नाशिकमधून सतत गुन्हेगारीच्या घटना समोर येत आहे. आता अवघ्या १० रुपयांच्या वर्गणीवरून एका अल्पवयीन मुलावर हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात १६ वर्षीय रजा फिरोज शेख या अल्पवयीन युवकावर टोळक्याने एकत्र येत कोयत्याने थेट गळ्यावर वार केला. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या मुलाला तातडीने रुग्णालयात हलवण्यात आले. त्याची प्रकृती अत्यतंत चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. रुग्णालयात मुलाच्या नातेवाईकांचा प्रचंड संताप अनावर झाला आहे.
मुंबई हादरली! एकतर्फी प्रेमातून वाद आणि अल्पवयीनाने बिल्डींगच्या टेरेसवरून ढकललं; मुलीचा मृत्यू
काय घडलं नेमकं?
ही घटना सोमवारी (३० जून ) रात्रीच्या सुमारास घडली आहे. प्राथमिकन माहितीनुसार, परिसरातील काही युवकांमध्ये वर्गणीच्या रकमेवरुन वाद झाला होता. तो वाद विकोपाला गेला आणि थेट टोळक्याने हल्ला केला. हल्लेखोरांनी धारदार शश्त्र वापरत रजावर गळ्याजवळ वार केला. हल्ला इतका जबरदस्त होता की रजा रक्ताच्या थारोळ्यात पडला. परिसरातील नागरिकांनी प्रसंगावधान राखत त्याला तात्काळ नाशिकच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. मात्र डॉक्टरांनी त्याची प्रकृती अत्यंत गंभीर असल्याचे सांगत पुढील उपचारासाठी त्याला सह्याद्री हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे. त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगितलं जात आहे. या प्रकारामुळे भद्रकाली परिसरात तणावाचं वातावरण पसरलं आहे. स्थानिक नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली असून, सुरक्षा व्यवस्था वाढवण्याची मागणी होत आहे. घटनेची माहिती मिळताच भद्रकाली पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला आहे. हल्लेखोरांविरुद्ध गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलीस पथक कार्यरत झालं आहे.
गोंदिया हादरलं! पैशांसाठी अल्पवयीन मुलानेच आईची केली हत्या
गोंदिया जिल्ह्यातील दासगाव येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने गोंदिया जिल्हा हादरून गेला आहे. पोटच्या मुलानेच आपल्या आईची हत्या केल्याचं समोर आले आहे. खर्चासाठी पैसे न दिल्याच्या रागातून निर्घृण हत्या करण्यात आली. हत्या केल्यानंतर त्याने नातेवाईकांना नैसर्गिक मृत्यू असल्याचे सांगितले आणि अंत्यसंस्कार केला. मात्र पोलिसांना संशय आला आणि मुलाला ताब्यात घेत चौकशी केली असता सत्य समोर आलं.
लिव्ह इन पार्टनरची हत्या करून २ दिवस शेजारीच झोपला प्रियकर; आधी चादरीत गुंडाळला नंतर…..