दिवाळी 2026 (फोटो- ai gemini)
यंदा सुक्या मेव्यापासून तयार होणाऱ्या मिठाईच्या किमतीत लक्षणीय वाढ झाली आहे. गेल्या वर्षी प्रतिकिलो सुमारे एक हजार ४४० रुपये असलेल्या सुक्या मेव्याच्या मिठाईचे दर यंदा एक हजार ६०० रुपयांवर पोहोचले आहेत. तसेच मावा कतली, मँगो कतली यांसारख्या मिठाईचे दर ८२८ रुपयांवरून सुमारे ९०० रुपये प्रतिकिलो झाले आहेत. चकली, शेव, शंकरपाळी आणि चिवडा या फराळाच्या पदार्थांचे दरही प्रतिकिलो ४४२ ते ५५२ रुपयांवरून ४८० ते ६०० रुपयांपर्यंत वाढले आहेत.
महागाईमुळे खरेदीचे बजेट बिघडले असले, तरी सणाचा आनंद कमी झालेला नाही. “महागाई असली तरी सणासुदीला खरेदी करावीच लागते. अन्यथा सण आणि सामान्य दिवस यात फरक काय राहणार?” अशी भावना ग्राहक सुष्मिता थोरात यांनी व्यक्त केली. तर, किमती वाढल्या तरी कुटुंबासोबत आनंद साजरा करण्यासाठी मिठाई आणि फराळ खरेदी करत असल्याचे पूजा दिवेकर यांनी सांगितले.
यंदा कच्च्या मालाच्या किमतीत २५ ते ३० टक्के, तर सुक्या मेव्याच्या दरात ३५ ते ४० टक्क्यांनी वाढ झाली आहे. त्यामुळे मिठाईच्या किमतींमध्ये साधारण आठ ते दहा टक्क्यांनी वाढ करावी लागली आहे. असे असले तरी ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळत असून, मिठाईच्या आगाऊ नोंदणीलाही मोठा प्रतिसाद आहे. एकूणच, यंदा दिवाळीच्या खरेदीसाठी बाजारात उत्साहाचे वातावरण आहे.
पदार्थ. मागील वर्षाचे दर. यंदाचे दर. दरवाढ
Ans: यंदा एक हजार ६०० रुपयांवर मिठाईचे दर पोहोचले आहेत.
Ans: सुक्या मेव्याच्या दरात






