Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 29 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

UPSC Prelims Result 2026: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर; १३,३४३ उमेदवार पात्र, मुख्य परीक्षेसाठी पुढे काय करायचं?

UPSC Prelims Result 2026: नागरी सेवा पूर्व परीक्षेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. या परिक्षेसाठी १३,३४३ उमेदवार पात्र असून त्यांनी मुख्य परीक्षेसाठी १९ ते २८ जून दरम्यान अर्ज करावेत.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Jun 16, 2026 | 09:23 AM
यूपीएससी

यूपीएससी

Follow Us
Follow Us:

UPSC Prelims Result 2026: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) सोमवारी नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ (Civil Services Preliminary Examination 2026) चा निकाल जाहीर केला आहे. यंदा या परीक्षेतून एकूण १३,३४३ उमेदवार मुख्य परीक्षेसाठी पात्र ठरले आहेत. ही पूर्व परीक्षा २४ मे २०२६ रोजी देशात घेण्यात आली होती.

काय आहे पुढील प्रक्रिया?

पूर्व परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या सर्व पात्र उमेदवारांना त्यांच्या अर्जातील तपशील अपडेट करण्यासाठी आणि काही नवीन माहिती भरण्यासाठी १९ जून ते २८ जून २०२६ या कालावधीत यूपीएससीच्या अधिकृत संकेतस्थळावर विंडो उपलब्ध करून दिली जाईल. या विंडोदरम्यान उमेदवारांना खालील गोष्टी करणे अनिवार्य आहे.

परीक्षा शुल्क: मुख्य परीक्षेच्या प्रवेशासाठी उमेदवारांना २०० रुपये शुल्क भरावे लागेल. (महिला, दिव्यांग, अनुसूचित जाती (SC) आणि अनुसूचित जमाती (ST) उमेदवारांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे).

विशेष सुविधा: उमेदवारांना लेखनिक (Scribe) तपशील, सहाय्यक उपकरणे आणि मोठ्या फॉन्टमधील प्रश्नपत्रिका (आवश्यकतेनुसार) याबद्दलची माहिती अपडेट करावी लागेल.

कॅडर पसंतीक्रम: उमेदवारांना नागरी सेवा मुख्य परीक्षा २०२६ साठी आपला संवर्ग पसंतीक्रम (Cadre Preference) भरावा लागेल.

‘लॉगिन’ करणे अनिवार्य; अन्यथा मुख्य परीक्षेला बसता येणार नाही!

आयोगाने स्पष्ट केले आहे की, ज्या उमेदवारांनी आधीच सर्व कागदपत्रे अपलोड केली आहेत आणि ज्यांच्या अर्जात कोणताही बदल नाही, त्यांनाही या पोर्टलवर ([https://upsconline.nic.in](https://upsconline.nic.in)) लॉगिन करून माहितीची पडताळणी करणे आणि फॉर्म सबमिट करणे बंधनकारक आहे.

IIT Bombay: JEE Advanced मध्ये ३२ वी रँक असूनही नाकारली आयआयटी मुंबई; जुळ्या भावाने एकाच निर्णयाने जिंकली देशाची मने!

४ फेब्रुवारी २०२६ च्या नागरी सेवा परीक्षा नियमांनुसार, जो उमेदवार दिलेल्या मुदतीत फॉर्म री-कन्फर्म किंवा सबमिट करणार नाही, त्याचे ई-ॲडमिट कार्ड (e-Admit Card) जनरेट केले जाणार नाही आणि त्याला पुढील परीक्षेला बसू दिले जाणार नाही.

कट-ऑफ आणि उत्तरतालिका कधी येणार?

यूपीएससीने माहिती दिली आहे की, नागरी सेवा पूर्व परीक्षा २०२६ चे गुण (Marks), कट-ऑफ (Cut-off Marks) आणि उत्तरतालिका (Answer Keys) अंतिम निकाल जाहीर झाल्यानंतरच उपलब्ध करून दिल्या जातील. म्हणजेच नागरी सेवा परीक्षा २०२६ आणि भारतीय वन सेवा परीक्षा २०२६ ची संपूर्ण प्रक्रिया पूर्ण झाल्यावरच हे तपशील वेबसाईटवर अपलोड केले जातील.

Central Bank Recruitment 2026: सेंट्रल बँकेत ४,५०० पदांची बंपर भरती; पदवीधरांसाठी सरकारी नोकरीची मोठी संधी, लवकर करा अर्ज!

मदत आणि संपर्क क्रमांक

उमेदवारांना या परीक्षेच्या संदर्भात काही माहिती किंवा स्पष्टीकरण हवे असल्यास, ते आयोगाच्या कॉल सेंटरशी ०११-४०३०३४४४ किंवा २४०४१००१ या क्रमांकावर सकाळी ९ ते रात्री ८ या वेळेत संपर्क साधू शकतात.

Web Title: Upsc prelims result 2026 declared candidates qualified main exam marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 16, 2026 | 09:23 AM

Topics:  

  • central goverment
  • education
  • UPSC

संबंधित बातम्या

Partur School Reality: परतूरच्या शाळेचा भोंगळ कारभार उघडा; कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार?
1

Partur School Reality: परतूरच्या शाळेचा भोंगळ कारभार उघडा; कर्मचाऱ्यांवर कारवाईची कुऱ्हाड कोसळणार?

Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव
2

Education News: ज्या जिल्ह्यांत ‘केंद्रीय विद्यालय’ नाही, तिथे नवीन शाळा सुरू होणार! शिक्षणमंत्र्यांचे केंद्र सरकारला प्रस्ताव

मोठी बातमी! लोकसभेत ‘परीक्षा सुधारणा विधेयक २०२६’ मंजूर; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला
3

मोठी बातमी! लोकसभेत ‘परीक्षा सुधारणा विधेयक २०२६’ मंजूर; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा विरोधकांवर घणाघाती हल्ला

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?
4

Rajesh Gopakumar: IIT-JEE Top केल्यानंतर सोडली इंजिनिअरिंग; कोण आहेत जगात डंका वाजवणारे भारतीय शास्त्रज्ञ राजेश गोपाकुमार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.