Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ketan Murder Case उघडकीस आणणारे संदीप सिंग आहेत कोण? प्रोफेसर पद सोडून IPS बनले, UPSC मध्ये 143 वी रँकिंग…

अधिकारी संदीप सिंग सध्या देशभरात चर्चेत आहेत. एका प्रोफेसर पदावरून थेट आयपीएस अधिकारी बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अत्यंत रंजक आणि प्रेरणादायी आहे.

  • By Ankita Karangutkar
Updated On: Jun 26, 2026 | 07:22 PM
(फोटो सौजन्य:Chatgpt)

(फोटो सौजन्य:Chatgpt)

Follow Us
Follow Us:

पुण्यातील चर्चित केतन अग्रवाल हत्याकांडाने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. सुरुवातीला हा एक साधा अपघात वाटत होता, पण जसजसा तपास पुढे सरकला, तसतसे एक प्लानिंग मर्डेर असल्याचं उघडकीस आलं आणि सर्वांनाच धक्का बसला. पुणे ग्रामीण पोलिस अधीक्षक आणि २०१६ च्या बॅचचे आयपीएस अधिकारी संदीप सिंग गिल यांना हे संपूर्ण प्रकरण उघडकीस आणण्याचे श्रेय दिले जातं आहे. त्यांच्या तपासामुळे सिया गोयल आणि तिचा साथीदार चेतन चौधरी यांच्या कथित खुनी कटाचा पर्दाफाश झाला. या केसमुळे संदीप सिंग गिल चर्चेत आले असले तरीही त्यांची स्टोरी प्रेरणादायीच आहे. वारंवार अपयश येऊनही त्यांनी कधीही हार मानली नाही, प्राध्यापक म्हणून काम केले आणि अखेरीस यूपीएससी परीक्षेत १४३ वा क्रमांक मिळवून ते आयपीएस अधिकारी बनले.

CBSE Language Policy : विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! CBSE ने भाषा धोरणात केला मोठा बदल, दोन विदेशी भाषा शिकण्याची संधी

IPS संदीप सिंग गिल कोण आहेत?

आयपीएस संदीप सिंग गिल हे महाराष्ट्र केडरचे २०१६ च्या तुकडीचे अधिकारी आहेत. संदीप पंजाबमधील लुधियाना जिल्ह्याचे रहिवासी. त्यांचे बालपण आणि सुरुवातीचे शालेय शिक्षण लुधियानामध्येच झालं. त्यानंतर त्यांनी चंदीगड येथील पंजाब विद्यापीठातून इंग्रजी साहित्यात एम.ए. पदवी मिळवली. आज, ते महाराष्ट्र पोलिस दलातील सर्वात कार्यक्षम अधिकाऱ्यांपैकी एक मानले जातात आणि सध्या पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक म्हणून कार्यरत आहेत.

प्राध्यापक म्हणून कामतानाच UPSC ची तयारी

आयपीएस अधिकारी होण्यापूर्वी, संदीप सिंग गिल चंदीगडमधील एका महाविद्यालयात सहायक प्राध्यापक होते. शिकवणे हे त्यांचे काम असले तरी, भारतीय पोलीस सेवेत सामील होण्याचे त्यांचे नेहमीच स्वप्न होते. काम करत असतानाच त्यांनी यूपीएससीची तयारी सुरू ठेवली. त्यांनी अनेक वेळा परीक्षा दिली, पण ते अयशस्वी ठरले. असे असूनही, ते दृढनिश्चयी राहिले आणि आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करून राहिले.

२०१५ मधील विशेष संधीने आयुष्य बदलले

संदीप सिंग गिल यांची यशोगाथा खूपच रंजक आहे. २०१५ मध्ये, यूपीएससीने काही उमेदवारांना एक विशेष संधी दिली. संदीप सिंग गिल यांनी या संधीचा फायदा घेतला आणि नागरी सेवा परीक्षेत उत्कृष्ट कामगिरी करत अखिल भारतीय स्तरावर १४३ वा क्रमांक पटकावला. मुख्य परीक्षेत त्यांचा वैकल्पिक विषय इंग्रजी साहित्य होता. त्यांच्या मेहनतीचे फळ मिळाले आणि त्यांची भारतीय पोलीस सेवेसाठी (IPS) निवड झाली.

पंजाबी असूनही अस्खलित मराठी बोलतात

महाराष्ट्र केडरमध्ये नियुक्ती झाल्यानंतर, संदीप सिंग गिल यांनी राज्याच्या संस्कृती आणि भाषेशी स्वतःला जुळवून घेतले. असे म्हटले जाते की, त्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना त्यांच्याशी फक्त मराठीतच बोलण्याची स्पष्ट सूचना दिली होती. सततच्या सरावामुळे ते आता अस्खलित मराठी बोलतात. यामुळेच स्थानिक लोकांमध्ये त्यांची चांगली प्रतिष्ठा निर्माण झाली आहे.

यापूर्वी पुण्यात उत्कृष्ट कामगिरी

पुणे ग्रामीणचे एसपी होण्यापूर्वी, संदीप सिंग गिल यांनी पुणे शहरात डीसीपी झोन ​​१ म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांच्या कार्यकाळात अनेक गुन्ह्यांवर प्रभावीपणे कारवाई करण्यात आली. गणेशोत्सवादरम्यान कायदा व सुव्यवस्था राखणे आणि गुन्हेगारी नियंत्रणातील त्यांच्या कामाचीही खूप प्रशंसा झाली. ते एक शिस्तप्रिय, तंदुरुस्त आणि शीघ्रबुद्धीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात.
Lohagad Murder Case: लोहगड हत्या प्रकरणातील व्यावसायिक केतन अग्रवाल नेमके किती शिकले होते? जाणून घ्या त्यांचा शैक्षणिक प्रवास..

Web Title: Who is ips sandeep singh ketan murder case upsc rank 143 success story marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 26, 2026 | 07:22 PM

Topics:  

  • Crime in Pune
  • education
  • murder case news
  • UPSC

संबंधित बातम्या

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!
1

Maharashtra DSE Admissions 2026: इंजिनिअरिंगच्या क्रेझमध्ये मोठी वाढ; यंदा ५०,१५३ विद्यार्थ्यांनी कॉलेजमध्ये मिळवले प्रवेश!

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!
2

Professor student clash : ‘कल सुबह पनवेल …’ डायलॉग मारताच भडकले प्रोफेसर; विद्यार्थ्याला थेट धमकी!

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख
3

सर्वोच्च ₹75 लाखांचे पॅकेज अन् जागतिक मान्यता! SPJIMR कडून PGDM प्रवेशाची घोषणा; ‘ही’ आहे शेवटची तारीख

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या
4

Election Commission: निवडणूक आयोगाची धुरा सांभाळणारे तिन्ही शिलेदार नेमके किती शिकलेत? जाणून घ्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.