Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 2 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखलोली दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात एका व्यक्तीला काही लोक जबरदस्ती चारचाकी वाहनात कोंबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. याप्रकरणी आता पोलिसांनी आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 16, 2026 | 12:47 PM
चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न भोवला! तिघांविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

अंबरनाथ : राज्यासह देशभरात गुन्हेगारी वाढली असून, दररोज, खून, खुनाचा प्रयत्न, लुटमार यासारख्या घटना घडत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. चिखलोली न्यायालय परिसरात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मागील आठवड्यात ६ ऑगस्ट रोजी चिखलोली दिवाणी व फौजदारी न्यायालय परिसरात एका व्यक्तीला काही लोक जबरदस्ती चारचाकी वाहनात कोंबण्याचा प्रयत्न करत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला होता. न्यायालय परिसरातील आरडाओरडा ऐकूण एका जेष्ठ वकिलाने तात्काळ धाव घेत त्या व्यक्तीला अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुखरूप सोडवले होते. या घटनेचा थरारक व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला होता.

न्यायालय परिसरात घडलेल्या या प्रकारानंतर शिवाजीनगर पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली. दिवसाढवळ्या न्यायालयाच्या परिसरात घडलेल्या या प्रकारामुळे न्यायालय परिसरातील सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. अखेर या प्रकरणी अपहरणाचा प्रयत्न झालेले फिर्यादी दिलीप पवार यांच्या तक्रारीवरून शिवाजीनगर पोलिसांनी आरोपी सिराज गाझी, अन्वर शेख आणि एका अज्ञात व्यक्ती विरोधात अपहरणाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिलीप पवार हे कुळगाव पोलिस ठाण्यात दाखल गुन्ह्याच्या सुनावणीकामी चिखलोली न्यायालयात आले होते. त्यांच्या विरोधात दाखल गुन्ह्यातील पैसे परत केले नाही म्हणून आरोपींनी चिखलोली न्यायालय परिसरातून फिर्यादी दिलीप पवार यांचे अपहरण करण्याचा प्रयत्न केला तसेच त्यांचा भाऊ संतोष यांना शिवीगाळ केली. असे फिर्यादीत नमूद आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास शिवाजीनगर पोलिस ठाण्याचे पोलिस उपनिरीक्षक स्वप्नील चौरे करत आहेत.

हे सुद्धा वाचा : उद्योगमंत्र्यांनी सुट्टीच्य दिवशी नव्हे, तर कामाच्या दिवशी चाकणमध्ये यावे; रोहीत पवारांचा हल्लाबोल

दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याचा राग अनावर

पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. दारू पिण्यास पैसे न दिल्याने तरुणाच्या डोक्यात दगड घातल्याची घटना गुलटेकडीतील डायसप्लॉट परिसरात घडली आहे. यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. दरम्यान खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी पोलिसांनी एकाला अटक केली. राजू शिवलिंगप्पा इककळकी (वय ३०, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी प्रेम संजय काळे (वय २८, रा. डायसप्लाॅट, गुलटेकडी) याला अटक करण्यात आली आहे. याबाबत इककळकी याची आई लक्ष्मीबाई (वय ५८) यांनी स्वारगेट पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

Web Title: A case has been registered against three individuals for attempted kidnapping

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 16, 2026 | 12:47 PM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news

संबंधित बातम्या

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या
1

पोलिसाची टोपी घालून दादागिरी; तोतया पोलिसाला शिवाजीनगर पोलिसांनी ठोकल्या बेड्या

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…
2

Kharadi Kidnapping Case: खराडी गावठाणातून तरुणाचे अपहरण; कारमध्ये जबरदस्तीने नेले अन्…

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…
3

एकाच पोलिस ठाण्यातील दोन पोलिस एसीबीच्या जाळ्यात, एकाला लाच घेताना रंगेहात पकडले; तर दुसरा…

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट
4

Purnekar Update: पूर्णेकर हत्या प्रकरणात अचानक ‘महिला कनेक्शन’; ३ महिला पोलिसांच्या ताब्यात, तपासाला नवा ट्विस्ट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.