इंडिया' आघाडीच्या रॅलीत CJP सहभागी होणार; आशुतोष रांका, राहुल गांधीं काय म्हणाले?
आशुतोष रांका म्हणाले की, पक्षाचे समर्थक रामलीला मैदानावर होणाऱ्या रॅलीत सहभागी होऊ शकतात. सीजेपीने इंडिया आघाडीच्या रॅलीत सामील होण्याचे संकेतही दिले असून त्यांच्या कार्यकर्त्यांकडून अभिप्राय मागवले जात आहेत.
दरम्यान, रॅलीच्या तयारीसंदर्भात काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी इंडिया ब्लॉकची बैठक झाली. प्रियांका गांधी यांच्यासह आघाडीचे अनेक नेते उपस्थित होते. इंडिया आघाडी आणि सीजेपी कडून सातत्याने एसआयआर प्रक्रियेतील गैरव्यहारांविरोधात आंदोलने केली जात आहेत. दोन्ही पक्षांकडून मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याचीही मागणी जोर धरु लागली आहे.
इंडिया ब्लॉकच्या नेत्यांनी गुरुवारी मल्लिकार्जुन खर्गे यांच्या निवासस्थानी बैठक घेतली. प्रियांका गांधी यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते. यावेळी राहुल गांधी यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या मोर्चाला उपस्थित राहण्याचे आवाहन केलं आहे.
राहुल गांधी म्हणाले की, हा मोर्चा कोणत्याही एका राजकीय पक्षासाठी नाही, तर भारताचा आत्मा वाचवण्यासाठी आहे. हा मोर्चा भारतीय संविधान आणि राष्ट्राचे रक्षण करण्यासाठी आहे. १ नोव्हेंबरचा मोर्चा लोकशाही वाचवण्यासाठी, मतचोरी रोखण्यासाठी आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी आहे. जर कोणाला वाटत असेल की देशाची लोकशाही, संविधान, विचार आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आहे, तर त्यांनी या मोर्चात सामील व्हावे.” असं आवाहन राहुल गांधी यांनी केलं आहे..
विरोधी आघाडी ‘इंडिया आघाडीकडून ‘ शुक्रवारी दिल्लीत ज्ञानेश कुमार यांच्या विरोधात सार्वजनिक महाभियोग कार्यक्रम आयोजित करणार आहे. राहुल गांधी यांच्यासह विरोधी पक्षाचे नेते यात सहभागी होतील. इतर ठिकाणी परवानगी न मिळाल्याने, हा कार्यक्रम आता दुपारी ३:३० वाजता १० राजाजी मार्ग येथे आयोजित केला जाईल. हा कार्यक्रम १ नोव्हेंबर रोजी रामलीला मैदानावर होणाऱ्या विरोधी पक्षाच्या सभेच्या आधी होईल.
सार्वजनिक महाभियोगामध्ये, जनता किंवा राजकीय पक्ष घटनात्मक पद धारण करणाऱ्या व्यक्तीविरुद्ध आंदोलन करतात. याद्वारे त्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण केले जाते आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी करत जनदबाव निर्माण केला जातो.
इंडिया आघाडीच्या नेत्यांनी एसआयआर आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी ६ ते १३ ऑक्टोबर दरम्यान ८ निदर्शने केली. तर ‘कॉकरोच जनता पार्टी’ आणि डाव्या पक्षांनीही १० ऑक्टोबर रोजी याच मुद्द्यावर निदर्शनाचे आवाहन केले होते, परंतु दिल्ली पोलिसांनी त्याला परवानगी दिली नाही. या काळात शहरात बॅरिकेड्स लावण्यात आले, ४५ मेट्रो स्टेशन्स बंद करण्यात आली आणि ७,००० हून अधिक आंदोलकांना ताब्यात घेण्यात आले.
Ans: १ नोव्हेंबर रोजी इंडिया आघाडी आणि सीजेपी पक्षाच्या वतीने दिल्लीतील रामलीला मैदानावर 'लोकशाही व संविधान रक्षणासाठी' 'दिल्ली चलो' मोर्चा आयोजित करण्यात आला आहे.
Ans: सीजेपी प्रवक्ते आशुतोष रांका यांनी सांगितले की, पक्षाचे समर्थक रामलीला मैदानावरील रॅलीत सहभागी होतील आणि पक्षाकडून सहभागाबाबत कार्यकर्त्यांचा अभिप्राय घेतला जात आहे.
Ans: राहुल गांधी यांनी तरुणांना पोलिसांच्या लाठीचार्जला न घाबरता लोकशाही, अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि संविधानाचे रक्षण करण्यासाठी या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.






