Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील आठ वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Apr 21, 2026 | 12:12 PM
अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; घाबरलेल्या 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

अनैसर्गिक संबंधासाठी पोलिसाचा दबाव; घाबरलेल्या 24 वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

Follow Us
Follow Us:

हिंगोली : गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होताना दिसत आहे. त्यात खून, खुनाचा प्रयत्न, आत्महत्या यांसारख्या घटना घडत आहेत. महिलांवरील अत्याचाराच्या घटनाही लक्षणीय वाढत आहेत. असे असताना आता हिंगोलीत धक्कादायक घटना समोर आली आहे. नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याने अनैसर्गिक संबंध ठेवण्याचा तगादा लावल्यामुळे एका 24 वर्षीय तरुणाने गळफास लावून आत्महत्या केली.

याप्रकरणी आखाडा ठाण्यात बाळापूर पोलिस लिपीकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मृत तरुण हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यातील आहे. त्याची नांदेड पोलिस अधीक्षक कार्यालयातील लिपिक अभिषेक सातपुते याच्यासोबत मागील आठ वर्षांपासून घनिष्ट मैत्री होती. पण कालांतराने या मैत्रीचे रुपांतर छळात झाले. गेल्या शनिवारी (दि.१८) हे दोघे वडगाव व आखाडा बाळापूर परिसरात एकत्र फिरत होते. यावेळी सातपुते याने सदर तरुणाकडे अनैसर्गिक संबंध ठेवण्यासाठी तगादा लावला. त्याच्या या सततच्या त्रासाला कंटाळून पीडित तरुणाने वडगाव शिवारातील एका झाडाला गळफास लावून आत्महत्या केली.

ही घटना समोर आल्यानंतर संतप्त कुटुंबिय व गावकऱ्यांनी आरोपी अभिषेक सातपुते याच्यावर गुन्हा दाखल झाल्याशिवाय शवविच्छेदन करण्यास विरोध केला. यामुळे आखाडा बाळापूर ग्रामीण रुग्णालयात मोठा तणाव निर्माण झाला. अखेर पोलिस उपाधीक्षक राजकुमारे केंद्रे यांनी घटनास्थळी धाव घेऊन त्यांच्याशी संवाद साधला.

आरोपी पोलिसाविरोधात गुन्हा दाखल

नागनाथ लाखाडे यांच्या तक्रारीनुसार, अभिषेक सातपुते याच्यावर आत्महत्येत प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर जवळपास २२ तासांनी शवविच्छेदनाची प्रक्रिया पार पडली. सध्या पोलिस या घटनेचा तपास करत आहेत.

ब्रेकअप झाल्याने तरुणीची आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, चंद्रपुरातील एका तरुणीने ब्रेकअप झाल्याने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे ही घटना घडली. आस्था कुंदन नगराळे (वय २१, रा. शास्त्रीनगर, भद्रावती, जि. चंद्रपूर) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणीचे नाव आहे. आस्था ही तुळशीराम गायकवाड पाटील फार्मसी कॉलेजमध्ये शिक्षण घेत होती. ती बुटीबोरीजवळील सातगाव (म्हसाळा) येथे चंदन पोंगळे यांच्या घरी भाड्याने राहत होती.

पुण्यात चाललंय काय? आयुर्वेदिक मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय; पोलिसांनी केली मोठी कारवाई

Web Title: 24 year old man commits suicide by hanging

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 21, 2026 | 12:12 PM

Topics:  

  • crime news
  • Hingoli Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?
1

पुण्यात तरुणावर गावठी पिस्तुलातून गोळीबार, तिघांना अटक; नेमकं काय घडलं?

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या
2

‘मावशी, साप आला!’ म्हणत वृद्धेचे सोन्याचे दागिने लंपास; यवत पोलिसांनी आरोपीला ठोकल्या बेड्या

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई
3

भरधाव वाहनातून दहशत निर्माण करणाऱ्यांना दणका! बारामती पोलिसांनी केली ‘ही’ मोठी कारवाई

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या
4

YouTube वर बघून घरफोडीचा प्लॅन, घरात गेला अन्…; सोलापुरातील घटनेनं खळबळ; आरोपीला ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.