डीसीएम एकनाथ शिंदे आणि पीएम नरेंद्र मोदी यांची दिल्लीमध्ये भेट झाली आहे (फोटो - सोशल मीडिया)
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये तब्बल दीड ते तास चर्चा झाली. सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास दोन्ही नेत्यांची भेट झाली. यावेळी एकनाथ शिंदे यांनी राज्यातील विविध विकासकामांच्या विषयांवर चर्चा केल्याची शक्यता आहे. तसेच इतर राज्यांमध्ये जाहीर झालेल्या विधानसभा निवडणुकीसंदर्भात देखील चर्चा झाल्याची शक्यता आहे. या निवडणुकांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी स्पष्ट केली असल्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांच्या भेटीचे कारण अद्याप समोर आलेले नाही. मात्र या भेटीकडे महाराष्ट्रातील राजकीय वर्तुळाचे पूर्ण लक्ष लागले होते.
हे देखील वाचा : ममतादीदींच्या अभेद्य किल्ल्याला BJP लावणार सुरुंग? दक्षिण कोलकात्यामध्ये कोण मारणार बाजी
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे अधिवेशन काळामध्ये दिल्ली दौऱ्यावर आल्याने त्यांनी संसदेच्या आवारामध्ये इतर भाजप आणि एनडीएमधील नेत्यांची भेट घेतली आहे. केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री आणि अल्पसंख्याक व्यवहार मंत्री किरण रिजिजू यांच्याशी भेट झाली आहे. खासदार श्रीकांत शिंदे देखील एकनाथ शिंदे यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी रिजिजू यांनी एकनाथ शिंदे यांना ‘श्रीकांत मेरा छोटा भाई है’, असे म्हटले. त्यांच्या संभाषणाची आता जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजप आमदार मंदा म्हात्रेंना हृदयविकाराचा झटका, नवी मुंबईतील रुग्णालयात उपचार सुरु






