एमएचटी सीईटी पीसीबी समूहा साठी सीईटी प्रवेश परीक्षा मंगळवारपासून सुरु होणार आहे (फोटो - istock)
Pune News : पुणे : सोनाजी गाढवे : राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षातर्फे २०२६ मध्ये घेतल्या जाणाऱ्या शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी औषधनिर्माणशास्त्र व कृषी शिक्षण याव्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या एमएचटी सीईटी पीसीबीसमूहा साठी सीईटी प्रवेश परीक्षा (CET Exam) मंगळवारपासून दि. २१ एप्रिल ते २६ एप्रिल २०२६ दरम्यानसहा दिवस सकाळी व दुपारी अशा दररोज दोन बॅच नुसार घेण्यात येत आहेत.
ही सीईटी परीक्षा संगणकाधारित पद्धतीने होत आहे. पीसीबी समूहाच्या सीईटीसाठी राज्यात ३६ जिल्ह्यातील १८९ परीक्षा केंद्रावर ही परीक्षा होत आहे यावर्षी प्रथमच राज्यातील विद्यार्थ्यांना पीसीबी समूहाच्या सीईटीसाठी दोन संधी मिळत आहेत. यातील पहिल्या संधीची सीईटी दि. २१ ते २६ एप्रिल २०२६ दरम्यान होत आहे. दुसऱ्या संधीची सीईटी दि. १० आणि ११ मे २०२६ रोजी होणार आहे. पहिल्या संधीनुसार २ लाख ८४ हजार ६३ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणारआहेत. तर दुसऱ्या संधीनुसार १ लाख ११ हजार ८०९ विद्यार्थी सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. व दोन्ही संधी मिळून ३ लाख ९५ हजार ८७२ विद्यार्थी पीसीबीसमूहाचीसीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत.
हे देखील वाचा : पुणे विद्यापीठातील परीक्षा विभागात गोंधळ, विद्यार्थ्यांमध्ये संताप; आंदोलनाचा दिला इशारा
पीसीबी समूहाच्या दुसऱ्या संधीच्या सीईटीसाठी नोंदणी न केलेल्या विद्यार्थ्यांसाठी एक विशेष बाब म्हणून दि. १५ आणि १६ एप्रिल २०२६ रोजी विशेष मुदतवाढ देण्यात आली होती. यामध्ये पीसीबी समूहासाठीच्या सीईटीसाठी ७ हजार १२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
पहिल्या संधीसाठी विद्यार्थ्यांची संख्या अधिक
यावर्षी पीसीबी समूहाच्यापहिल्या संधीच्या सीईटीसाठी २ लाख ८४ हजार ६३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. यावर्षीच्या नोंदणीमध्ये १ लाख १३ हजार २२ विद्यार्थी १ लाख ७१ हजार ३३ विद्यार्थिनी आहेत. म्हणजेचपीसीबी सीईटीला विद्यार्थ्यांपेक्षा ५८ हजार ११ विद्यार्थिनी अधिक आहेत. तसेच यामध्ये ८ तृतीयपंथी, २ हजार ५७० अनाथ विद्यार्थी आणि २ हजार ६४ दिव्यांग विद्यार्थी पीसीबीसमूहाची सीईटी प्रवेश परीक्षा देणार आहेत. मागील वर्षी पीसीबी समूहाच्यासीईटीच्या प्रवेश परीक्षेमध्ये ३ लाख १ हजार ७२ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती.
पीसीबी समूहाच्या सीईटी परीक्षेचे स्वरूप
पीसीबी समूहाचीही परीक्षा एकूण १८० मिनिटाची असूनती दोन भागात विभागलेली आहे. पहिले ९० मिनिटे भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र याविषयांसाठी असतील.हि९० मिनिटे पूर्ण झाल्यानंतर हा विभाग आपोआप सबमिट होईल. त्यानंतर पुढील ९० मिनिटे जीवशास्त्र याविषयासाठी असतील
हे देखील वाचा : कधी व कुठे चर्चा करायची? मोदींनाही चर्चेला बोलवा; प्रणिती शिंदेंनी CM फडणवीसांचे आव्हान स्वीकारले
मागील चार वर्षाची आकडेवारी
वर्ष – पीसीबी समूह (विद्यार्थ्यांची संख्या)






