Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रासह देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- कागदोपत्री या व्यवहाराची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातील अत्यंत महागडा भाग असल्याने, या मालमत्तेची खरी किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 31, 2026 | 02:15 PM
LIVE
Maharashtra Breaking News Updates Today:

Maharashtra Breaking News Updates Today:

Follow Us
Close
Follow Us:
  • 31 Mar 2026 02:15 PM (IST)

    31 Mar 2026 02:15 PM (IST)

    माथेरान पर्यटन हंगामात मिनी ट्रेनवर ताण!

    ब्रिटिश काळापासून सुरू असलेली नेरळ-माथेरान नेरळ ‘मिनी ट्रेन आबालवृद्ध पर्यटकांची लाडकी समजली जाते. या ट्रेनची संख्या गेल्या दोन वर्षापासून कायम असल्याने पर्यटकांना ‘मिनी ट्रेन’ मधून प्रवास करता येत नाही. त्याचवेळी या मार्गावर पूर्वी चार ते पाच गाड्या चालवल्या जायच्या. आता मात्र मिनी ट्रेनच्या दोनच फेऱ्या नेरळ-माथेरान-नेरळ मार्गावर सुरू आहेत. दरम्यान, शाळांना सुट्टया पडल्यानंतर माथेरानचा पर्यटन हंगाम सुरू होत असतो. त्यामुळे पुढील दोन अडीच महिने नेरळ-माथेरान नेरळ मार्गावर अधिकच्या फेऱ्या व्हाव्यात, अशी मागणी पर्यटक आणि माथेरान मधील व्यावसायिक करीत आहेत.

  • 31 Mar 2026 02:10 PM (IST)

    31 Mar 2026 02:10 PM (IST)

    ‘एकदम बकवास…’ सौंदर्या शर्माच्या डान्स मूव्ह्स बघून ट्रोलर्सचा संताप

    ‘बिग बॉस’ या रिॲलिटी शोमुळे प्रसिद्धी मिळवलेली सौंदर्या शर्मा सध्या तिच्या नृत्यकौशल्यामुळे चर्चेत आहे. ती नुकतीच हनी सिंगच्या कॉन्सर्टमध्ये दिसली, जिथे तिने आपल्या नृत्यकौशल्याने स्टेज गाजवला. तिला हनी सिंगच्या लाईव्ह कॉन्सर्टदरम्यान परफॉर्म करण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते आणि अभिनेत्रीने आपली भूमिका उत्कृष्टपणे पार पाडली. कॉन्सर्टमधील प्रेक्षकांना तिचा डान्स खूप आवडला, पण तिच्या परफॉर्मन्सचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच खळबळ उडाली आहे. अभिनेत्रीला मोठ्या प्रमाणात ट्रोल केले जात आहे. आणि नेटकरी सोशल मीडियावर संतापले आहेत.

  • 31 Mar 2026 02:00 PM (IST)

    31 Mar 2026 02:00 PM (IST)

    बजेट रेंजमध्ये देशी कंपनीचा धमाका! 50MP कॅमेरा आणि 5000mAh बॅटरीसह नवा स्मार्टफोन लाँच

    टेक कंपनी लावाने भारतीय बाजारात आज 31 मार्च रोजी एक नवीन स्मार्टफोन लाँच केला आहे. बजेट किंमतीत उपलब्ध असणाऱ्या या स्मार्टफोनचे नाव Lava Bold N2 Pro 4G असं आहे. कंपनीने या स्मार्टफोनमध्ये अनेक खास आणि अपग्रेड फीचर्स दिले आहेत. हा स्मार्टफोन बजेट रेंजमध्ये लाँच करण्यात आला असून त्याची किंमत 8 हजार रुपयांहून कमी आहे. लावाच्या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनमध्ये 6.67 इंच HD+ LCD डिस्प्ले दिला आहे. Bold N2 Pro 4G च्या रिअरमध्ये 50 मेगापिक्सेलचा AI प्राइमरी कॅमेरा आणि सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 8 मेगापिक्सेलचा फ्रंट कॅमेरा दिला आहे. कंपनीने लाँच केलेल्या नवीन Lava Bold N2 Pro 4G स्मार्टफोनचे फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स आणि किंमत जाणून घेऊया.

  • 31 Mar 2026 01:55 PM (IST)

    31 Mar 2026 01:55 PM (IST)

    अनुपम खेर यांनी ‘Dhurandhar 2 ’ला प्रोपगंडा म्हणणाऱ्यांना सुनावले खडेबोल

    बॉलीवूड अभिनेता रणवीर सिंग सध्या त्याच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘धुरंधर २’ या चित्रपटामुळे चर्चेत आहे. रणवीर सिंगचा चित्रपट एकापाठोपाठ एक बॉक्स ऑफिस विक्रम मोडत आहे. नुकताच या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १००० कोटी रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. या कमाईच्या आकड्यांनी लोकांना आश्चर्यचकित केले आहे. चित्रपटाच्या कमाईसोबतच, लोक चित्रपटाची कथा आणि ॲक्शन दृश्यांबद्दलही बोलताना दिसत आहेत. सामान्य लोकांसोबतच, बॉलीवूड कलाकारही ‘धुरंधर २’ चे कौतुक करताना दिसले आहेत. दरम्यान, अनुपम खेर यांचे एक वक्तव्य समोर आले आहे, ज्यामुळे सोशल मीडियावर खळबळ उडाली आहे.

  • 31 Mar 2026 01:50 PM (IST)

    31 Mar 2026 01:50 PM (IST)

    मार्कशिट आणि सर्टिफिकेट्सची आता मिळणार एकच प्रत; हजारो विद्यार्थ्यांना होणार फायदा

    महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक अत्यंत सकारात्मक आणि दिलासादायक निर्णय घेतला आहे. फेब्रुवारी-मार्च २०२६ च्या परीक्षेला बसलेल्या विद्यार्थ्यांपासून आता ‘गुणपत्रक’ आणि ‘प्रमाणपत्र’ ही दोन स्वतंत्र कागदपत्रे न देता, ती दोन्ही एकत्रित स्वरूपात एकाच प्रतीवर दिली जाणार आहेत. राज्य मंडळाचे सचिव डॉ. दीपक माळी यांनी ही महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे.

  • 31 Mar 2026 01:45 PM (IST)

    31 Mar 2026 01:45 PM (IST)

    बिग बॉसच्या घरातील वातावरण पुन्हा तापलं, राखी- राकेशचं कडाक्याचं भांडण

    बिग बॉस मराठीचा सीझन ६ शेवटच्या टप्प्यात आला आहे. सहाव्या सीझनमध्ये सध्या सतत भांडण, राडे पाहायला मिळत आहेत. याच आठवड्यात राकेश आणि विशालमध्ये मोठे भांडण झाल्याचे पाहायला मिळाले. या दोघांचे भांडण इतके वाढले की हे दोघेही एकमेकांच्या अंगावर धावून गेले होते. यानंतर बिग बॉसने या दोघांनाही शिक्षाही सुनावली. या दोघांमध्ये कोण बरोबर आहे यावर प्रेक्षकांनी त्यांची मते मांडली होती. या सगळ्यात नुकताच कलर्स मराठीने एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोत दिसत आहे की घरात आणखी एक मोठे भांडण होणार आहे. यात राखी सावंत आणि राकेश बापटचे कडाक्याचे भांडण होत असल्याचे दिसत आहे.

  • 31 Mar 2026 01:35 PM (IST)

    31 Mar 2026 01:35 PM (IST)

    बिहारमधील शीतळा देवी मंदिरात चेंगराचेंगरी; 8 महिलांचा दुर्दैवी मृत्यू

    बिहारच्या नालंदा जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. नालंदा येथील शीतळा देवी मंदिरामध्ये भाविकांची चेंगराचेंगरी झाली आहे. या चेंगराचेंगरीत किमान आठ महिलांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, दर मंगळवारी शीतळा देवी मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी जमते. आज चैत्र महिन्याचा शेवटचा मंगळवार असल्याने गर्दी आणखी वाढली होती. अचानक चेंगराचेंगरी झाली, त्यामुळे लोक पळून जाऊ लागले मात्र यामुळे अनेक महिला चिरडून मरण पावल्या आहेत.

  • 31 Mar 2026 01:25 PM (IST)

    31 Mar 2026 01:25 PM (IST)

    शिवसेनेची विभागीय संपर्कप्रमुखांची घोषणा; तीन कॅबिनेट मंत्र्यांवर सोपवली महत्वाची जबाबदारी

     शिवसेनेने राज्यातील विभागीय संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केली आहे. यात मंत्री भरत गोगावले, मंत्री प्रकाश आबिटकर आणि मंत्री संजय राठोड, आमदार डॉ. मनीषा कायंदे, आमदार किरण सामंत यांच्यावर पक्षाने महत्वाची जबाबदारी सोपवली आहे. माजी आमदार दगडू सकपाळांची पश्चिम महाराष्ट्राच्या विभागीय संपर्कप्रमुख पदी निवड करण्यात आली आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या आशीर्वादाने शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार शिवसेना विभागीय जिल्हा संपर्कप्रमुख आणि सह संपर्कप्रमुखांची घोषणा केल्याचे निवेदन पक्षाने जारी केले आहे. उत्तर कोकण विभागीय संपर्क प्रमुखपदी मंत्री भरत गोगावले यांची तर सह संपर्कप्रमुख पदी प्रदीप खाडे यांची नियुक्ती केली आहे. पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुखपदाची जबाबदारी दगडू सकपाळ यांच्यावर तर सह संपर्कप्रमुख पदाची जबाबदारी हनुमंत जगदाळे यांच्यावर सोपवली आहे.

  • 31 Mar 2026 01:15 PM (IST)

    31 Mar 2026 01:15 PM (IST)

    मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी; कोकणच्या कोळंबीची सातासमुद्रापार मोहिनी

    भारताच्या मत्स्यशेतीच्या क्रांतीमध्ये महाराष्ट्राने आपले महत्त्वाचे स्थान पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. 2024-25 या आर्थिक वर्षात राज्याने तब्बल 7 हजार 343 कोटी 40 लाख रुपयांच्या समुद्री उत्पादनांची निर्यात केली आहे. केंद्र सरकारच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या पाच वर्षांत महाराष्ट्राच्या मत्स्य निर्यातीत लक्षणीय वाढ झाली आहे. 2020-21 मध्ये 3 हजार 684 कोटी असणारी ही निर्यात आता दुप्पट झाली असून, निर्यातीच्या परिमाणातही मोठी वाढ होऊन ती वार्षिक2.27 लाख मेट्रिक टन वर पोहोचली आहे.राज्यातील कोकण किनारपट्टीवरील मत्स्यव्यवसाय हा जागतिक मागणीचा मोठा हिस्सा पूर्ण करत असून मत्स्य निर्यातीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या स्थानी झेप घेतली आहे.

  • 31 Mar 2026 01:06 PM (IST)

    31 Mar 2026 01:06 PM (IST)

    फक्त 3 मिनिटांत रिक्षाच बनेल स्कूटर! Hero कंपनीचं भन्नाट ‘इनोव्हेशन’

    पेट्रोल आणि डिझेलच्या किमती वाढतच चालल्या आहेत. त्यामुळे वाढत्या किमतींमुळे आता लोक इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहेत. या सगळ्या परिस्थितीमुळे Hero MotoCorp ने भारतात एक नवीन अनोखं ‘इनोव्हेशन’ आणलं आहे. Hero Surge S32 असे या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव आहे. हे देशातील पहिली 2-in-1 इलेक्ट्रिक गाडी असणार आहे. ही गाडी गरजेनुसार स्कूटर आणि कधी रिक्षा अशा दोन्ही स्वरूपात बदलता येणार आहे. यामुळे तुम्ही एकाच गाडीचा वापर वैयक्तिक कामासाठी आणि व्यावसायिक कमाईसाठी म्हणजे मालवाहतूक किंवा प्रवासी स्वरुपासाठी करू शकता. आणि या अनोख्या स्कीमला सरकारनेही ग्रीन सिग्नल दाखवला आहे.

  • 31 Mar 2026 01:00 PM (IST)

    31 Mar 2026 01:00 PM (IST)

    तीर्थंकर म्हणजे काय?

    “तीर्थंकर” म्हणजे असा महान आत्मा जो जन्म-मृत्यूच्या चक्रातून मुक्त होऊन इतरांना देखील मुक्तीचा मार्ग दाखवतो. त्यांनी अहिंसा, सत्य, अपरिग्रह, ब्रह्मचर्य आणि अस्तेय या पंचमहाव्रतांचा उपदेश केला.

  • 31 Mar 2026 12:50 PM (IST)

    31 Mar 2026 12:50 PM (IST)

    कराडच्या लेकींची आयआयटी मुंबईच्या स्पर्धेत बाजी! ‘इकोपल्स बस स्टॉप’ प्रकल्पाला राज्यस्तरावर प्रथम क्रमांक

    शिक्षण क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयाने राज्यस्तरीय संशोधन स्पर्धेत दुहेरी यश संपादन करत आपली गुणवत्ता पुन्हा अधोरेखित केली आहे. वारणानगर (जि. कोल्हापूर) येथे आयोजित या स्पर्धेत महाविद्यालयाच्या विद्यार्थिनींनी प्रथम आणि द्वितीय क्रमांक पटकावला.

  • 31 Mar 2026 12:45 PM (IST)

    31 Mar 2026 12:45 PM (IST)

    ट्रम्प यांची धमकी अन् २४ तासांत ॲक्शन सुरु; इराणच्या सर्वात मोठ्या लष्करी तळाचे झाले तुकडे, VIDEO VIRAL

    वॉशिंग्टन/तेहरान : मध्यपूर्वेत युद्धाचा भडका उडाला आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी स्ट्रेट ऑफ होर्मुझवरुन दिलेल्या इशाऱ्यानंतर २४ तासांत इराणविरोधात मोठी कारवाई करण्यात आली आहे. इराणच्या इस्फाहन शहरावर भयंकर हल्ला झाला असून याचा एक व्हिडिओ देखील ट्रम्प यांनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. यामुळे संपूर्ण जगभरात खळबळ माजली आहे.

  • 31 Mar 2026 12:40 PM (IST)

    31 Mar 2026 12:40 PM (IST)

    कधी काळी कुरुप मानला जाणारा ‘Eiffel Tower’ आज आहे जगाचे आकर्षण; जाणून घ्या या ऐतिहासिक वास्तूची काही रंजक तथ्ये

    आज फ्रान्सची आणि जगाची शान मानला जाणारा सर्वात प्रसिद्ध आणि प्रेक्षणीय स्थळ आयफेल टॉवरचा वाढदिवस आहे. आजच्या दिवशी ३१ मार्च १८८९ मध्ये या वास्तूचे उद्घाटन करण्यात आले होते. यामुळे हा दिवस आयफेल टॉवर डे म्हणून साजरा केला जाता. आयफेल टॉवर हा आज केवळ फ्रान्सच नाही, तर संपूर्ण जगाचे आकर्षण केंद्र बिंदू आहे. एकेकाळी या टॉवरला कुरुप मानले जायचे, पण आज या टॉवरला पाहण्यासाठी जगभरातून लोक येतात. आज आपण या आयफेल टॉवरची काही रंजक अशी तथ्ये जाणून घेणार आहोत.

  • 31 Mar 2026 12:35 PM (IST)

    31 Mar 2026 12:35 PM (IST)

    “तेव्हा खरातचे पाय पुसायला जायचात अन् आता..; रुपाली चाकणकरांवर अंजली दमानिया भडकल्या

    नाशिकचा भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणातील (Ashok Kharat Case) दोन नवी प्रकरणे समोर येत आहेत. अंधश्रद्धेच्या नावाखाली अशोक खरातने शेकडो महिलांवर अत्याचार केले आहेत. याच खरातच्या भक्त असलेल्या रुपाली चाकणकर देखील वादाच्या भोवऱ्यात अडकल्या आहेत. त्यांना राज्य महिला आयोग आणि राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा द्यावा लागला. या प्रकरणी चाकणकर या एसआयटी चौकशीला सामोरे जाणे टाळत आहेत. यामुळे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानियांनी (Anjali Damania) त्यांच्यावर जोरदार प्रहार केला आहे.

  • 31 Mar 2026 12:30 PM (IST)

    31 Mar 2026 12:30 PM (IST)

    भक्तांच्या श्रद्धेचा बाजार! अशोक खरातचा ५ लाखांचा ‘विजिटिंग चार्ज

    महिलांची फसवणूक करणारा भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास जसजसा पुढे जात आहे. तसतसा त्याच्या काळ्या आणि धक्कादायक कारामाने उघडकीस येत आहेत. नुकत्याच हाती आलेल्या माहितीनुसार, भोंदू बाबा अशोक खरात तब्बल पाच लाख रुपये फी घ्यायचा. इतकेच नव्हे तर त्याची आलीशान जीवनशैली आणि लोकांची फसवणूकीचे अनेक प्रकारही या तपासात समोर आले आहेत.

  • 31 Mar 2026 12:30 PM (IST)

    31 Mar 2026 12:30 PM (IST)

    ‘बकुट’ डाव की धोकादायक प्रहार? कुस्तीतील नव्या वादाने खेळाडूंच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

    मैदानी कुस्तीमध्ये वापरल्या जाणाऱ्या ‘बकुट’ (कसाटा) डावामुळे वादंग निर्माण झाला आहे.  मूळतः प्रतिस्पर्ध्याचा तोल बिघडवण्यासाठी आणि नियंत्रणासाठी वापरला जाणारा हा डाव केला जातो.अलिकडे कानाजवळ जोरात केलेल्या चुकीच्या प्रहारामुळे पैलवान मैदानात हातघाईवर येण्याच्या घटना वाढत चालल्या आहेत. कुस्ती क्षेत्रात बकुट डावाबद्दल नियम स्पष्ट करण्याची मागणी जोर धरत आहे.

  • 31 Mar 2026 12:25 PM (IST)

    31 Mar 2026 12:25 PM (IST)

    20 गुंठे जमिनीच्या वादातून भावाचा संताप अनावर; वडील आणि भावाची कुऱ्हाडीने निर्घृण हत्या

    कोल्हापूर येथून एक धक्कादायक घटना समोर केली आहे. २० गुंठे जमिनीच्या वादातून भावानेच आपल्या सख्ख्या भावाची आणि वडिलांची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील हिंगणगाव येथे घडली. या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. शीतल मारुती कुंडले आणि मारुती कुंडले अशी हत्या झालेल्या दोघांची नावे आहेत. हत्या केल्यांनतर आरोपी स्वतः पोलीस ठाण्यात हजर झाला.

  • 31 Mar 2026 12:20 PM (IST)

    31 Mar 2026 12:20 PM (IST)

    कराडात 8 तासांत 35 अतिक्रमणे हटवली; पालिकेची धडक कारवाई

    शहरातील वाढत्या अतिक्रमणांवर नियंत्रण मिळवण्यासाठी कराड नगरपालिकेने सोमवारी व्यापक मोहीम राबवत कृष्णा नाका ते बसस्थानक या गजबजलेल्या पट्ट्यात धडक कारवाई केली. सकाळी दहा वाजता सुरू झालेली ही मोहीम सायंकाळी सहा वाजेपर्यंत अखंड सुरू होती. या आठ तासांच्या कारवाईत तब्बल ३५ अतिक्रमणांवर हातोडा टाकण्यात आला.

  • 31 Mar 2026 12:10 PM (IST)

    31 Mar 2026 12:10 PM (IST)

    हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

    राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हुक्का फ्लेवरचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्याचा दावा करत ठाणे आणि पुणे येथे केलेली कारवाई आता स्वतः विभागासाठीच एक डोकेदुखी ठरली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी हस्तक्षेप करून जप्त केलेला माल सोडण्याकरीता सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे.

  • 31 Mar 2026 11:50 AM (IST)

    31 Mar 2026 11:50 AM (IST)

    हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

    राज्याचे अन्न व औषध प्रशासन (एफडीए) पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. हुक्का फ्लेवरचा कच्चा माल हा खाद्यपदार्थ असल्याचा दावा करत ठाणे आणि पुणे येथे केलेली कारवाई आता स्वतः विभागासाठीच एक डोकेदुखी ठरली आहे. हे प्रकरण दिवसेंदिवस वाढत चालले असल्याने दस्तुरखुद्द वैद्यकीय शिक्षण विभागाचे सचिव धीरज कुमार यांनी हस्तक्षेप करून जप्त केलेला माल सोडण्याकरीता सहमती दर्शवणारे प्रतिज्ञापत्र उच्च न्यायालयात दाखल करावे लागल्याची माहिती आता समोर आली आहे.

  • 31 Mar 2026 11:40 AM (IST)

    31 Mar 2026 11:40 AM (IST)

    प्रेमप्रकरणातून तरुणाची आत्महत्या; मुलीच्या घरच्यांकडून मारहाण व बदनामीमुळे टोकाचा निर्णय

    बीड येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका २३ वर्षीय तरुणाने प्रेमसंबंधाच्या वादातून आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. ज्ञानेश्वर तुकाराम कोकाटे (वय 23) असे मृत तरुणाचे नाव आहे. प्रेयसीच्या नातेवाईकांकडून झालेल्या मारहाणीमुळे आणि मानसिक छळामुळे त्याने हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक माहिती समोर येत आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे. सुसाईडनोट सापडली आहे.

  • 31 Mar 2026 11:30 AM (IST)

    31 Mar 2026 11:30 AM (IST)

    भारतातील पहिल्या महिला डॉ. आनंदीबाई जोशी जयंती; जाणून घ्या 31 मार्चचा इतिहास

    भारतातील पहिल्या महिला डॉक्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या डॉ. आनंदीबाई जोशी यांची आज जयंती. त्यांचा जन्म ३१ मार्च १८६५ रोजी झाला. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी शिक्षणाची कास धरली आणि समाजातील रूढी-परंपरांना आव्हान दिले. लहान वयातच विवाह झाल्यानंतरही त्यांच्या पती गोपाळराव जोशी यांनी त्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन दिले. त्या काळात महिलांना शिक्षण घेणेही कठीण असताना त्यांनी परदेशात जाऊन वैद्यकीय शिक्षण घेतले. अमेरिकेतील ‘वुमन्स मेडिकल कॉलेज ऑफ पेंसिल्वेनिया’ येथून त्यांनी डॉक्टर पदवी मिळवली.

  • 31 Mar 2026 11:20 AM (IST)

    31 Mar 2026 11:20 AM (IST)

    होर्मुझवर इराणचा ताबा खपवून घेणार नाही’ ; अमेरिकेचा थेट युद्धाचा इशारा

    गेल्या एक महिन्यापासून मध्यपूर्वेत प्रचंड तणावाचे वातावरण आहे. या तणावामुळे जागतिक स्तरावर चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. इराणने होर्मुझ सामुद्रधुनीवर ताबा अद्याप सोडला नसल्याचे अमेरिका देखील संतप्त झाली आहे. याच पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी इराणला शेवटचा इशारा दिला आहे. तसेच परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी देखील इराणला कडक शब्दात सुनावले आहे.

  • 31 Mar 2026 11:10 AM (IST)

    31 Mar 2026 11:10 AM (IST)

    तुमचा डिजिटल डेटा कसा ठेवाल सुरक्षित? बॅकअप घेण्याची सोपी पद्धत कोणती? वाचा सविस्तर

    सध्याच्या डिजीटल काळात आपण आपले फोटो, व्हिडीओ आणि महत्त्वाच्या फाईल्स आपल्या स्मार्टफोनमध्ये सुरक्षितरित्या स्टोअर करून ठेवतो. मोबाईल किंवा लॅपटॉपमध्ये स्टोअर केलेल्या या फाईल्स आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाच्या असतात. पण तुम्ही कधी विचार केला आहे का की, जर तुमच्या लॅपटॉप आणि फोनमधील संपूर्ण डेटा अचानक गायब झाला तर? जर हार्ड ड्राईव्ह खराब झाले, फोन हरवला, सिस्टिम क्रॅश झाली तर अशा समस्या निर्माण होऊ शकतात. या समस्यांवरील उपाय म्हणजे बॅकअप. जर तुम्ही आधीच सर्व फोटो, व्हिडीओ आणि फाईल्सचे बॅकअप घेतले असेल तर ही समस्या तुम्हाला भेडसावणार नाही.

  • 31 Mar 2026 11:00 AM (IST)

    31 Mar 2026 11:00 AM (IST)

    दुसऱ्या सोमवारीही Dhurandhar 2 चा धबधबा; ‘KGF 2’ला दिली टक्कर

    रणवीर सिंगचा ‘धुरंधर २’ हा चित्रपट प्रदर्शित झाल्यापासून बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आहे. हा चित्रपट केवळ कमाईचे नवीन टप्पेच गाठत नाही, तर एक-एक करून मागील बॉक्स ऑफिस विक्रमही मोडीत काढत आहे. या चित्रपटाने अवघ्या १० दिवसांत १०० कोटी, २०० कोटी, ३०० कोटी आणि अगदी ६०० कोटींची कमाई केली आणि आता त्याची कमाई वेगाने वाढत आहे. हा चित्रपट आता ९०० कोटींचा टप्पा गाठण्याच्या तयारीत आहे, आणि तो हा टप्पा कधी गाठेल? हा एक प्रश्नच आहे. पण त्याआधी, या चित्रपटाची एकूण कमाई आपण जाणून घेणार आहोत, तसेच या चित्रपटाने ‘KGF 2’ ला देखील मागे टाकले आहे.

  • 31 Mar 2026 10:48 AM (IST)

    31 Mar 2026 10:48 AM (IST)

    Mumbai Crime: नालासोपाऱ्यात पोत्यात सापडला शिरविरहित मृतदेह

    नालासोपारा: नालासोपारा येथून एक धक्कादायक घटना उघडकीस आला आहे. एका निर्जनस्थळी पोत्यात शीर नसलेला मृतदेह आदळून आल्याचे समोर आले आहे. मृतदेह पेल्हार पोलीस ठाणे परिसरात आढळला आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

    काय घडलं नेमकं?

    सोमवारी सकाळी ९ वाजताच्या सुमारास मुंबई- अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गाजवळ आणि प्रभात ओएट्रोल पंपानजीक अंबा पाडा येथील वस्तीचा भाग असलेल्या ठिकाणी अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. नागरिकांनी तात्काळ पोलिसांना या घटनेची माहिती दिली. पोलीस माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. फॉरेन्सिक पथक आणि श्वानपथक देखील घटनास्थळी दाखल झाले.

  • 31 Mar 2026 10:36 AM (IST)

    31 Mar 2026 10:36 AM (IST)

    भोंदू खरात प्रकरणात रुपाली चाकणकर चौकशीला हजर राहणार का?

    नाशिक: भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला असून, एसआयटीने (SIT) त्याच्या मोबाईलमधील डिलीट केलेला डेटा रिकव्हर केला आहे. या डेटामधून खरातचे कोणाशी चॅटिंग सुरू होते, तो कोणाच्या सतत संपर्कात होता आणि त्यांच्यात नेमके काय संभाषण झाले, याची खळबळजनक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

    खरातच्या मोबाईलमधील कॉल रेकॉर्ड्स आणि चॅट्सच्या आधारे एसआयटी नवीन धागेदोरे शोधत आहे. या तपासाचा सविस्तर तपशील उद्या न्यायालयात सादर केला जाणार आहे.या प्रकरणात राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे नाव चर्चेत आले आहे. एसआयटीने त्यांना जबाब नोंदवण्यासाठी समन्स बजावले असून, त्या आज नाशिकमध्ये हजर राहणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.  खरातला १ एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून, मोबाईलमधील 'कोडवर्ड'मधील नंबर डिकोड करण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे.

Maharashtra to World Breaking News: 

भोंदू बाबा खरातचे  कोरेगाव पार्कमधील आलिशान रो-हाऊसमुळे खळबळ

पुणे/नाशिक: नाशिकचा वादग्रस्त भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्याचे धागेदोरे आता पुण्यातील उच्चभ्रू कोरेगाव पार्क परिसरापर्यंत पोहोचले आहेत. खरातचा सीए प्रकाश पोफळे याने २०२४ मध्ये कोरेगाव पार्कमध्ये ८ रो-हाऊसेस आणि ४९ गुंठे जागा खरेदी केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

 कागदोपत्री या व्यवहाराची किंमत १९ कोटी ५६ लाख रुपये दाखवण्यात आली आहे. कोरेगाव पार्क हा पुण्यातील अत्यंत महागडा भाग असल्याने, या मालमत्तेची खरी किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक असल्याचे बोलले जात आहे. सीएकडे इतकी मोठी रक्कम कुठून आली? खरात आपल्या सीएच्या माध्यमातून काळा पैसा पांढरा करत होता का? असे गंभीर प्रश्न आता उपस्थित होत आहेत.

 

Web Title: Maharashtra breaking news 31st march live updates maharashtra politics national international politics crime viral video ipl 2026 breaking in marathi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 31, 2026 | 10:32 AM

Topics:  

  • India news
  • maharashtra breaking news
  • Maharashtra Politics
  • Mumbai News
  • pune news

संबंधित बातम्या

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…
1

मावळ, मुळशी, हवेलीचा चेहरामोहरा बदलणार, पीएमआरडीएकडून विकास आराखडा जाहीर; पर्यटनासाठी तब्बल…

Mumbai News:  हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की
2

Mumbai News: हुक्का फ्लेवर ‘खाद्यपदार्थ’ कसा? एफडीएच्या अजब कारवाईमुळे राज्य सरकारवर ओढवली नामुष्की

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी
3

Pune College Student Death : मेसमधील फिल्टरचा जोरदार धक्का बसून आष्टीच्या चैतन्य चव्हाणचा बळी

हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना
4

हॉटेल चालकांनो सावधान ! गॅस टंचाईच्या नावाखाली ग्राहकांकडून जादा पैसे घेणं पडणार महागात; CCPAकडून कडक सूचना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.