छत्रपती संभाजीनगरमध्ये एक हिट अँड रनची घटना समोर आली आहे. अवघ्या १४ वर्षीय मुलाने भरधाव वेगात गाडी चालवत स्कुटी चालकाला उडवल्याची घटना घडली. यात एक व्यक्ती जखमी झाला असून त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. त्याच्यावर उपचार सुरु आहे. या अल्पवयीन मुलाच्या वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून चालवत असलेली गाडी पोलिसांनी जप्त केली आहे. पोलीस स्वतः फिर्यादी होत रात्री उशिरा गुन्हा दाखल केला आहे.
हगवणेच्या वकिलांचा उलटा हल्ला: ‘ती नको त्या व्यक्तीसोबत…’; युक्तिवादात वैष्णवीच्या इभ्रतीला धक्का
ही हिट अँड रनची घटना छत्रपती संभाजीनगरमध्ये हडको एन-13 या भागात घडली आहे. एका भरधाव वेगात असलेल्या ह्युंदाई कारने दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आहे. या अपघाताचा थरार सीसीटीव्ही मध्ये कैद झाला आहे. कारचालक घटनास्थळावरून फरार झाला होता. सीसीटीव्ही फुटेजमध्ये, फिकट निळ्या रंगाची ह्युंदाई कार वेगात धावत आली आणि प्रथम दुभाजकावर आदळली. त्यानंतर तिने समोरून येणाऱ्या दुचाकीस्वाराला जबर धडक दिली आणि पुढे विजेच्या खांबावर जाऊन धडकली. धडक इतकी भीषण होती की दुचाकीस्वार हवेत उडून रस्त्यावर आदळला, तर त्याची दुचाकीही हवेत फेकली गेली. यावेळी तीन तरुणी समोरून जात होत्या. धडक दिलेली दुचाकी त्यांच्याजवळून अत्यंत थोडक्यात गेली. सुदैवाने त्या या भीषण अपघातातून बचावल्या.
कर इतक्या वेगात होती की तिने विजेच्या खांबाला धडक दिल्यामुळे महावितरणचा खांब वाकला आणि संपूर्ण परिसराचा वीज पुरवठा सुमारे दोन तास ठप्प झाला. अपघातानंतर कार काही क्षण घटनास्थळी थांबली होती. मात्र नागरिकांनी धाव घेताच अल्पवयीन मुलाने घटनास्तहलवरून पळ काढला. स्थानिक नागरिकांनी अत्तडीने धाव घेत त्याला मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली असून, सध्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे अपघातग्रस्त कार व चालकाचा शोध घेतला जात आहे. घटनेचा पोलिसांकडून तपास सुरु आहे.
Jaysingpur Crime: जयसिंगपूर पोलिसांची धडक कामगिरी; ५० लाखांच्या घरफोडीच्या गुन्हा १२ तासांत केला उघड