जयसिंगपुरमध्ये घरफोडीची घटना
घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या
परराज्यातून येऊन घरफोडी करणाऱ्या एका अट्टल गुन्हेगाराला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून दोन लाख २७ रुपये किमतीचे दागिने आणि इतर मुद्देमाल जप्त केला आहे. सराइताकडून आंबेगाव, बावधन आणि लोणीकंद या तीन पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले आहेत. व्यंकटेश रमेश (वय २२ वर्षे, रा. पी.जी. बिल्डिंग, एमआयटी कॉलेज जवळ, कोथरूड, मूळ रा. बेंगळुरू, कर्नाटक) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
घरफोडी करणाऱ्या परराज्यातील चोरट्याला ठोकल्या बेड्या; तब्बल लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त
दिवसा घरफोडी करणाऱ्याला अटक
दिवसाढवळ्या घरफोडी करणाऱ्या रेकॉर्डवरील सराईताला गुन्हे शाखेच्या युनिट पाचच्या पथकाने अटक केली आहे. हडपसर परिसरारील घरफोडीचा गुन्हाही त्याच्याकडून उघडकीस आला असून, एक लाख ४० हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. मॉन्ट्या ऊर्फ आर्यन माने (वय २२ वर्षे, रा. वंदे मातरम चौक, रामटेकडी, हडपसर) असे अटक चोरट्याचे नाव आहे. युनिटचे वरिष्ठ निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून तपास केला जात होता. खबऱ्याकडून पोलीस रेकॉर्डवरील आर्यन माने याने घरफोडी केल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने तत्काळ कारवाई करत आरोपीला शिताफीने अटक केली. तपासादरम्यान आरोपीने गुन्हा केल्याची कबुली दिली, असे पोलिसांनी सांगितले.