Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

खेळाडूंसाठी मोठी संधी! पश्चिम रेल्वेत ‘Sports Quota’ अंतर्गत बंपर भरती जाहीर; जाणून घ्या अर्ज प्रक्रिया..

Western Railway Sports Quota Bharti 2026: पश्चिम रेल्वे (Western Railway) रेल्वे रिक्रूटमेंट सेलतर्फे वर्ष २०२६-२७ साठी स्पोर्ट्स कोटा अंतर्गत ६४ रिक्त पदांची भरती जाहीर झाली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाइन अर्जाची सविस्तर माहिती जाणून घ्या.

  • By श्रेया देशमुख
Updated On: Aug 27, 2026 | 04:26 PM
sport quota

sport quota

Follow Us
Follow Us:

Western Railway Sports Quota Bharti 2026: पश्चिम रेल्वे अंतर्गत खेळात प्राविण्य मिळवलेल्या देशातील पात्र खेळाडूंसाठी एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आली आहे. रेल्वे रिक्रूटमेंट सेल (RRC-WR) द्वारे वर्ष २०२६-२७ साठी ‘स्पोर्ट्स कोटा’ अंतर्गत जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या भरती प्रक्रियेद्वारे एकूण ६४ रिक्त पदांसाठी ऑनलाइन अर्ज मागविण्यात येत आहेत.

१. पदांचा तपशील आणि विभागणी

या अधिसूचनेनुसार विविध क्रीडा प्रकारांसाठी एकूण ६४ जागा भरल्या जाणार असून, यामध्ये खालीलप्रमाणे प्रवर्ग निहाय पदे आहेत:

  • गट ‘क’ (Group C – Level 5/4): ५ पदे
  • गट ‘क’ (Group C – Level 3/2): १६ पदे
  • गट ‘ड’ (Group D – Level 1): ४३ पदे
विशेष टीप: या भरती प्रक्रियेमध्ये SC, ST, OBC, EWS किंवा PwBD आणि Ex-SM प्रवर्गासाठी कोणतेही वेगळे आरक्षण नाही, ही भरती पूर्णपणे ओपन प्रवर्गाच्या निकषांवर होईल.

२. महत्त्वाच्या तारखा

ऑनलाइन अर्ज सुरू होण्याची तारीख: १ सप्टेंबर २०२६, सकाळी १०:०० वाजता

ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम तारीख: ३० सप्टेंबर २०२६, सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत

३. वयोमर्यादा व पात्रता निकष

अर्ज करणाऱ्या उमेवाराचे वय १ जानेवारी २०२७ रोजी किमान १८ वर्षे आणि कमाल २५ वर्षे असणे आवश्यक आहे. म्हणजेच उमेदवाराचा जन्म १ जानेवारी २००२ ते १ जानेवारी २००९ या कालावधी दरम्यान झालेला असावा.

शैक्षणिक पात्रता:

लेव्हल ५/४ साठी: मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी आवश्यक.

लेव्हल ३/२ साठी: १२वी (किंवा समतुल्य) परीक्षा उत्तीर्ण किंवा मॅट्रिकसह आयटीआय (ITI) अप्रेन्टिसशिप पूर्ण केलेले असणे आवश्यक.

लेव्हल १ साठी: १०वी उत्तीर्ण किंवा आयटीआय / नॅशनल अप्रेन्टिसशिप प्रमाणपत्र (NAC) धारक.

GATE 2027: गेट परीक्षेची अर्ज प्रक्रिया सुरू; जाणून घ्या पात्रता, अटी आणि परीक्षा पॅटर्न..

४. क्रीडा पात्रता निकष (Sports Achievements)

उमेदवारांनी १ एप्रिल २०२४ ते अधिसूचनेच्या तारखेपर्यंत मान्यताप्राप्त चॅम्पियनशिपमध्ये आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय किंवा राज्य स्तरावर क्रीडा प्राविण्य मिळवलेले असणे आणि ते सध्या सक्रिय खेळाडू असणे अनिवार्य आहे. यामध्ये ॲथलेटिक्स, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, जिम्नॅस्टिक्स, वेटलिफ्टिंग, रेसलिंग, बॉक्सिंग, बास्केटबॉल, स्वॅमिंग यांसारख्या विविध खेळांचा समावेश आहे.

५. अर्ज फी आणि निवड प्रक्रिया

अर्ज फी: सर्वसाधारण व इतर उमेदवारांसाठी ५०० रुपये आहे.  तसेच महिला, SC, ST, अल्पसंख्याक आणि आर्थिक मागासवर्गीय (EBC) उमेदवारांसाठी २५० रुपये फी असून चाचणीला उपस्थित राहिल्यानंतर ती परत केली जाईल.

निवड प्रक्रिया: उमेदवारांची निवड क्रीडा उपलब्धींचे गुण (५० गुण), खेळ कौशल्य, शारीरिक तंदुरुस्ती व कोचेसचे निरीक्षण (४० गुण) आणि शैक्षणिक पात्रता (१० गुण) अशा एकूण १०० गुणांच्या आधारे केली जाईल.

10वी-12वी पास तरुणांसाठी सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! Army Ordnance Corps मध्ये २,६१५ पदांसाठी भरती सुरू; लगेच करा अर्ज

६. अर्ज कसा करावा?

इच्छुक आणि पात्र खेळाडूंनी पश्चिम रेल्वेच्या अधिकृत संकेतस्थळावरून (https://www.rrc-wr.com) केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. अर्जासोबत योग्य आकाराचा फोटो, स्वाक्षरी आणि आवश्यक कागदपत्रे स्कॅन करून अपलोड करणे आवश्यक आहे

Web Title: Western railway sports quota bharti 2026 rrc wr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2026 | 04:26 PM

Topics:  

  • central railway
  • Government Job
  • international sports

संबंधित बातम्या

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज
1

SNDT University Recruitment 2026: SNDT महिला विद्यापीठात ‘या’ पदांसाठी भरती; असा करा थेट अर्ज

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!
2

IIM Nagpur Recruitment 2026: आयआयएम नागपूरमध्ये ‘ज्युनियर एक्झिक्युटिव्ह’ पदांसाठी भरती जाहीर; ७ व्या वेतन आयोगानुसार मिळणार पगार!

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ
3

India Post GDS: जीडीएसची पहिली मेरिट लिस्ट जाहीर; अनेक राज्यांत कटऑफ १००% वर गेल्याने खळबळ

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी
4

GDS Result 2026: ग्रामीण डाक सेवक भरतीची पहिली यादी आऊट! एका छोट्या चुकीमुळे रद्द होऊ शकते उमेदवारी; ‘या’ कागदपत्रांची ठेवा तयारी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.