Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 17 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

IIT Bombay: JEE Advanced मध्ये ३२ वी रँक असूनही नाकारली आयआयटी मुंबई; जुळ्या भावाने एकाच निर्णयाने जिंकली देशाची मने!

IIT Bombay CS Seat Left: जेईई ॲडव्हान्स्ड २०२६ मध्ये ३२ वी रँक मिळवूनही महरूफने भावासाठी आयआयटी बॉम्बे सोडले. आता दोघे आयआयटी मद्रासमध्ये एकत्र शिकणार आहेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 15, 2026 | 03:45 PM
जेईई

जेईई

Follow Us
Follow Us:

IIT Bombay CS Seat Left: इंजिनिअरिंगच्या (Engineering) क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या बहुतांश विद्यार्थ्यांचे स्वप्न असते की, त्यांनी ‘आयआयटी बॉम्बे’ (IIT Bombay) सारख्या प्रतिष्ठित संस्थेतून शिक्षण घ्यावे. परंतु, ओडिशातील दोन जुळ्या भावांनी आयआयटी बॉम्बेची सीट हसत-हसत सोडली आहे.

जेईई ॲडव्हान्स्ड (JEE Advanced 2026) परीक्षेत महरूफला ३२ वी रँक (All India Rank 32) मिळाली होती. या रँकच्या जोरावर तो आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्समध्ये इंजिनिअरिंग करून आपले स्वप्न पूर्ण करू शकत होता. परंतु, असे असूनही त्याने आपल्या भावाच्या प्रेमापोटी ही सीट सोडण्याचा निर्णय घेतला. नक्की काय आहे हे संपूर्ण प्रकरण, जाणून घेऊया.

जन्मात केवळ २ मिनिटांचा फरक

१८ वर्षांचे महरूफ आणि मसरूर हे ओडिशाचे राहणारे आहेत. महरूफ आणि मसरूर यांच्या जन्मात केवळ २ मिनिटांचा फरक आहे. या दोन्ही भावांनी लहानपणापासून एकाच टेबलवर एकत्र बसून अभ्यास केला आहे. यंदाच्या जेईई ॲडव्हान्स्ड परीक्षेत महरूफला ३२ वी रँक आणि मसरूरला १६९ वी रँक मिळाली आहे. महरूफला आयआयटी बॉम्बेमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घ्यायचे होते, पण त्याने आपल्या भावासाठी या स्वप्नाचा त्याग केला.

Central Bank Recruitment 2026: सेंट्रल बँकेत ४,५०० पदांची बंपर भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, लवकर करा अर्ज!

जेईई परीक्षेत मिळाले होते एकसारखेच गुण

ज्या दोन जुळ्या भावांची आज देशभर चर्चा होत आहे, त्यांनी जेईई मेन्स २०२६ (JEE Main 2026) च्या निकालातही एकसारखेच गुण मिळवले होते. दोघांनीही या परीक्षेची तयारी एकत्र केली होती. दोन्ही भावांना जेईई मेन्सच्या परीक्षेत एकूण ३०० पैकी २८५ गुण मिळाले होते.

आता ‘आयआयटी मद्रास’मध्ये घेणार प्रवेश

आयआयटी बॉम्बेची सीट सोडल्यानंतर महरूफने आता आयआयटी मद्रास (IIT Madras) येथे जाण्याचा निर्णय घेतला आहे. त्याने आयआयटी मद्रासमधून कॉम्प्युटर सायन्सचे शिक्षण घेण्याचे ठरवले आहे, जेणेकरून दोन्ही भाऊ नेहमी एकत्र राहू शकतील आणि इंजिनिअरिंगचा अभ्यासही एकत्र करू शकतील.

PMRC 2026: पीएचडीधारकांसाठी सरकारची मोठी ऑफर! PMRC Fellowship साठी ‘या’ तारखेपर्यंत करता येणार अर्ज

या निर्णयामुळे त्यांचे कुटुंब अत्यंत आनंदी आहे. त्यांचे आई-वडील दोघेही डॉक्टर आहेत. त्यांची आई झीनत यांनी सांगितले की, दोन्ही भावांनी इयत्ता नववीमध्ये असतानाच कोटामधील एक अंतराळ परीक्षा उत्तीर्ण केली होती आणि दोघेही काही दिवस तिथे राहिले होते.

Web Title: Twin brothers leave iit bombay computer science seat for brother marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 15, 2026 | 03:45 PM

Topics:  

  • Bombay IIT
  • Brothers
  • JEE exam
  • Twins

संबंधित बातम्या

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार
1

NTA Recruitment 2026: नॅशनल टेस्टिंग एजन्सीमध्ये काम करण्याची सुवर्णसंधी! शिक्षकांसाठी ‘या’ पदांवर भरती होणार

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!
2

NTA Exam Calendar 2026-27: एनटीएकडून मोठ्या परीक्षांचे कॅलेंडर प्रसिद्ध; ‘या’ दिवशी होणार परीक्षा!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.