रील्सचा नाद सोडा, वाचनाची सवय लावा! १५ मिनिटांच्या वाचनासाठी मिळणार व्हर्च्युअल कॉइन्स, कसं ते जाणून घ्या...
या उपक्रमांतर्गत सहभागी व्यक्तीला दररोज किमान १५ मिनिटे पुस्तक किंवा दीर्घ स्वरूपातील मजकूर वाचण्यास प्रोत्साहित केले जाते. वाचन पूर्ण झाल्यानंतर संबंधित रीडिंग अॅक्टिव्हिटीची ऑनलाइन नोंद करावी लागते. यासाठी वाचकांना व्हर्च्युअल कॉइन्ससारखे रिवॉर्ड मिळतात. प्रत्येक पात्र १५ मिनिटांच्या रीडिंग सेशनसाठी २० व्हर्च्युअल कॉइन्स मिळतात आणि एका दिवसात एक सेशन पात्र ठरते.
शिक्षणाचा बाजार! अनुदान मिळूनही जास्तीची फी? पुणे विभागातील शाळांना शिक्षण उपसंचालकांचा दणका!
दररोज २० कॉइन्सप्रमाणे ५० दिवस वाचन केल्यास एकूण १,००० व्हर्च्युअल कॉइन्स जमा होतात. १,००० कॉइन्सचे मूल्य १ सिंगापूर डॉलर इतके आहे. म्हणजेच हा उपक्रम मोठी कमाई करण्यापेक्षा नियमित वाचनासाठी छोट्या प्रोत्साहनावर भर देतो.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील रील्स, शॉर्ट्स आणि इतर काही सेकंद किंवा मिनिटांच्या कंटेंटचा वापर वाढला आहे. अशा परिस्थितीत पुस्तक, संशोधनपर लेख किंवा अन्य दीर्घ मजकूर सलग वाचण्यासाठी लागणारा वेळ कमी होत असल्याची चिंता व्यक्त केली जाते.
ReadSG च्या माध्यमातून नागरिकांना पुन्हा दीर्घ स्वरूपातील मजकुराकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न आहे. NLB च्या भूमिकेनुसार सखोल वाचन हे एकाग्रता, चिकित्सक विचार आणि कल्पनाशक्तीला चालना देण्यास उपयुक्त ठरू शकते.
या उपक्रमाकडे ‘१५ मिनिटे वाचा आणि पैसे कमवा’ एवढ्यापुरते पाहणे दिशाभूल करणारे ठरू शकते. रिवॉर्ड हा वाचनासाठी प्रोत्साहनाचा भाग आहे; नियमित वाचनाची सवय निर्माण करणे हा उपक्रमाचा मुख्य हेतू आहे.
सिंगापूरमधील वाचनाच्या सवयींबाबतच्या अभ्यासांमध्ये डिजिटल आणि शॉर्ट-फॉर्म कंटेंटकडे वाढणारा कल अधोरेखित करण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर पुस्तकांसह दीर्घ स्वरूपातील मजकूर वाचण्यास नागरिकांना प्रोत्साहन देण्यावर NLB भर देत आहे.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा मोठा निर्णय; परीक्षा केंद्रांचे लेखापरीक्षण होणार






