Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतर धोरणात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवीन नियमावली जाहीर केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 15, 2026 | 04:37 PM
व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

व्यावसायिक हेतूने होणाऱ्या शाळांच्या स्थलांतराला ब्रेक; राज्य सरकारचा मोठा निर्णय

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यातील प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळांच्या स्थलांतर धोरणात राज्य शासनाने महत्त्वपूर्ण सुधारणा करत नवीन नियमावली जाहीर केली आहे. शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने यासंदर्भात शासन निर्णय जारी केला असून, यानुसार शाळांचे स्थलांतर केवळ अपवादात्मक परिस्थितीत किंवा भौतिक सुविधांचा दर्जा उंचावण्यासाठीच मंजूर केले जाणार आहे. यामुळे विनाकारण किंवा व्यावसायिक कारणांमुळे होणाऱ्या स्थलांतरांवर निर्बंध येणार आहेत.

 

शाळेची इमारत धोकादायक किंवा जीर्ण झाल्यास, नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झाल्यास, विकास प्रकल्पामुळे जागा बाधित झाल्यास किंवा भाडेकरार संपुष्टात आल्यास स्थलांतरास परवानगी दिली जाईल. तसेच अपुऱ्या सुविधा असलेल्या इमारतीतून अधिक सक्षम व स्वयंपूर्ण इमारतीत जाण्यासाठीही स्थलांतर करता येणार आहे.

नवीन धोरणानुसार स्थलांतरासाठी अनेक कठोर अटी घालण्यात आल्या आहेत. शाळेच्या नवीन ठिकाणी आरटीई कायद्यानुसार सर्व सुविधा उपलब्ध असणे आवश्यक राहील. युडायस अहवालानुसार विद्यार्थ्यांचे शंभर टक्के आधार प्रमाणीकरण बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच जुन्या आणि नव्या ठिकाणच्या सुविधांची तुलनात्मक छायाचित्रे सादर करणेही आवश्यक राहणार आहे.

राज्य शासनाने कमी पटसंख्या असलेल्या शाळांबाबतही महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. २० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या प्राथमिक शाळा आणि ४० पेक्षा कमी विद्यार्थी असलेल्या माध्यमिक शाळांच्या स्थलांतर प्रस्तावांचा विचार केला जाणार नाही. यामुळे केवळ अस्तित्व टिकवण्यासाठी होणाऱ्या स्थलांतरांवर नियंत्रण येण्याची शक्यता आहे.

अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांच्या बाबतीत अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन पूर्ण करणे अनिवार्य राहणार आहे. तसेच स्थलांतरानंतर विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही आणि शैक्षणिक सुविधांचा दर्जा वाढेल याची खात्री संबंधित प्रशासनाला करावी लागणार आहे.

स्थलांतरासाठी मर्यादा निश्चित

शाळांच्या स्थलांतरासाठी अंतराचीही मर्यादा निश्चित करण्यात आली आहे. प्राथमिक शाळा मूळ जागेपासून जास्तीत जास्त ५ किलोमीटर, माध्यमिक शाळा १० किलोमीटर आणि उच्च माध्यमिक शाळा २० किलोमीटर अंतरापर्यंतच स्थलांतरित करता येणार आहेत. तात्पुरत्या स्थलांतरासाठी ही मर्यादा ३ किलोमीटर ठेवण्यात आली आहे.

हे सुद्धा वाचा : पुढील वर्षी 15 लाख घरांच्या वितरणाचे उद्दिष्ट; साताऱ्यातून मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

शाळांचे गटानुसारच स्थलांतर

एकाच इमारतीत वेगवेगळे युडायस क्रमांक असलेल्या शाळांना प्रथम एकत्रित प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असून, नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार इयत्ता १ ते ५, ६ ते ८ आणि ९ ते १२ या गटानुसारच स्थलांतर धोरण लागू राहणार आहे. तात्पुरत्या स्थलांतरासाठी विभागीय उपसंचालकांना दोन वर्षांच्या कालावधीपर्यंत अधिकार देण्यात आले आहेत.

Web Title: The state government has announced revised regulations regarding the relocation of schools

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 15, 2026 | 04:37 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Marathi School
  • School news

संबंधित बातम्या

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक
1

Nana Patekar Death: ‘ माझे निकटचे मित्र, नाना कधीच मागे राहिले नसते पण…’, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस भावूक

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त
2

वाळू उपशाला लगाम! इंदापूर तालुक्यातील माळवाडीत महसूलची मोठी कारवाई; तीन बोटी उद्ध्वस्त

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई
3

Cabinet Decision : मारहाण, छळामुळे कोठडीत मृत्यू? नातेवाईकांना मिळणार 5 लाखांची नुकसानभरपाई

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता
4

दुष्काळात ऊसाला हुमणीचा विळखा, शेतकऱ्यांची चिंता वाढली; उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.