Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

जवळा बाजार जि.प. शाळेत शिक्षकाची जागा रिक्त; ४ वर्गांसाठी ३ शिक्षक, पंचायत समितीत भरली विद्यार्थ्यांची शाळा

तालुक्यातील जवळा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षकांची कमतरता गंभीर बनली असून विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Jan 17, 2026 | 04:56 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

तालुक्यातील जवळा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये शिक्षकांची कमतरता गंभीर बनली असून, याचा थेट परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होत आहे. गेल्या काही दिवसांपासून या शाळेत एक शिक्षकाची जागा रिक्त असल्याने चार वर्गांसाठी केवळ तीन शिक्षक कार्यरत आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असल्याचा आरोप पालकांकडून करण्यात येत आहे.

ईश्वरपूरच्या उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीचे खंडेराव जाधव बिनविरोध; स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर

जवळा बाजार येथील जिल्हा परिषद शाळेत यापूर्वी एकूण तीन शिक्षक कार्यरत होते. मात्र काही दिवसांपूर्वी एका शिक्षकाची बदली झाल्याने सध्या शाळेत केवळ दोन शिक्षक उरले असल्याचे चित्र निर्माण झाले होते. सध्या या शाळेतील विद्यार्थ्यांची एकूण पटसंख्या ४९ असून, इयत्ता पहिली ते चौथीपर्यंतचे वर्ग सुरू आहेत. मात्र शिक्षक अपुरे असल्याने वर्गनिहाय अध्यापन करणे शिक्षकांना कठीण जात आहे.

या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी गावकऱ्यांनी, पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी अनेक वेळा गटशिक्षण अधिकारी व शिक्षण अधिकारी यांना लेखी निवेदने दिली होती. मात्र वारंवार निवेदने देऊनही प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने पालकांमध्ये नाराजी पसरली होती.

अखेर शुक्रवारी (दि. १६) पालक आणि विद्यार्थ्यांनी आक्रमक भूमिका घेत नांदुरा पंचायत समिती कार्यालयातच ‘शाळा भरवण्याचा’ निर्णय घेतला. सकाळपासूनच विद्यार्थी व पालक पंचायत समिती कार्यालयात जमले होते. रिक्त असलेली शिक्षकाची जागा तातडीने भरावी, अशी ठाम मागणी त्यांनी यावेळी केली. यामुळे पंचायत समिती कार्यालयात काही काळ गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती.

पालकांचे म्हणणे आहे की, शिक्षकांची कमतरता असल्याने विद्यार्थ्यांचा अभ्यास मागे पडत असून, शाळेतील शैक्षणिक वातावरणावरही त्याचा विपरीत परिणाम होत आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळावे, यासाठी शासनाने वेळेवर शिक्षकांची नेमणूक करणे अत्यंत आवश्यक आहे, असे मत पालकांनी व्यक्त केले.

यावेळी जवळा बाजार येथील अनेक ग्रामस्थ, पालक तसेच शाळेतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. शिक्षकांची जागा तातडीने भरली नाही, तर भविष्यात अधिक तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही पालकांनी दिला आहे.

Maharashtra Politics: “खुर्च्या कशा मतदान…”; BMC निकालावर उद्धव ठाकरेंचा विरोधकांना टोला

दरम्यान, पंचायत समितीतील संबंधित अधिकाऱ्यांनी या प्रकरणाची दखल घेत वरिष्ठ स्तरावर माहिती देण्यात येईल, तसेच लवकरच शिक्षक उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन दिल्याची माहिती आहे. मात्र प्रत्यक्षात कधी शिक्षक मिळणार, याकडे गावकऱ्यांचे लक्ष लागून आहे.

Web Title: Teachers position vacant at jawala bazar zilla parishad school

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 17, 2026 | 04:56 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे
1

Indian Air Force मध्ये एअर मार्शल कसे बनतात? जाणून घ्या फ्लाइंग ऑफिसरपासून ते या सर्वोच्च पदापर्यंतचे टप्पे

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात
2

Sainik School: सैनिकी शाळेत शिकणारे विद्यार्थी फक्त सैन्यातच नव्हे तर ‘या’ क्षेत्रातही चमकतात

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?
3

Cambridge survey : परदेशात शिक्षणाचे आकर्षण घटले? भारतातील विद्यार्थ्यांना देशातच UG शिक्षण घेण्याचा कल का वाढला?

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोली भरतीत मोठा बदल! शिकाऊ उमेदवारांच्या जागा कितीने घटल्या? जाणून घ्या
4

Mahavitaran Hingoli Bharti 2026: महावितरण हिंगोली भरतीत मोठा बदल! शिकाऊ उमेदवारांच्या जागा कितीने घटल्या? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.