
22 दिवसांच्या बाळाला श्वास घ्यायला त्रास म्हणून पोटावर विळ्याने दिले 65 वेळा चटके, अंद्धश्रद्धेचा विचित्र प्रकार समोर (फोटो सौजन्य-X)
Amravati News Marathi: अमरावतीचा आदिवासीबहुल भाग असलेल्या मेळघाटातील चिखलदरातील सिमोरी गावातून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. श्वास घ्यायला त्रास होत होता म्हणून २२ दिवसांच्या बाळाला विळा तापवून ६५ वेळा चटके दिल्याचा धक्कादायक आणि तेवढाच संतापजनक प्रकार उघडकीस आल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्राचे समाजमन सुन्न करणारी ही घटना असून यावरून सर्वत्र संताप व्यक्त केला जात आहे.
22 दिवसांचं बाळ आजारी पडल्याने घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी विळा तापवून अक्षरक्ष:65 वेळा बाळाच्या पोटावर डागण्या दिल्याची धक्कादायक घटना घडलीय आहे. या प्रकारामुळे बाळाची प्रकृती बिघडल्याने त्याला नातेवाईकांनी सिमोरीवरून हतरू प्राथमिक आरोग्य केंद्रात आणले .त्यानंतर तिथून अचलपूरला नेले . आता अखेर अमरावतीमध्ये डफरीन रुग्णालयात बाळाला उपचारासाठी दाखल करण्यात आले .अंधश्रद्धेमुळे कुटुंबानं मुलाला डॉक्टरकडे नेण्याऐवजी त्याला गरम लोखंडी रॉडने चटके दिले. कुटुंबाला वाटलं, असं केल्यानं मूल बरं होईल, पण त्याची तब्बेत आणखीच बिघडली.
सिमोरी गावातील रहिवासी बेबी उर्फ फुलवंती राजू अधिकारी यांना २२ दिवसांचे बाळ आहे. बाळ आजारी पडल्याचे कळताच घरगुती उपाय म्हणून नातेवाईकांनी बाळाच्या पोटावर विळा गरम करून 65 वेळा चटतके दिले. त्यामुळे बाळाची प्रकृती आणखी बिघडली.त्यानंतर बाळाला हतरू येथून अचलपूरला आणि नंतर अमरावती येथील डफरीन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आला आहे .या घटनेची माहिती उघड झाल्याने मोठी खळबळ उडाली असून बाळाची प्रकृती चिंताजनक असल्याचं कळतंय
मेळघाटमधील त्या बाळाला श्वास घेण्यास त्रास होत होता, म्हणून डॉक्टरांनी त्याला अमरावती येथे आणले आणि जिल्हा स्त्रीरोग रुग्णालयात याची माहिती दिली. बाळ २१ दिवसांचे आहे. त्याला श्वासनाचा त्रास होत आहे, म्हणून त्याला अमरावती जिल्हा स्त्रीरोग रुग्णालयात उपचारासाठी नागपूरला पाठवता येईल. श्वास घेण्यास त्रास होत असल्याने त्याच्या कुटुंब सदस्यांनी पोटाला चटके दिले असतील पण चटके गंभीर नसून श्वास घेता येत नाही ती मूळ समस्या आहे. असेही त्यांनी सांगितले.
मेळघाटमध्ये आरोग्य सेवा प्रणालींवर कोट्यवधी रुपये खर्च केले जातात परंतु कुपोषण आणि बालमृत्यू रोखण्यात विभागाला पूर्णपणे अपयश आले आहे. कधीकधी रुग्णवाहिका उपलब्ध नसतात, गर्भवती महिला मृत्युमुखी पडतात, अज्ञान आणि अंधश्रद्धेमुळे जीव वाचवण्यासाठी घरगुती पद्धतींचा अवलंब केला जात आहे, हीच खरी समस्या आहे. अधिकृत आकडेवारीनुसार, मार्च 2020 ते सप्टेंबर 2024 पर्यंत मेळघाटात 818 बालमृत्यू आणि 24 मातामृत्यू झाले आहेत . मेळघाटाच्या अतिदुर्गम भागातील सिमोरी गावात घडलेल्या या प्रकाराने पुन्हा एकदा या साऱ्या प्रकारावर लक्ष वेधले गेले आहे .