Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 30 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

राजस्थानातील एका धक्कादायक प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे. या घटनेविरोधात नागरिक रस्त्यावर उतरले असून कठोर कारवाईची जोरदार मागणी होत आहे.

  • By नुपूर भगत
Updated On: Jul 01, 2026 | 10:07 AM
Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

Rajasthan : ६ दिवस, बदलणारे हॉटेल्स आणि ३० नराधम! १३ वर्षांच्या चिमुकलीवर अमानुष अत्याचार; परिसरात तीव्र संताप

Follow Us
Follow Us:
  • धक्कादायक प्रकरण उघड होताच नागरिकांनी आंदोलन करत कठोर शिक्षेची मागणी केली.
  • पोलिसांनी तपासाला वेग देत अनेक संशयितांना ताब्यात घेतले असून चौकशी सुरू आहे.
  • पीडितेची सुरक्षित सुटका करण्यात आली असून प्रकरणामुळे परिसरात तीव्र संतापाचे वातावरण आहे.
राजस्थानच्या श्रीगंगानगरमध्ये १३ वर्षीय चिमुकलीवर झालेल्या अत्याचाराविरोधी लोकांमध्ये मोठा आक्रोश दिसून आला. संतापलेल्या जनतेने मुलीसाठी आवाज उठवला आणि रस्त्यावर उतरत न्यायाची आणि कठोर कारवाईची मागणी केली. २९ जून रोजी संतप्त जनता पोलीस अधीक्षकांच्या कार्यालयात पोहोचली. यावेळी जनतेने बेकायदेशीर हाॅटेल्स आणि आरोपींना फाशीची शिक्षा ठोठावण्याची मागणी केली. तर काँग्रेस कार्यकर्त्यांनी पोलिस प्रशासन आणि हाॅटेल चालकांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

Delhi Crime : ‘मोमोज खायला चल’ म्हणत गाडीत बसवलं; चालत्या कारमध्ये महिलेवर लैंगिक अत्याचार

६ दिवस १३ वर्षीय चिमुरडीवर झाला बलात्कार

FIR नुसार, १३ वर्षीय चिमुरडीला रिक्षाचालकाने एका हाॅटेलमध्ये विकले. गोष्ट इथेच संपत नाही तर या हाॅटेलमधूनही पुढे वेगवेगळ्या हाॅटेल्समध्ये तिची विक्री करण्यात आली. यादरम्यान हाॅटेलमध्येच अनेकांद्वारे तिचे लैंगिक शोषण देखील करण्यात आले. समोर आलेल्या रिपोर्ट्सनुसार, एकूण ३० नराधमांनी चिमुकलीचा बलात्कार केला. एवढंच नाही तर जेव्हा चिमुरडी वेदनेने ओरडू लागली तेव्हा तिला जबरदस्तीने दारु देखील पाजण्यात आली, जेणेकरुन प्रतिकाराची शक्ती तिच्यात उरणार नाही.

प्रकरण कसे उघड झाले?

खरंतर मुलीच्या आईने ती हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात केली होती ज्यानंतर पोलिसांनी आपला तपास सुरु केला. पोलिसांनी आईच्या तक्रारीनंतर मुलीचे शोधकार्य सुरु केले. मोबाईल लोकेशनच्या आधारावर जेव्हा मुलगी सापडली तेव्हा तिच्यासोबत झालेल्या काळ्या करतूतींचाही खुलासा झाला.

८ लोकांना केली अटक

या प्रकरणात पोलिसांनी पिडित मुलीची यशस्वीपणे सुटका केली असून तिला सुरक्षितपणे कुटुंबियांच्या स्वाधिन करण्यात आले आहे. पीडितेच्या जबाबाच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल करून एकूण आठ आरोपींना अटक केली आहे. पोलीस हॉटेल्सची चौकशी करत असल्याचे त्यांनी सांगितले. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु असून आरोपींवर लवकरात लवकर योग्य ती कायदेशीर कारवाई होण्याची आशा आहे.

शेताच्या बांधाच्या वादातून शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला, दगड अन् लाकडी काठीने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

काँग्रेसचा मोर्चा

या घटनेमुळे काँग्रेसने पोलिस प्रशासन आणि हाॅटेलच्या विरोधात मोर्चा सुरु केला आहे. काँग्रेस नेता आणि कार्यकर्ते सातत्याने आंदोलन करत असून जिल्हा काँग्रेस अध्यक्ष आणि श्रीकरणपूरचे आमदार रुपिंदर सिंग कुन्नर यांच्यासह अनेक नेत्यांनी या प्रकरणी धरणे आंदोलन केले आहे. या आंदोलनातून आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी, अशी मागणी केली जात आहे.

Web Title: 13 year old rescued in rajasthan after being sold to hotels and sexually exploited by 30 men

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 01, 2026 | 10:06 AM

Topics:  

  • crime news
  • gang raped
  • rajasthan

संबंधित बातम्या

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?
1

Crime News: मेरठच्या ‘ब्लू ड्रम’ हत्याकांडाचा आज निकाल; मुस्कान-साहिलच्या शिक्षेचा मार्ग मोकळा होणार?

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा
2

कसायाचा भयंकर प्रकार! महिलेचा गळा चिरला अन् तुकडे करून कालव्यात फेकले; टॅटूवरुन झाला खुलासा

Maharashtra Live breaking News in Marathi:  आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक
3

Maharashtra Live breaking News in Marathi: आशियाई खेळात तिरंदाजी संघाकडून देशाला सातवे सुवर्णपदक

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला
4

Thane Crime: ठाण्यात ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याची हत्या; कार्यालयात घुसून गोळीबार, धारदार शस्त्रानेही हल्ला

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.