Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 16 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी…

पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. १ जुलैपर्यंत आणखी ५ ते १० टक्के शेतकऱ्यांची संमती मिळण्याची अपेक्षा आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jun 30, 2026 | 04:18 PM
पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी...

पुरंदर विमानतळासाठी भूसंपादनाला वेग, आत्तापर्यंत 1150 कोटींचे वाटप; आणखी निधी...

Follow Us
Follow Us:

सासवड : पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्पासाठी भूसंपादन प्रक्रिया वेगाने सुरू असून, आतापर्यंत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी संमती दिली आहे. १ जुलैपर्यंत आणखी ५ ते १० टक्के शेतकऱ्यांची संमती मिळण्याची अपेक्षा असून, १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के भूसंपादन पूर्ण करण्याचे शासनाचे नियोजन असल्याची माहिती जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी दिली. प्रकल्पाची प्रक्रिया गतीमान करण्यासाठी जिल्हाधिकारी डुडी यांनी पुरंदर येथील प्रशासकीय कार्यालयात दर सोमवारी सकाळी ११ ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत उपस्थित राहून शेतकऱ्यांच्या तक्रारी व हरकतींची सुनावणी सुरू केली आहे.

 

तहसील, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच न्यायालयीन स्तरावरील प्रकरणांचा तातडीने निपटारा करून संमती प्रक्रियेला गती देण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून केला जात आहे. जिल्हाधिकारी दुडी म्हणाले की, ३० जूनपर्यंत संमती देण्यासाठी मुदत देण्यात आली होती. या कालावधीत सुमारे ८० टक्के शेतकऱ्यांनी संमती दर्शविली असून उर्वरित शेतकऱ्यांशी चर्चा करून त्यांचीही संमती घेतली जात आहे. एकाच गटातील काही सदस्यांनी संमती दिली असून, उर्वरित सदस्यांची समजूत काढण्याचे काम सुरू आहे. शेतकऱ्यांचे पैसे न्यायालयात अडकून न पडता थेट त्यांच्या खात्यात जमा होतील, यासाठी प्रशासन प्रयत्नशील असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

भूसंपादनासाठी आतापर्यंत १,१५० कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले असून आणखी सुमारे १ हजार कोटी रुपयांचा निधी लवकरच उपलब्ध होणार आहे. निधी प्राप्त होताच संबंधित शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा करण्यात येईल. १५ जुलैपर्यंत ५० टक्के शेतकऱ्यांना मोबदला वितरित करण्याचे, तर १५ ऑगस्टपर्यंत शंभर टक्के मोबदला देण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले.

हे सुद्धा वाचा : ‘शिक्षणमंत्री राजीनामा द्या, अध्यक्ष राजीनामा द्या’! ‘टीईटी’ पेपरफुटीच्या निषेधार्थ विविध विद्यार्थी संघटनांचे जोरदार आंदोलन

सकारात्मक निर्णय झाल्यास लाभ देऊ

शेतकऱ्यांना जमिनीसाठी प्रति एकर १ कोटी ६१ लाख रुपये, तर केवळ जमिनीचा दर सुमारे ४ लाख रुपये प्रति गुंठा दिला जात आहे. याशिवाय विहीर, फळझाडे, शेततळे आदी मालमत्तेचाही मोबदला दिला जात आहे. मात्र, शासनाकडून १० टक्के परताव्याची कपात एकूण मोबदल्यावर होत असल्याने शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. याबाबत एमआयडीसीकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, सकारात्मक निर्णय झाल्यास संबंधित शेतकऱ्यांना त्याचा लाभ देण्यात येईल, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र दुडी यांनी स्पष्ट केले.

भूसंपादन प्रक्रियेदरम्यान नव्याने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात चार शेतकऱ्यांच्या नोंदींमध्ये त्रुटी आढळल्या. तीन शेतकऱ्यांच्या क्षेत्राबाहेरील पाइपलाइनची नोंद राहिली होती, तर एका शेतकऱ्याच्या घराचे मूल्यांकन अचूक झाले नव्हते. या सर्व प्रकरणांमध्ये नव्याने मूल्यांकन करून दुरुस्ती करण्यात आले. – जितेंद्र दुडी, जिल्हाधिकारी.

Web Title: The land acquisition process for the purandar international airport project is proceeding rapidly

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 30, 2026 | 04:18 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • Farmers
  • Purandar Airport

संबंधित बातम्या

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला
1

माळशेज घाट भोरांडे जलविद्युत प्रकल्पाविरोधात गाढव मोर्चा; अदाणी हटाओ, सह्याद्री बचाओच्या घोषणांनी परिसर दणाणला

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी
2

चाकण एमआयडीसीसाठी तुकाराम मुंढेंसारखा खमक्या अधिकारी द्या; आदित्य ठाकरेंची मागणी

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
3

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी
4

सहकारी शेती, सिंचन अन् कृषी भांडवलावर मंथन; मुंबई विद्यापीठातील राष्ट्रीय चर्चासत्रात आंबेडकरी कृषी विचारांची उजळणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.