Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

TRTI प्रशिक्षण योजनेत अनियमिता; वैभव सोलनकर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेत अनियमितता होत असल्याचा आरोप सोलनकर यांनी केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 31, 2026 | 02:46 PM
TRTI प्रशिक्षण योजनेत अनियमिता; वैभव सोलनकर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

TRTI प्रशिक्षण योजनेत अनियमिता; वैभव सोलनकर यांचा गंभीर आरोप; मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी

Follow Us
Close
Follow Us:
  • TRTI प्रशिक्षण योजनेत अनियमिता
  • वैभव सोलनकर यांचा गंभीर आरोप
  • मुख्यमंत्र्यांकडे केली कारवाईची मागणी
पुणे : भारतीय जनता युवा मोर्चा, पुणे जिल्ह्याचे अध्यक्ष वैभव सोलनकर यांनी पुणे येथील आदिवासी संशोधन व प्रशिक्षण संस्था (TRTI) मार्फत राबविण्यात येत असलेल्या स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनेत गंभीर आर्थिक व प्रशासकीय अनियमितता होत असल्याचा आरोप केला आहे. वैभव सोलनकर यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन देत तात्काळ कारवाईची मागणी केली आहे.

 

वैभव सोलनकरांनी दिलेल्या माहितीनुसार, 16 फेब्रुवारी 2026 रोजी संबंधित प्राधिकरणाकडे सविस्तर तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर काही प्रशिक्षण संस्थांना नोटीस देण्यात आली असली, तरी ती केवळ स्पष्टीकरणापुरती मर्यादित असून कठोर कारवाईचा अभाव असल्याचे त्यांनी नमूद केले. विशेषतः Ignite Academy संदर्भातील तक्रारीवर कारवाई करण्यात विलंब झाल्याचाही त्यांनी आरोप केला आहे. या प्रकरणात शासकीय निधीचा संभाव्य अपहार, उपस्थिती नोंदीतील विसंगती, विद्यार्थ्यांची दिशाभूल, करार अटींचे उल्लंघन आणि निधीच्या वापरातील अपारदर्शकता अशा गंभीर बाबी निदर्शनास आल्याचे सोलनकर यांनी म्हटले आहे.

तसेच Infinity Academy, Ignite Academy या संस्थांना आवश्यक अनुभव व सुविधा नसतानाही पोलिस भरती प्रशिक्षणासाठी मोठ्या प्रमाणात जागा देण्यात आल्याचा गंभीर आरोपही त्यांनी केला आहे. दरम्यान, संबंधित संस्थांचे एम्पॅनलमेंट स्थगित न करणे, निधी वितरणावर कोणतीही स्थगिती न लावणे, विशेष लेखापरीक्षण न करणे आणि शिस्तभंग चौकशी समिती न नेमणे या बाबींवरही सोलनकर यांनी प्रशासनावर टीका केली आहे.

या पार्श्वभूमीवर, संबंधित संस्थांचे एम्पॅनलमेंट तात्काळ स्थगित करणे, वितरित निधीचे विशेष लेखापरीक्षण करणे, दोषींवर ब्लॅकलिस्टिंगची कारवाई करणे, तसेच प्रकरण अँटी करप्शन ब्युरोकडे वर्ग करणे आणि चौकशी पूर्ण होईपर्यंत निधी वितरण थांबविणे, अशा मागण्या सोलनकर यांनी केल्या आहेत.

हे सुद्धा वाचा : मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

Web Title: Vaibhav solankar has alleged irregularities in the trti training scheme

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 02:46 PM

Topics:  

  • BJP
  • CM Devedra Fadnavis
  • pune news

संबंधित बातम्या

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…
1

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर
2

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी
3

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी

भाजपा सरकार शेतकरी विरोधी, जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण; काँग्रेसची टीका
4

भाजपा सरकार शेतकरी विरोधी, जाहीर केलेली कर्जमाफी म्हणजे ‘लबाडाघरचे जेवण; काँग्रेसची टीका

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.