crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
पुण्यातील कोथरूडमध्ये गेल्या आठवड्याभरात निलेश घायवळ याच्या गुंडांनी गोळीबार केला होता. एका नागरिकावर गोळीबार पण केला होता. ते प्रकरण मिटत नाही तो पर्यंत एका सोसायटीत दोन जणांनी हातात शस्त्र घेवून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. पहाटे ५ च्या सुमारासच ही घटना घडली आहे. एका सोसायटीत दोन जण घुसले आणि त्यांच्या हातात काहीतरी होत त्यामुळे भीतीच वातावरण निर्माण झाल आहे.
पोलीस काय म्हणाले ?
पुणे पोलिसांच्या माहितीनुसार हे दोघे जण चोरी करण्यासाठी सोसायटीत घुसले होते. त्यांच्या हातात पिस्तुल नव्हते तर लाइटर होत. ते सीसीटीव्हीमध्ये पिस्तुल सारखे दिसत आहे. मात्र चोरी करण्याच्या उद्देशाने ते आतमध्ये घुसले होते. यांचा कॅमेऱ्याच्या मदतीने शोध घेतला जात आहे. सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून आता कारवाई करण्याची मागणी केली जात आहे. कोथरूडसारख्या उच्च भू सोसायट्यामध्ये हा प्रकार होत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
कोथरूडमध्ये आठवड्यात दोन गुन्हेगारीच्या घटना
कोथरूड हे सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षित असा भाग समजला जातो. मात्र गेल्या आठवड्यात झालेल्या दोन मोठ्या घटनांनी कोथरूड हादरून गेल आहे. निलेश घायवळ टोळीच्या गुंडांनी रस्त्यावर उभ असलेल्या नागरिकावर गोळीबार आणि कोयता हल्ला केला. तर आता सोसायटीत घुसून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला. एक रात्र आणि एक पहाटे अशा दोन घटनांनी कोथरूड हादरल आहे.
पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार सातत्याने सांगत आहेत. आम्ही पुण्यात गुन्हेगारी करणाऱ्यांना सोडणार नाही. मात्र गुंड पोलिसांना जुमानायला तयार नाहीत. कारवाई करून पण गुन्हेगारीच्या घटना वाढतच आहेत. यावर आता पुणे पोलीस कसा अटकाव आणतात हे पाहावे लागेल. मात्र या प्रकरणात गुन्हेगारांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
पुणे विभागातील धरणे ओसंडून वाहिली; धरणांमध्ये 92 टक्के पाणीसाठा उपलब्ध
दमदार पाऊस कोसळल्याने अनेक धरणे जुलै महिन्यामध्येच भरली होती. त्यानंतर झालेल्या मुसळधार पावसामुळे आता धरणे ओसंडून वाहू लागली आहेत. पुणे विभागात सुमारे 720 लहान मोठी धरणे असून, या धरणांमध्ये सुमारे 92 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. दरम्यान, गेल्यावर्षी याच दिवशी पुणे विभागातील पाणीसाठा ४९३ .८१ टीएमसी होता. मात्र, यावर्षी तो पाणीसाठा सुमारे तीन टक्क्यांनी वाढल्याचे जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.