Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC मुख्य परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू! ‘हा’ फॉर्म न भरल्यास परीक्षेला बसता येणार नाही? जाणून घ्या नियम

UPSC नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी 'DAF' अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. १९ ते २८ जून दरम्यान फॉर्म भरणे अनिवार्य असून, फी आणि नियम काय आहेत? वाचा सविस्तर

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 20, 2026 | 03:02 PM
UPSC

UPSC

Follow Us
Follow Us:

UPSC CSE Mains 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाची (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. आयोगाने नागरी सेवा मुख्य परीक्षेसाठी अर्ज प्रक्रिया सुरू केली आहे. जे उमेदवार पूर्व परीक्षेत यशस्वी झाले आहेत, त्यांना आता १९ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत सविस्तर अर्ज फॉर्म म्हणजेच ‘डीएएफ’ (DAF – Detailed Application Form) भरणे अनिवार्य आहे.

सर्व यशस्वी उमेदवारांना अधिकृत पोर्टलवर लॉगिन करून आपली माहिती पुन्हा पडताळून पाहावी लागेल आणि आवश्यक तपशील सादर करावा लागेल. याच कालावधीत परीक्षा शुल्क भरणे, लेखन सहायक संदर्भातील माहिती अपडेट करणे, साहाय्यक उपकरणांची मागणी नोंदवणे आणि कॅडरचा पसंतीक्रम (Cadder Preference) भरणे या सुविधाही उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

माध्यमांच्या अहवालानुसार, यंदा पूर्व परीक्षेत १३ हजारांहून अधिक उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत. आता या सर्व उमेदवारांना ‘डीएएफ’ भरणे बंधनकारक असेल.

परीक्षा शुल्क किती असेल?

सामान्य प्रवर्गातील उमेदवारांना २०० रुपये परीक्षा शुल्क द्यावे लागेल. तर महिला, अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि दिव्यांग प्रवर्गातील उमेदवारांना परीक्षा शुल्कातून सूट देण्यात आली आहे. UPSC ने स्पष्ट केले आहे की, जे उमेदवार विहित मुदतीत आपला ‘डीएएफ’ सादर करणार नाहीत, त्यांना नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ मध्ये बसू दिले जाणार नाही. तसेच प्रवेशपत्र (e-Admit Card) केवळ अशाच उमेदवारांसाठी जारी केले जाईल, ज्यांची अर्ज प्रक्रिया पूर्ण झालेली असेल.

Maharashtra Education: राज्यातील ४ लाख शिक्षकांना मिळणार गुगलचं ट्रेनिंग! सरकारच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांना होणार फायदा?

२१ ऑगस्टपासून मुख्य परीक्षेला सुरुवात

नागरी सेवा (मुख्य) परीक्षा २०२६ चे आयोजन २१ ऑगस्ट २०२६ पासून केले जाईल. या परीक्षेत एकूण ९ पेपर असतील. यातील भारतीय भाषा आणि इंग्रजीचे दोन पेपर केवळ पात्रता फेरीचे असतील, तर अंतिम गुणवत्ता यादी (Merit List) उर्वरित सात पेपरच्या एकूण १७५० गुणांच्या आधारे तयार केली जाईल.

या सात पेपरमध्ये एक निबंध, चार सामान्य अध्ययन (GS-I, GS-II, GS-III आणि GS-IV) आणि वैकल्पिक विषयाचे दोन पेपर समाविष्ट असतील. मुख्य परीक्षेत यशस्वी होणाऱ्या उमेदवारांना २७५ गुणांच्या मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत संकेतस्थळाला भेट देऊ शकतात.

NEET UG Re-Exam: नागपूरच्या विद्यार्थ्यांला केंद्र मिळालं थेट युएईमध्ये! एनटीएच्या या भोंगळ कारभारावर विद्यार्थ्यांचा संताप! 

Web Title: Upsc civil services mains 2026 daf registration process dates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 20, 2026 | 03:02 PM

Topics:  

  • Central Governement
  • government jobs
  • UPSC

संबंधित बातम्या

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू
1

Railway Recruitment: रेल्वेमध्ये नोकरीची सुवर्णसंधी! RRB NTPC UG भरती २०२६ अंतर्गत १,६८८ पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू

Sports Quota:  क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही
2

Sports Quota: क्रीडापटूंसाठी खूशखबर! CRPF मध्ये ५२१ जागांवर भरती; कोणतीही लेखी परीक्षा नाही

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.