उत्तर प्रदेशमध्ये 1200 पदांची भरती होणार (फोटो- istockphoto)
योगी सरकारने करणार सरकारी नोकरभरती
आरोग्य विभागात होणार 1200 पदांची भरती
सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न होणा पूर्ण
प्रत्येक तरुणांचे तरुणींचे आपल्या आवडत्या क्षेत्रात करियर करण्याचे स्वप्न असते. त्यादृष्टीने प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. तसेच सरकारी नोकरी करण्याचे स्वप्न तर प्रत्येकालाच असते. तर आता सरकारी नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या युवकांसाठी एक खुशखबर समोर आली आहे. लवकरच आरोग्य विभागात तब्बल 1200 पदांसाठी भरती केली जाणार आहे.
नवीन वर्ष ससुरू होताच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी युवकांसाठी आनंदाची बातमी आणली आहे. उत्तर प्रदेश सरकारने सरकारी नोकऱ्यांचा पेटारा उघडला आहे. उत्तर प्रदेशच्या वैद्यकीय शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात भरती केली जाणार आहे. सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये सुमारे 1200 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रियेला मान्यता देण्यात आली आहे.
या नवीन वर्षात उत्तर प्रदेश सरकार विंदयकीय शिक्षण क्षेत्रात 1200 पदांची भरती करणार आहे. यामध्ये 1112 सहायक प्राध्यापक पदे, 44 प्राध्यापक पदे, फार्मसीमध्ये 11 पदे भरली जाणार आहेत. याबाबत वैद्यकीय शिक्षण विभागाचे अतिरिक्त सचिव अमित कुमार यांनी याबत प्रस्ताव उत्तर प्रदेश लोकसेवा आयोगाकडे दिला असल्याचे समजते आहे.
राज्यातील वैद्यकीय शिक्षण केवळ पदव्या देण्यापुरते मर्यादित नसावे. नवीन प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या येण्याने विंदयकीय शिक्षणाचा दर्ज सुधारण्यास देखील मदत होईल असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट केले. तसेच सरकारी रूग्णालयात येणाऱ्या रूग्णांना चांगले उपचार मिळतील अशी खात्री निर्माण होईल.
संरक्षण क्षेत्रात करिअर करण्याची सुवर्णसंधी
जर तुम्ही विज्ञान किंवा अभियांत्रिकी शाखेचे विद्यार्थी असाल आणि तुम्हाला देशाच्या संरक्षण क्षेत्रात तंत्रज्ञानावर काम करण्याची इच्छा असेल, तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. संरक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या संरक्षण संशोधन आणि विकास संघटनेने सहा महिन्यांच्या सशुल्क इंटर्नशिपसाठी अर्ज मागवले आहेत. ही इंटर्नशिप दिल्लीतील प्रसिद्ध सॉलिड स्टेट फिजिक्स लॅबोरेटरीयेथे होणार असून, विद्यार्थ्यांना थेट संरक्षण शास्त्रज्ञांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे.
“शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या”, ऑनलाइन कामांच्या जाचाविरोधात शिक्षकांचा एल्गार
कोण अर्ज करू शकते?
(Eligibility) जे विद्यार्थी सध्या BE/BTech करत आहेत. MSc किंवा MTech करत असलेले विद्यार्थी. भौतिकशास्त्र (Physics), रसायनशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग, मटेरियल सायन्स, क्वांटम तंत्रज्ञान, लेसर ऑप्टिक्स, सेमीकंडक्टर डिव्हाइसेस, आयटी आणि कॉम्प्युटर सायन्स (CSE).






