Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

विज्ञान संशोधनात मराठी पुस्तकांचा अभाव! इंग्रजी साहित्यावरच द्यावा लागतोय भर; अनुवादकांचीही कमतरता

देश डिजिटल युगाकडे वेगाने वाटचाल करत असताना मराठी भाषेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील संशोधनात्मक पुस्तकांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 17, 2026 | 06:30 PM
विज्ञान संशोधनात मराठी पुस्तकांचा अभाव! इंग्रजी साहित्यावरच द्यावा लागतोय भर; अनुवादकांचीही कमतरता

विज्ञान संशोधनात मराठी पुस्तकांचा अभाव! इंग्रजी साहित्यावरच द्यावा लागतोय भर; अनुवादकांचीही कमतरता

Follow Us
Follow Us:
  • विज्ञान संशोधनात मराठी पुस्तकांचा अभाव!
  • इंग्रजी साहित्यावरच द्यावा लागतोय भर
  • अनुवादकांचीही खूप कमतरता
पुणे/गायत्री पवळे : देश डिजिटल युगाकडे वेगाने वाटचाल करत असताना मराठी भाषेत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील संशोधनात्मक पुस्तकांचा अभाव प्रकर्षाने जाणवत आहे. इंग्रजी भाषेत उपलब्ध असलेले संशोधन निबंध आणि संदर्भग्रंथ मोठ्या प्रमाणावर वापरले जात असले तरी, त्यांचे मराठी भाषांतर किंवा स्वतंत्र मराठी साहित्य अल्प प्रमाणात असल्याने विद्यार्थ्यांना अभ्यास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

 

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी ‘नवराष्ट्र’शी बोलताना सांगितले की, मराठी माध्यमातून विज्ञान किंवा तंत्रज्ञानाचे शिक्षण घेताना संशोधनात्मक पुस्तके मराठीत उपलब्ध आहेत का, याचा शोध घ्यावा लागतो. अनेकदा इंग्रजीतील संशोधनपर साहित्य समजणे कठीण जाते. इंटरनेटवर सर्वच संदर्भग्रंथ उपलब्ध नसतात. त्यामुळे दर्जेदार आणि संशोधनाधिष्ठित विज्ञान-तंत्रज्ञान विषयक पुस्तके मराठीत उपलब्ध व्हावीत, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा : शेतकऱ्यांना आर्थिक फटका! भाजी मार्केटवर युद्धाचं सावट, काकडी, दुधी, कारल्याचा साठा वाढला

शब्दसंच विकसित करण्यात मागे

प्रकाशन क्षेत्रातील तज्ज्ञांच्या मते, मराठीत विज्ञान आणि तंत्रज्ञान विषयांवरील पुस्तकांचे प्रमाण कमी असण्यामागे काही मूलभूत कारणे आहेत. विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रात सातत्याने नवीन संकल्पना, शोध आणि तांत्रिक शब्दांची भर पडत असते. त्या अनुषंगाने आवश्यक असलेला मराठी शब्दसंच विकसित करण्यात आपण मागे आहोत, असे सुनिधी पब्लिशर्सचे अविनाश काळे यांनी सांगितले. काळे यांच्या मते विज्ञान आणि तंत्रज्ञान हा केवळ अभ्यासाचा विषय नसून, तो एक विचारसरणी आणि दृष्टिकोन आहे. मराठी शाळांमधील विद्यार्थ्यांमध्ये हा वैज्ञानिक दृष्टिकोन कितपत रुजवला गेला आहे, हा देखील विचार करण्याचा मुद्दा आहे. वैज्ञानिक दृष्टिकोनातून आयुष्याचा विचार करण्याची गरज असली तरी, समाजात तो मर्यादित प्रमाणात दिसून येतो. मराठी भाषकांमध्ये संशोधक आणि वैज्ञानिकांचे प्रमाण तुलनेने कमी असल्याने त्या अनुषंगाने मराठीत लेखनही मर्यादित राहिले असल्याचे त्यांनी नमूद केले.

हे सुद्धा वाचा : DCM एकनाथ शिंदे यांचा दिल्ली दौरा चर्चेत; PM मोदींसोबत दीड तास चर्चा

Web Title: There are few research books on science and technology subjects in marathi language

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 17, 2026 | 04:49 PM

Topics:  

  • book publication
  • book reading
  • pune news

संबंधित बातम्या

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल
1

Marathon: ७२ किमींचं आव्हान, १२ तासांची झुंज; पुण्याच्या धावपटूंनी केली लडाखच्या ‘खारदुंग ला’ वर कमाल

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन
2

Purandar Airport News: पुरंदर विमानतळ भूसंपादन: ९१० हेक्टर जमीन संपादित, ३,८७५ कोटींचा मोबदला वाटप; २० ऑक्टोबरची डेडलाईन

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा
3

PDCC निवडणुकीआधी खेडमध्ये मोहिते पाटलांचे शक्तिप्रदर्शन! ७२ मतदार प्रतिनिधींचा पाठिंबा

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद
4

Pune Traffic Update : पुणेकरांनो लक्ष द्या! शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठा बदल; ‘हे’ महत्त्वाचे रस्ते राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.