज शाळेत उपस्थित असला तरी आधार वैधता नसल्याने त्याची गणना संचमान्यतेत होत नाही. त्यामुळे शिक्षकांचे पद कमी दाखवले जात आहे आणि शिक्षकांची कमतरता कृत्रिमरीत्या वाढत आहे. शिवाय, २०२५ मधील शिक्षकांच्या ऑनलाइन बदली प्रक्रियेतही मोठ्या प्रमाणावर अनियमितता झाल्याचा आरोप संघटनेने केला आहे.

प्रशिक्षणाच्या दुसऱ्या दिवशी स्व-संरक्षण प्रशिक्षणास विद्यार्थिंनींचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

पदोन्नती प्रक्रिया तातडीने राबवण्याची मागणी

सध्याची समायोजन प्रक्रिया स्थगित करून प्रथम राज्यभर मुख्याध्यापक, प्राथमिक पदवीधर, केंद्रप्रमुख आणि शिक्षण विस्तार अधिकारी अशा पदांची पदोन्नती प्रक्रिया पूर्ण करावी, आणि त्यानंतरच अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन करावे, अशी भूमिका संघटनेने मांडली आहे. ही मागणी प्रहार शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे राज्य अध्यक्ष संतोष राजगुरू, वरिष्ठ पदाधिकारी संजय हेरकर व अमोल तोंडे यांनी शिक्षणमंत्री दादा भुसे यांना निवेदनाद्वारे केली आहे.

Web Title: Suspend the adjustment process prahar organizations demand to the education minister

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 29, 2025 | 03:56 PM

Topics:  

  • Career
  • maharshtra

संबंधित बातम्या

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती
1

भारतीय वायू दलात नोकरीची संधी! IAF कडून जाहीर करण्यात आली अधिसूचना; अग्निवीर भरती

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन
2

Amaravati News : विद्यार्थ्यांना मोबाइलपासून दूर ठेवणे गरजेचे… भविष्यासाठी नीता मुंधडा यांचे आवाहन

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ
3

शालांत परीक्षांचे ८,५०० केंद्र सज्ज! परीक्षक, साहित्य व मदतनीसांच्या मानधनात भरीव वाढ

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज
4

Indian Insurance Institute: रिटायर्ड उमेदवारांसाठी संधी! भारतीय विमा संस्थांनामध्ये करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.