Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 1 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

TCS कडून कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! आता कोणाचाही Job जाणार नाही; नोकरकपात थांबवली, पगारातही होणार मोठी वाढ?

Salary Increment Cycleकडे परतत आहे. ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे, जे गेल्या काही काळापासून वेतनवाढ आणि नोकरीच्या सुरक्षिततेबाबत अनिश्चिततेचा सामना करत होते. नेमका काय घेतला निर्णय? सविस्तर समजून घेऊया

  • By Ankita Karangutkar
Updated On: Apr 17, 2026 | 03:16 PM
(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य: सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:
  • कर्मचारी कपातीचा म्हणजे Layoffs टप्पा आता संपुष्टात
  • CEO चा सकारात्मक दृष्टिकोन आणि AI चा वाढता प्रभाव
  • नाशिकमधील वादामुळे आव्हानांमध्ये वाढ
TCS Layoffs End : IT क्षेत्रातील दिग्गज कंपनी ‘टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस’ म्हणजेच TCS ने लाखो कर्मचाऱ्यांना कामावरुन काढणार असल्याची बातमी समोर आली होती. त्यामुळे कर्मचारी वर्गामध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं होतं. पण आता हळूच फुंकर मारणारी आनंदाची बातमी समोर आली आहे. त्यामुळे लाखो कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. कंपनीने स्पष्ट केले आहे की, कर्मचारी कपातीचा म्हणजे Layoffs टप्पा आता संपुष्टात आला आहे. कठोर निर्णय आणि पुनर्रचनेचा एक वर्षभराचा काळ लोटल्यानंतर, कंपनी आता आपल्या पारंपारिक आणि प्रमाणित वेतनवाढीकडे म्हणजे Salary Increment Cycleकडे परतत आहे. ही बातमी अशा कर्मचाऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहे, जे गेल्या काही काळापासून वेतनवाढ आणि नोकरीच्या सुरक्षिततेबाबत अनिश्चिततेचा सामना करत होते. नेमका काय घेतला निर्णय? सविस्तर समजून घेऊयात

शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा कडक इशारा

पगारात किती वाढ होणार?

TCS ने स्पष्ट केलं आहे की, आपली वार्षिक पगार सुधारणा प्रक्रिया म्हणजेच salary revision process नेहमीप्रमाणेच पुढे नेत आहे. अहवालांनुसार, उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना दुहेरी अंकी पगारवाढ म्हणजे १० टक्क्यांहून अधिक मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, बहुतांश कर्मचाऱ्यांसाठी, त्यांच्या ‘रेटिंग्ज’ आणि ‘ग्रेड्स’वर आधारित पगारवाढ ४.५% ते ७% च्या दरम्यान असण्याची अपेक्षा आहे.

…तरीही भरती सुरूच

आर्थिक वर्ष २०२६ मध्ये, कंपनीच्या एकूण कर्मचारी संख्येत २३,००० हून अधिकची घट झाली; पण कंपनीचे म्हणणे आहे की ही घट केवळ कर्मचारी कपातीमुळे झालेली नाही. TCS चे मुख्य मानव संसाधन अधिकारी (CHRO) सुदीप कुन्नुमल यांच्या मते, ही कंपनी देशातील सर्वात मोठ्या नोकरी देणाऱ्या संस्थांपैकी एक म्हणून कायम आहे. TCS चे या वर्षी अंदाजे ४०,००० नवीन कर्मचाऱ्यांची भरती करण्याचे उद्दिष्ट आहे आणि त्यापैकी २५,००० ‘कॅम्पस ऑफर्स’ यापूर्वीच देण्यात आल्या आहेत.

CEO चा सकारात्मक दृष्टिकोन आणि AI चा वाढता प्रभाव

TCS चे सीईओ के. कृतीवासन यांनी नमूद केले की, सुरुवातीच्या काही दबावानंतर, कंपनी आता एका सकारात्मक गतीत वाटचाल करत आहे. कंपनीचा AI बिझनेस देखील वेगाने वाढत आहे. चौथ्या तिमाहीत यातून सुमारे २.३ अब्ज डॉलर्सचा महसूल प्राप्त झाला आहे. त्यांनी या गोष्टीवर भर दिला की, AI च्या या युगातही, कंपन्यांना TCS सारख्या IT संस्थांच्या सेवांची आवश्यकता भासतच राहणार आहे. मार्च तिमाहीत, कंपनीच्या निव्वळ नफ्यात १२ टक्क्यांनी वाढ झाली असून तो १३,७१८ कोटी रुपयांवर पोहोचला आहे.

नाशिकमधील वादामुळे आव्हानांमध्ये वाढ

एकीकडे कंपनी आपल्या वाढीबद्दल आणि प्रगतीबद्दल बोलत असली, तरी दुसरीकडे तिचा HR विभाग मात्र चुकीच्या कारणांमुळे चर्चेच्या विषय ठरला आहे. नाशिकमध्ये कंपनीच्या BPO केंद्रातील HR व्यवस्थापक निदा खान यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे वृत्त आहे. महिला कर्मचाऱ्यांना भेडसावणारे लैंगिक छळ आणि बळजबरीचे प्रकार त्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्षित केले, तसेच अशा शोषणाला अप्रत्यक्षपणे हातभार लावला, असा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. हे प्रकरण समोर आल्यामुळे कॉर्पोरेट संस्कृती आणि महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत.

शाळांमधून गणवेश, शैक्षणिक साहित्य खरेदीची सक्ती करू नका, अन्यथा…; शिक्षण विभागाचा कडक इशारा

Web Title: Tcs layoffs end salary increment nashik bpo controversy hr issues see more details

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 17, 2026 | 03:16 PM

Topics:  

  • High salary Job
  • Salary
  • Salary Hike
  • Tata
  • Tata company
  • TCS

संबंधित बातम्या

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज
1

ISRO Scientist: इस्रोमध्ये वैज्ञानिक आणि इंजिनिअर होण्याचे स्वप्न पाहताय का? मग ‘या’ रिक्त जागांसाठी करा अर्ज

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?
2

Data Science skills: डेटा सायन्समध्ये करिअर करून लाखोंची कमाई करायचीय? तुमच्याकडे या ६ स्किल्स आहेत का?

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या
3

Jobs After BTech: बीटेक पूर्ण केल्यानंतर कोणत्या क्षेत्रात मिळतात सर्वोत्तम पगाराच्या नोकऱ्या? जाणून घ्या

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
4

IOB Recruitment 2026: इंडियन ओव्हरसीज बँकेत बंपर भरती; ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.