(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)
या क्षेत्रात प्रवेश करण्यासाठी, ‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग’ (AME) हा सर्वात महत्त्वाचा अभ्यासक्रम आहे. हा अभ्यासक्रम २ ते ३ वर्षांच्या कालावधीचा असतो आणि त्यामध्ये कोर्स आणि प्रत्यक्ष प्रात्यक्षिक प्रशिक्षणाचा समावेश असतो. हे प्रशिक्षण भारत सरकारच्या ‘नागरी विमानन महासंचालनालया’च्या (DGCA) देखरेखीखाली आणि त्यांच्या नियमावलीनुसार दिले जाते.
‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग’ (AME) ही विमानांची दुरुस्ती आणि देखभाल करण्यासाठी असलेली एक विशेष शाखा आहे. या क्षेत्रातील व्यावसायिक विमानाचे इंजिन, एव्हिऑनिक्स, संरचनात्मक भाग आणि इतर प्रणालींची तपासणी करतात; जेणेकरून विमान उड्डाण करण्यापूर्वी ते सुरक्षित आणि उड्डाणास योग्य असल्याची खात्री केली जाते.. विमानाची आणि त्यातील प्रवाशांची सुरक्षा ही AME व्यावसायिकांच्याच हाती असते; पण AME व्यावसायिकाचे प्रमाणपत्र म्हणजेच Certification असल्याशिवाय कोणत्याही नागरी विमानाला उड्डाण करण्याची परवानगी दिली जात नाही.
‘एअरक्राफ्ट मेंटेनन्स इंजिनिअरिंग’ (AME) करण्यासाठी, उमेदवारांनी १२ वीची परीक्षा उत्तीर्ण असणं आवश्यक आहे. पण त्यासोबतच भौतिकशास्त्र म्हणजे Physics, रसायनशास्त्र म्हणजे Chemistry आणि गणित म्हणजे Mathematics हे मुख्य विषय घेऊन उत्तीर्ण केलेली असणे बंधनकारक आहे. पण काही असे पदविका अभ्यासक्रम म्हणजेच Diploma courses उपलब्ध आहेत, जे १० वीची परीक्षा उत्तीर्ण झाल्यानंतरही करता येतात. शिवाय, या क्षेत्रात करिअर घडवण्यासाठी, उमेदवार Medically fit असणे अत्यंत आवश्यक आहे.
वेतनाबाबत बोलायचे झाल्यास, या क्षेत्रात सुरुवातीचे वेतन साधारणपणे दरमहा ₹२५,००० ते ₹५०,००० च्या दरम्यान असू शकते. ३ ते ५ वर्षांच्या व्यावसायिक अनुभवासह, ही रक्कमनंतर वाढू शकते. जी दरमहा साधारणपणे ₹६०,००० ते ₹१.५ लाखांच्या दरम्यान असू शकते. त्यामुळे चांगलं करिअर घडवायचं असेल तर हे क्षेत्र तुमची वाट बघत आहे.






