CBSE Board Exam 2027 Date: (फोटो सौजन्य- सोशलमीडिया)
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने 2027 मध्ये होणाऱ्या SSC 10वी आणि 12वीच्या बोर्ड परीक्षांचं वेळापत्रक जाहीर केले. CBSE ने 6 नोव्हेंबर 2026 ला आपल्या वेबसाईटवर वेळापत्रक टाकलंय. त्यानुसार 10वी आणि 12वी बोर्डाच्या परीक्षा 16 फेब्रुवारी 2027 पासून सुरू होणार आहेत. त्यामुळे आता अभ्यासाचं नियोजन करायला विद्यार्थ्यांना सोपं जाणार आहे. CBSE Board
CBSE च्या वेळापत्रकानुसार 10वीची परीक्षा 16 फेब्रुवारी ते 9 मार्च 2027 या दिवसात होईल. यावेळी 10वीच्या मुलांसाठी एकूण 83 विषयांच्या परीक्षा घेतल्या जाणार आहेत. प्रत्येक विषयाची तारीख वेगळी ठेवलीय. त्यामुळे तुमचा विषय कोणत्या दिवशी आहे, हे अधिकृत वेळापत्रकात जाऊन नक्की बघा.
UGC NET December 2026 Exam: UGC NET चं बिगुल वाजलं! डिसेंबर परीक्षेचं विषयानुसार वेळापत्रक जाहीर
12वीच्या मुलांची परीक्षा पण 16 फेब्रुवारी 2027 पासूनच सुरू होईल आणि 9 एप्रिलला शेवटचा पेपर असेल. 12वीसाठी एकूण 121 विषयांच्या परीक्षा होणार आहे. जर तुम्ही सायन्स, कॉमर्स का आर्ट्स, यानुसार आणि तुम्ही निवडलेल्या विषयानुसार तारखा तपासणं गरजेचं आहे. नाहीतर गोंधळ होईल.
10वी आणि 12वीच्या सगळ्या परीक्षा सकाळी 10.30 वाजता सुरू होतील. केंद्रावर किती वाजता पोहोचायचं, कोणती कागदपत्रं न्यायची, सोबत काय नेता येईल, याची सगळी माहिती अॅडमिट कार्डवर दिली जाणार आहे. त्यामुळे अॅडमिट कार्डवरच्या सगळ्या सूचना नीट वाचून घ्या. आणि परीक्षेच्या दिवशी धावपळ नको म्हणून वेळेआधी केंद्रावर पोहोचा. उशीर झाला तर टेन्शन वाढतं.
नियमित शाळेतल्या मुलांच्या प्रॅक्टिकल परीक्षा आणि प्रोजेक्टचं काम 1 जानेवारी 2027 पासून सुरू होणार आहे. तर थंडी जास्त असलेल्या भागातल्या शाळांसाठी वेगळं नियोजन केलं होतं. त्या शाळांच्या प्रॅक्टिकल परीक्षा 9 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2026 या दिवसात झाल्या आहेत.त्यामुळे आता फक्त लेखी परीक्षेची तयारी करून चालणार नाही. प्रॅक्टिकल आणि अंतर्गत मार्कांचं पण शाळेकडून नीट माहिती घेऊन ठेवा. तुमचे शिक्षक सांगतील तसं प्रोजेक्ट पूर्ण करा.
Ans: दोन्ही वर्गांच्या बोर्ड परीक्षा १६ फेब्रुवारी २०२७ पासून सुरू होणार आहेत.
Ans: दहावीची बोर्ड परीक्षा ९ मार्च २०२७ रोजी संपणार आहे.
Ans: बारावीची परीक्षा ९ एप्रिल २०२७ रोजी संपणार आहे.






