Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे यांचा समावेश आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 24, 2026 | 05:33 PM
सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

सुषमा अंधारे, रूपाली पाटील ठोंबरे यांच्यासह 19 जणांविरोधात गुन्हा दाखल; नेमकं प्रकरण काय?

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून मोठी बातमी समोर आली आहे. राज्य महिला आयोगाच्या माजी अध्यक्षा आणि राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली चाकणकर यांची बदनामी केल्याप्रकरणी 19 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात राष्ट्रवादीच्या नेत्या रुपाली ठोंबरे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे, अभिनेत्री दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे यांच्यासह इतरांचा समावेश आहे. रुपाली चाकणकर यांच्याकडून काही दिवसांपूर्वी पुण्यातील शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांकडून आज गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांमधे रुपाली ठोंबरे, सुषमा अंधारे, दिपाली सय्यद, संगीता तिवारी, आशा मिरगे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सोशल मीडियाचे पदाधिकारी योगेश सावंत, मोहसीन शेख आणि महादेव बालगुडे यांचा समावेश आहे.

रुपाली चाकणकर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, नाशिकच्या ईशान्येश्वर महादेव मंदिराचे अध्यक्ष अशोक एकनाथ खरात यांच्याशी त्यांची 9 वर्षांपूर्वी एका सामाजिक कार्यक्रमात ओळख झाली होती. मंदिराच्या धार्मिक कार्यक्रमानिमित्त त्या तेथे जात होत्या. 18 मार्च 2026 रोजी खरात यांना बलात्काराच्या गुन्ह्यात अटक झाल्याचे टीव्ही व प्रसार माध्यमांमधून समजल्यानंतर, त्यांच्यासोबतच्या सार्वजनिक कार्यक्रमातील फोटो-व्हिडिओ वापरून आपल्यावर असंबद्ध आरोप सुरू झाल्याचा दावा चाकणकर यांनी केला आहे.

20 मार्च 2026 रोजी सोशल मीडिया तपासताना त्यांना सुमारे 19 फेसबुक / इंस्टा / युट्यूब अकाउंटवरून बदनामीकारक, अश्लील आणि धमकीवजा पोस्ट टाकल्याचे आढळले. या प्रकरणी त्यांनी – संगिता तिवारी, अॅड. अशोक बेदरे, अश्विनी खाडे, महादेव बालगुडे, हनुमंत गलगटे, वर्षा कांबळे, राजश्री सर्मींदर, गणेश लोखंडे, हेमा पिंगळे, रंजना देशमुख, लॉजिकल सिधान्त, रुपाली पाटील ठोंबरे, सुषमा अंधारे, योगेश सावंत, दिपाली सय्यद, डॉ. आशा मिरगे आणि मोहसीन शेख यांची नावे तक्रारीत नमूद केली आहेत. त्यांनी केलेल्या पोस्टवर मिलिंद मारुती गोरे, सपना नंदकिशोर राऊत आणि इतर अनेकांनी लैंगिक, अश्लील आणि अपमानास्पद कमेंट करून विनयभंग व मानहानी केल्याचा आरोपही फिर्यादीत आहे. पुरावा म्हणून त्यांनी स्क्रीनशॉट आणि पोस्टचे पुरावे पोलिसांना सादर केले असून, मानसिक त्रास आणि सामाजिक मानहानी झाल्याचे म्हटले आहे. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

हे सुद्धा वाचा : दाभरूळ फाट्यावर भीषण अपघात, खाजगी बसची ट्रकला धडक; जखमींचा आकडाही समोर

Web Title: A case has been registered against 19 individuals including sushma andhare and rupali patil

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 24, 2026 | 05:33 PM

Topics:  

  • pune news
  • rupali chakankar
  • sushma andhare

संबंधित बातम्या

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान
1

गणेशोत्सवातील चोख कामगिरीची दखल; विनायक नवयुग मित्र मंडळ ट्रस्टकडून डेक्कन जिमखाना पोलिसांचा सन्मान

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’
2

Pradeep Purnekar Murder Case : सुषमा अंधारेंनी मीनाक्षी शिंदेंवर थेट सवाल केले उपस्थित, ‘पाच कोटींचा व्यवहार, 15 दिवसांपासून रेकी’

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा
3

पगार न दिल्याने नगरपालिका कर्मचाऱ्याची आत्महत्येची धमकी; व्हिडिओ व्हायरल होताच काही मिनिटात पगार जमा

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित
4

पुण्यात अन्न व औषध प्रशासनाची धडक कारवाई; 17 अन्न परवाने निलंबित

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.