UPL University (फोटो सौजन्य - X अकाउंट)
सामग्री विज्ञान आणि त्याच्याशी संबंधित क्षेत्रातील रासायनिक अनुप्रयोगांमधील संशोधनात क्रांती घडवून आणण्यासाठी ही भागीदारी आहे. या भागीदारीमुळे प्राध्यापक आणि विद्यार्थ्यांना अत्याधुनिक संशोधन सुविधा, विशेष कौशल्य आणि अमूल्य डेटा साधने मिळतील आणि संशोधनाला नवीन उंचीवर घेऊन जाणार आहे .
या भागीदारीबद्दल बोलताना ISRO चा SAC चे संचालक डॉ. नीलेश देसाई म्हणाले, “यूपीएल विद्यापीठासोबतचे आमचे सहकार्य वैज्ञानिक संशोधन आणि तंत्रज्ञानाच्या प्रगतीसाठी शैक्षणिक भागीदारीचे महत्त्व अधोरेखित करते. या भागीदारीमुळे समोर येणाऱ्या महत्त्वाच्या शोधांची आम्ही आतुरतेने वाट पाहत आहोत.” असे त्यांनी सांगितले. तसेच, या भागीदारीबद्दल श्री.विक्रम श्रॉफ, उपाध्यक्ष आणि सह-सीईओ, UPL समूह म्हणाले, “इसरोसोबत UPL विद्यापीठाची भागीदारी हे संशोधन आणि विकासाची संस्कृती विकसित करण्याच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे. शैक्षणिक समुदाय आणि उद्योग या दोघांनाही याचा फायदा होणार आहे. आजच्या जगातील आव्हानांना तोंड देण्यासाठी मोठ्या प्रमाणावर 170 हून अधिक सक्रिय सामंजस्य करार आणि भागीदारी केली आहे यात Lanxes India Private Limited, Lupin Ltd., Siemens Ltd. आणि Colourtex Ind. Pvt Ltd. अशा उद्याेग क्षेत्रातील आघाडीच्या कंपन्यांचा देखील यामध्ये समावेश आहे.” असे यांनी सांगितले.
UPL युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष अशोक पंजवानी यांनी देखील याबद्दल आपले मत मांडले आहे. ते म्हणाले की, “आम्ही ISRO सोबत सहयोग करण्यास उत्सुक आहोत, जे नवोन्मेष आणि संशोधन उत्कृष्टतेला चालना देण्याच्या आमच्या ध्येयाशी उत्तम प्रकारे संरेखित आहे. ही भागीदारी आमच्या विद्यार्थ्यांना आणि प्राध्यापकांना अत्याधुनिक संशोधनात गुंतण्यासाठी अद्वितीय संधी देखील उपलब्ध करून देणार आहे. यासह, UPL युनिव्हर्सिटी नवीन भागीदारी आणि सहयोग तयार करण्यासाठी नेहमीच उत्सुक असते, जे शैक्षणिक उत्कृष्टता, संशोधन नवकल्पना आणि सामाजिक प्रभावामध्ये एक आघाडीचा नेता म्हणून आमचे स्थान अधिक मजबूत करेल.” असे या बद्दल त्यांनी सांगतिले आणि आपले मत स्पष्ट केले आहे.
ISRO सोबतच, UPL विद्यापीठाने राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI) आणि इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी (ICT), मुंबई वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) सारख्या राष्ट्रीय संशोधन संस्थांसोबत सामंजस्य करार केले आहेत. हे सहकार्य पर्यावरण अभियांत्रिकी, रासायनिक विज्ञान, शाश्वत तंत्रज्ञान यासोबतच संशोधन क्षमता वाढवतात. त्याद्वारे, ते आपल्या उद्योगांच्या गरजा देखील पूर्ण करून देतात.
आंतरराष्ट्रीय पातळीचा विचार करताना, Gexcon (नॉर्वेमध्ये स्थित) यांच्या संस्थांसोबतची भागीदारी केमिकल इंडस्ट्रीमध्ये सुरक्षा मानके प्रगत करण्याच्या वचनबद्धतेला बळकट करते. या मजबूत इंडस्ट्री-ॲकॅडेमिया सहयोगामुळे प्लांट ऑपरेशनमधील अभ्यासक्रम आणि पर्यावरणीय अनुपालन, टिकाऊपणा, इन्स्ट्रुमेंटेशन, ऑटोमेशन, रोबोटिक्स, प्रक्रिया सुरक्षा आणि पाइपिंग अभियांत्रिकी यामधील पदव्युत्तर कार्यक्रम सार्थकपणे समृद्ध झाले आहेत.
तर देश पातळीवर, गुजरात क्लीनर प्रोडक्शन सेंटर (GCPC) आणि गांधीनगरमधील गुजरात एन्व्हायर्नमेंटल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट (GEMI) यांसारख्या संस्थांसोबतचे सहकार्य UPL ची शाश्वत विकास आणि पर्यावरणाप्रतीची वचनबद्धता अधोरेखित करण्यात आली आहे. या सहयोगी संशोधन प्रकल्प, प्रशिक्षण कार्यक्रम आणि ज्ञान देवाणघेवाण उपक्रम सुलभ करतात जे स्थानिक पर्यावरणीय आव्हानांना संबोधित करतात आणि शाश्वत पद्धतींना प्रोत्साहन देतात.






