Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Mumbai Crime |
  • Lifestyles |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकलं; डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप

मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. भरदिवसा डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांसमोर १२ वीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे.

  • By संदीप गावडे
Updated On: Jul 01, 2025 | 04:18 PM
धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकल, डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप

धक्कादायक! भर हॉस्पिटलमध्ये विद्यार्थिनीला चाकूने भोसकल, डॉक्टरही मदतीला न आल्याने संताप

Follow Us
Follow Us:

मध्य प्रदेशातील नरसिंहपूर जिल्हा रुग्णालयात एक भयंकर प्रकार समोर आला आहे. भरदिवसा डॉक्टर्स, नर्सेस आणि रुग्णांसमोर १२ वीच्या विद्यार्थिनीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. या घटनेचं सीसीटीव्ही फूटेज सोमवारी समोर आलं असून त्यानंतर जिल्हाभरात तणाव निर्माण झाला आहे. २७ जून रोजी दुपारी ही घटना घडली.

नाशिक हादरलं! १० रुपयांच्या वर्गणीवरून जीवघेणा हल्ला, कोयत्याने अल्पवयीन मुलावर वार

पीडित विद्यार्थिनी संध्या चौधरी नरसिंहपूरच्या पटेल वॉर्डची रहिवासी होती. ती आपल्या ओळखीच्या एका महिलेला भेटण्यासाठी जिल्हा रुग्णालयाच्या प्रसूती कक्षात आली होती. त्यानंतर ती ट्रॉमा सेंटरच्या रूम क्रमांक २२ च्या बाहेर बसलेली असताना तिच्यावर आरोपी अभिषेक कोश्टी याने धारदार शस्त्राने हल्ला केला. यात संध्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात प्रचंड घबराट पसरली आहे.

गंभीर बाब म्हणजे, घटनेच्या वेळी रुग्णालयात रुग्ण, परिचारक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते, मात्र कोणीही मध्यस्थी करण्याची हिंमत दाखवली नाही. एका नर्सिंग ऑफिसरने पोलिसांना सांगितले की, त्यांनी हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने “मध्यम पडू नको, नाहीतर तुलाही मारून टाकीन,” अशी धमकी दिली. हल्ल्यानंतर आरोपीने स्वतःवरही वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला, पण तो अपयशी ठरला. त्यानंतर तो दुचाकीवरून पळून गेला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी अभिषेक कोश्टी हा घटनास्थळी दुपारपासूनच घुटमळत होता. संध्याला पाहताच त्याने तिच्याशी संवाद साधला आणि नंतर तिचा पाठलाग करत ट्रॉमा सेंटरमध्ये पोहोचला. हल्ल्यानंतर तो रुग्णालयातून सहज निसटला. विशेष म्हणजे, त्या वेळी ट्रॉमा सेंटरच्या बाहेर दोन सुरक्षा रक्षक उपस्थित होते, तरीही आरोपीला थांबवता आले नाही.

संध्याचा मृतदेह घटनास्थळी तासन्‌तास पडून होता. पोलिस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी दाखल झाली आणि तपास सुरु केला. घटनेची माहिती मिळताच संध्याच्या कुटुंबीयांनी जिल्हा रुग्णालयाजवळ रास्ता रोको आंदोलन केले आणि आरोपीला तत्काळ अटक करण्याची मागणी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी तातडीने चौकशीचे आदेश दिल्यानंतर रात्री उशिरा आंदोलन मागे घेण्यात आले.

नरसिंहपूरचे पोलिस अधीक्षक मृगाक्षी डेका यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीला घटनेनंतर अवघ्या एका तासात अटक करण्यात आली. प्राथमिक चौकशीत आरोपीने सांगितले की, तो आणि संध्या यांची ओळख दोन वर्षांपासून होती, आणि त्यांची मैत्री सोशल मीडियावरून सुरु झाली होती. मात्र जानेवारीपासून त्याने संध्यावर कोणाशी तरी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतला होता. त्यामुळेच तिने आपल्याशी ‘फसवणूक’ केल्याचे त्याने सांगितले आणि संध्याला ठार मारण्याचा व स्वतः आत्महत्या करण्याचा निर्णय घेतल्याचं कबूल केले.

धक्कादायक ! महिलेने पोटच्या दोन नवजात बाळांची केली हत्या; जोडीदार हाडं घेऊन पोहोचला पोलिस ठाण्यात अन्…

या घटनेमुळे रुग्णालयातील सुरक्षेच्या दृष्टीनेही गंभीर प्रश्न उपस्थित करते. दिवसाढवळ्या, शेकडो लोकांच्या उपस्थितीत आणि सुरक्षारक्षक असतानाही आरोपीने अशा प्रकारे हल्ला करून पलायन केल्यामुळे रुग्णालय प्रशासनावर अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहेत. या घटनेनंतर ट्रॉमा सेंटरमधील अनेक रुग्णांनी भीतीपोटी लवकर डिस्चार्ज घेण्याची मागणी केली.या हत्येमुळे राज्यभरातून तीव्र प्रतिक्रिया उमटत असून, रुग्णालयातील सुरक्षेविषयी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे. दरम्यान, आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून पुढील चौकशी सुरु आहे.

Web Title: 12 class student killed in narsinghpur district hospital in madhya pradesh crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2025 | 04:18 PM

Topics:  

  • crime news
  • MP Crime News
  • mp police

संबंधित बातम्या

Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल
1

Pune Crime : रिक्षाचालक तरुणाला लाथा-बुक्यांनी मारहाण करून लुटले; दुचाकीवरील चौघांवर गुन्हा दाखल

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त
2

ठाण्यात अवैध ‘मिक्स हायड्रोकार्बन ऑईल’ साठ्यावर धाड; 1.20 कोटींचा मुद्देमाल जप्त

Crime News : जुन्या वादातून शेतकऱ्याला मारहाण, दगडाने नाकावर वार; तिघांवर गुन्हा दाखल
3

Crime News : जुन्या वादातून शेतकऱ्याला मारहाण, दगडाने नाकावर वार; तिघांवर गुन्हा दाखल

Gurbhej Singh : लंडनमध्ये 26 वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी 7 जणांना केली अटक
4

Gurbhej Singh : लंडनमध्ये 26 वर्षीय भारतीय तरुणाची चाकूने भोसकून हत्या; पोलिसांनी 7 जणांना केली अटक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.