Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! ‘गाडीवर फिरवून आणतो’ म्हणत 8 वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार; नराधमाने निर्जनस्थळी नेलं…

विल्होळी माध्यमिक शाळेजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे अंधाराचा फायदा घेत आणि 'आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची' धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 01, 2026 | 12:57 PM
अल्पवयीनवर अत्याचार; नराधमास १३ वर्षे कारावास

अल्पवयीनवर अत्याचार; नराधमास १३ वर्षे कारावास

Follow Us
Follow Us:

नाशिक : नाशिक तालुक्यातील विल्होळी येथील एका आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी आरोपीला नाशिक जिल्हा सत्र न्यायालयाने दोषी ठरवले. जिल्हा न्यायालयाने आरोपी साईनाथ रवींद्र थोरात (वय २७) याला विविध कलमान्वये एकूण १३ वर्षांच्या सश्रम कारावासाची आणि ८५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना १४ जानेवारी २०२६ रोजी रात्री साडेआठच्या सुमारास घडली.

आरोपी साईनाथ थोरात याने पीडित चिमुरडीला ‘गाडीवर फिरवून आणतो’ असे आमिष दाखवून तिचे अपहरण केले. तिला घरापासून सुमारे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या विल्होळी माध्यमिक शाळेजवळील एका निर्जनस्थळी नेले. तेथे अंधाराचा फायदा घेत आणि ‘आरडाओरडा केल्यास ठार मारण्याची’ धमकी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता. याप्रकरणी नाशिक तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

नाशिक जिल्हा सत्र न्यायालयातील जिल्हा न्यायाधीश वडणे यांनी आरोपी साईनाथ रवींद्र थोरात याला भारतीय न्याय संहिता कलम ७४ व १३७ (२) अंतर्गत दोषी ठरवून ५ वर्षे सश्रम कारावास आणि २५००० रुपये दंड, पोक्सो कायदा कलम ८ नुसार ५ वर्षे सश्रम कारावास आणि २५००० रुपये दंड, तसेच पोक्सो कायदा कलम १२ अंतर्गत ३ वर्षे सश्रम कारावास आणि १०००० रुपये दंड अशी शिक्षा सुनावली आहे.

आरोपीला 85000 रुपयांचा दंड

न्यायालयाने आरोपीला एकूण ८५००० रुपये दंड ठोठावला असून, त्यापैकी ८०००० रुपये पीडित मुलीस नुकसान भरपाई म्हणून देण्यात यावेत आणि उर्वरित ५००० रुपये सरकारी तिजोरीत जमा करावेत, असे आदेश दिले आहेत. दंडाची रक्कम न भरल्यास आरोपीला अतिरिक्त कारावासाची शिक्षाही भोगावी लागणार आहे.

तपास पथकाची कामगिरी

नाशिक तालुका पोलीस ठाण्याच्या महिला पोलीस निरीक्षक मृदुला नाईक यांनी या गुन्ह्याचा सखोल तपास करून न्यायालयात भक्कम पुरावे आणि दोषारोपपत्र सादर केले होते. सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी सरकार पक्षातर्फे प्रभावीपणे बाजू मांडली. गुन्हे दोषसिद्धी विभागाचे सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत पाटील आणि अश्विनी परदेशी यांनी तांत्रिक व कायदेशीर पाठपुरावा केला. पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील आणि अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी तपासी पथकाचे विशेष अभिनंदन केले.

Mumbai Crime : NCB ची मोठी कारवाई; 349 किलो कोकेन जप्त, 1745 कोटींचा ड्रग रॅकेट उघड; अमित शहांनी दिली माहिती

Web Title: 8 year old girl abused incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2026 | 12:57 PM

Topics:  

  • Abused Case
  • crime news
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!
1

जम्मू-काश्मीरच्या महिला क्रिकेटपटूची सेक्सटॉर्शन आणि खंडणीप्रकरणी मोठी कारवाई; क्राईम ब्रँचकडून १५०० पानांचे दोषारोपपत्र दाखल!

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…
2

Suicide News : इमारतीवरून उडी मारून विद्यार्थ्याची आत्महत्या; शाळेतून उशीरा येण्याचे कारण विचारले अन् नंतर…

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक
3

धक्कादायक ! गुंतवणुकीतून चांगला परतावा देण्याच्या आमिषाने व्यावसायिकाला गंडा; 20 लाखांची केली फसवणूक

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड
4

Crime News: छत्रपती संभाजीनगर हादरलं ! महिन्याभराच्या बाळाचा पैशांत सौदा; आईच्या तक्रारीनंतर धक्कादायक प्रकार उघड

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.