Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 12 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दोन लाख विद्यार्थी देणार पीसीबी सीईटी परीक्षा! होणार दोन परीक्षा, विद्यार्थ्यांना मिळणार एक संधी आणखीन

राज्यात पीसीबी समूहाची एमएचटी-सीईटी परीक्षा २१ ते २६ एप्रिलदरम्यान दोन सत्रांत घेतली जात आहे. पहिल्या संधीसाठी तब्बल २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत.

  • By दिवेश चव्हाण
Updated On: Apr 21, 2026 | 02:42 PM
फोटो सौजन्य - Social Media

फोटो सौजन्य - Social Media

Follow Us
Follow Us:

राज्यातील व्यावसायिक शिक्षणाच्या प्रवेश प्रक्रियेत महत्त्वाची मानली जाणारी पीसीबी (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि जीवशास्त्र) समूहाची एमएचटी-सीईटी परीक्षा यंदा मोठ्या प्रमाणावर पार पडत आहे. राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षामार्फत शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी औषधनिर्माणशास्त्र (फार्मसी) आणि कृषी शिक्षणाच्या विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ही परीक्षा घेतली जात आहे. २१ एप्रिलपासून सुरू झालेली ही परीक्षा २६ एप्रिल २०२६ पर्यंत सहा दिवस चालणार असून, दररोज सकाळ आणि दुपार अशा दोन सत्रांमध्ये विद्यार्थ्यांची परीक्षा घेतली जात आहे.

उद्यापासून PCB समूहाची CET प्रवेश परीक्षा; पहिल्या संधीसाठी २ लाख ८४ हजार ०६३ परिक्षार्थी

यंदा ही परीक्षा पूर्णपणे संगणकाधारित (CBT) पद्धतीने घेतली जात असून, राज्यभरातील ३६ जिल्ह्यांमधील १८९ परीक्षा केंद्रांवर विद्यार्थ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. परीक्षेच्या सुरळीत आयोजनासाठी सीईटी कक्षाने विशेष नियोजन केले असून, विद्यार्थ्यांना कोणतीही अडचण येऊ नये यासाठी तांत्रिक आणि प्रशासकीय यंत्रणा सज्ज ठेवण्यात आली आहे.

या वर्षीचा सर्वात मोठा बदल म्हणजे विद्यार्थ्यांना दोन संधी देण्याचा निर्णय. याआधी ही परीक्षा एकदाच घेतली जात होती; मात्र विद्यार्थ्यांवरील ताण कमी करण्यासाठी आणि अधिक चांगली कामगिरी करण्याची संधी देण्यासाठी सीईटी कक्षाने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पहिली संधी २१ ते २६ एप्रिलदरम्यान होत असून, या संधीसाठी तब्बल २ लाख ८४ हजार ०६३ विद्यार्थी परीक्षा देत आहेत. दुसरी संधी १० आणि ११ मे २०२६ रोजी आयोजित करण्यात आली असून, त्यासाठी १ लाख ११ हजार ८०९ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

दोन्ही संधी मिळून एकूण ३ लाख ९५ हजार ८७२ विद्यार्थी पीसीबी समूहाची सीईटी परीक्षा देणार आहेत. इतक्या मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी होत असल्यामुळे यंदाची परीक्षा अत्यंत स्पर्धात्मक ठरणार आहे. या परीक्षेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना राज्यातील नामांकित फार्मसी आणि कृषी महाविद्यालयांमध्ये प्रवेश मिळवण्याची संधी मिळते.

स्टेनोग्राफी शिकणाऱ्या विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात! सरकारच्या निर्णयामुळे नाराजी; संघटनेचे शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार

तसेच, सीईटी कक्षाने यावर्षीपासून पीसीएम (भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, गणित) समूह, पीसीबी समूह आणि एमबीए/एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षा दोन वेळा घेण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना अधिक लवचिकता मिळणार असून, त्यांच्या शैक्षणिक भविष्यासाठी ही एक सकारात्मक पायरी मानली जात आहे.

Web Title: Two lakh students to appear for the pcb cet exam

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 02:42 PM

Topics:  

  • Career
  • Recruitment News

संबंधित बातम्या

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……
1

High paying jobs: कॉर्पोरेट जगतात धुमाकूळ घालणाऱ्या ‘या’ ५ नोकऱ्यांमध्ये मिळतो कोटींचा पगार……

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली
2

Lawyer Panel Recruitment 2026 : वकिलांसाठी सुवर्णसंधी! बीड विधिज्ञ पॅनल नियुक्तीसाठी अर्ज करण्याची मुदत वाढवली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.