Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Election 2025 |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

भाजी खरेदीसाठी गेलेल्या १९ वर्षीय तरुणाचा पैशांच्या वादातून धारधार शस्त्रानं हत्या , नाशिकमधील घटना

नाशिक हादरलं ! नाशिक मधून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. एका १९ वर्षीय युवकाची हत्या झाल्याचं समोर आला आहे. युवक आपल्या वडिलांसोबत भाजी आणायला गेला होता. त्यावेळी ही हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: May 29, 2025 | 09:41 AM
मालकाचा विश्वासघात करून चोरल्या चक्क हिऱ्याच्या अंगठ्या

मालकाचा विश्वासघात करून चोरल्या चक्क हिऱ्याच्या अंगठ्या

Follow Us
Close
Follow Us:

नाशिकमध्ये गुन्हेगारी वाढत चालल्याचं दिसून येत आहे. आता पुन्हा एक नाशिकमध्ये हत्या झाल्याचं समोर आला आहे. १९ वर्षीय मुलाची हत्या झाल्याचं समोर आला आहे. युवक आपल्या वडिलांसोबत भाजीपाला आणायला गेला होता. पैश्याच्या किरकोळ वादावरून या मुलाची धारधार हत्याराने वार करून हत्या करण्यात आली. ही घटना पंचवटी पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.

Jaysingpur Crime: जयसिंगपूर पोलिसांची धडक कामगिरी; ५० लाखांच्या घरफोडीच्या गुन्हा १२ तासांत केला उघड

पंचवटी पोलीस ठाण्याचा हद्दीत गाडगे महाराज पुलाजवळ बुधवारच्या आठवडे बाजारात आपल्या वडिलांसोबत १९ वर्षीय युवक भाजीपाला आणायला गेला होता. आपल्या वडिलांसोबत गाडगे महाराज पुलासमोरून सायंकाळच्या सुमारास जात असतांना, त्याचा एका अज्ञात व्यक्तीसोबत किरकोळ पैशांच्या वादावरून वाद झाला. या वादानंतर अज्ञात व्यक्तीने अचानक धारदार हत्याराने युवकावर हल्ला करून तेथून पळ काढला. मृतकाचे नाव नंदलाल उर्फ सूरज जगतकुमार दास परदेशी (वय १९, रा. सीतागुंफा रोड, पंचवटी) असे आहे.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी जखमी नंदलालला उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, अतिरक्तस्राव झाल्याने उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच पंचवटी पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा केला. या प्रकरणी पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक मधुकर कड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे.

सख्ख्या भावाच्या खुनामागे सहा लाखांची सुपारी

कोल्हापुरातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिरोळ तालुक्यातील तमदलगे गावच्या हद्दीत असलेल्या बसवान खिंड या निर्जन डोंगराळ भागात २७ मे रोजी एका युवकाचा मृतदेह आढळून आला होता. या खुनाच्या बाबतीत धक्कादायक माहिती समोर आली असून, हा खून कोणत्याही परक्याने नाही, तर सख्ख्या भावानेच सुपारी देऊन करवून घेतल्याचे निष्पन्न झाले आहे. अविनाश उर्फ दिपक ओमगोंडा पाटील (रा. निमशिरगाव) असं मृतकाचे नाव आहे. त्याच्या सक्ख्या भावानेच सहा लाख रुपये सुपारी देवून खून करवून घेतल्याची घटना उघडकीस आली आहे.

अविनाश हा रोज दारू पिऊन घरी येत असे आणि त्याच्या कुटुंबीयांना मारहाण करत असे. त्याच्या या वागणुकीला कंटाळून त्याचा सख्खा भाऊ जिनगोंडा ओमगोंडा पाटील याने त्याला संपवण्याचा निर्णय घेतला. यासाठी त्याने मित्र मोहन प्रकाश पाटील याच्या मदतीने राकेश उर्फ विनोद वसंत थोरात (रा. दानोळी) याला खून करण्यासाठी सुपारी दिली.

छत्रपती संभाजीनगरमध्ये ‘हिट अँड रन’, दुचाकीस्वार हवेत फेकला गेला, तीन तरुणी थोडक्यात बचावल्या

Web Title: A 19 year old youth who had gone to buy vegetables was murdered with a sharp weapon over a money dispute incident in nashik

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 29, 2025 | 09:41 AM

Topics:  

  • crime
  • nashik accident
  • Nashik Crime

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhajinagar: प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर बलात्कार, गर्भवती केल्यानंतर धमक्या, जबरदस्ती गर्भपात आणि…
1

Chhatrapati Sambhajinagar: प्रशिक्षणार्थी PSI कडून तरुणीवर बलात्कार, गर्भवती केल्यानंतर धमक्या, जबरदस्ती गर्भपात आणि…

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध
2

Solapur Crime: मुलीला मेसेज पाठवल्याचा राग, समेटाच्या बहाण्याने बोलावून तरुणावर तलवारीने जीवघेणा हल्ला; तरुण दोन दिवस बेशुद्ध

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक
3

Kalyan : कल्याणमध्ये गावठी पिस्टलसह इतर शस्त्रें बाळगणाऱ्यालास अटक

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन
4

Buldhana Crime: ४७ वाहनांवर कारवाई, जिल्ह्यात सर्रास अवैध गौणखनिज उत्खनन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.