संग्रहित फोटो
पुणे : भारती विद्यापीठ येथील दत्तनगरमधील चंद्रभागा चौकात ‘योग आयुर्वेदिक पोटली मसाज’ सेंअरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्या व्यावसायावर गुन्हे शाखेच्या पथकाने छापेमारी केली आहे. छापा कारवाईत पोलिसांनी येथून पाच मुलींची सुटका केली आहे. गुन्हे शाखेच्या अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंधक कक्षाने ही कारवाई केली आहे. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात भारतीय न्याय संहिता १४३(१)(३), ३(५) अनैतिक मानवी वाहतूक व्यापार प्रतिबंध अधिनियम १९५६ चे कलम ३,४,५ प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई पोलिस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक छगन कापसे, पोलिस अमंलदार आंधळे, भिवरकर, जाधव, नदाफ, भुजबळ यांच्या पथकाने केली आहे.
पुणे शहरात मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यवसाय चालविला जात आहे. हे प्रकार सातत्याने सुरू असल्याचे दिसून आले आहे. दरम्यान, गुन्हे शाखेच्या पथकाला भारती विद्यापीठ परिसरातातील व्यंकटेशम ब्लॉसम सोसायटीमध्ये दुसऱ्या मजल्यावर योग आयुर्वेदिक पोटली मसाज सेंटरच्या नावाखाली वेश्या व्यावसाय सुरू असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीची बनावट ग्राहक पाठवून खातरजमा करण्यात आली. त्यानंतर पथकाने याठिकाणी छापा कारवाई केली. यावेळी पोलिसांनी पाच मुलींची सुटका केली. तर, मसाज सेंटर चालकासह तिघांवर गुन्हा नोंद केला आहे.
बारामतीत वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश
गेल्या काही दिवसाखाली बारामती-भिगवण रोडवरील अमृता लॉज (सोमनाथ हॉटेल) येथे सुरू असलेल्या अवैध वेश्या व्यवसायावर बारामती तालुका पोलिसांनी मध्यरात्री टाकलेल्या छाप्यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून, पाच महिलांची सुटका करण्यात आली आहे. १४ एप्रिल रोजी पहाटे ३ च्या वाजण्याच्या सुमारास पोलिसांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. पोलीस निरीक्षक चंद्रशेखर यादव, उपनिरीक्षक राम हरी भोसले यांच्या पथकाने बनावट ग्राहकाच्या मदतीने सापळा रचला. पंचांना सोबत घेऊन नियोजनपूर्वक अमृता लॉजवर धाड टाकली. छाप्यादरम्यान काही ठिकाणी महिला व ग्राहक एकत्र आढळून आले. चौकशीदरम्यान संबंधित आरोपी हे बाहेरून महिलांना आणून त्यांना ग्राहकांना पुरवत असल्याचे उघड झाले. ग्राहकांकडून पैशांची वसुली करत असल्याचेही समोर आले. या प्रकरणात अजित जयसीन शेट्टी (वय ३८, हॉटेल चालक) व चाँद कलाम आलम (वय २०) यांना अटक करण्यात आली आहे. या घटनेत पश्चिम बंगाल येथील ३, भिवंडी मुंबई येथील २ अशा ५ महिलांची सुटका करण्यात आली आहे. त्यांना सुधारगृहात ठेवण्यात आले आहे.






