Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने नागरिकाची फसवणूक; तब्बल लाखोे रुपयांना घातला गंडा

बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 04, 2025 | 03:59 PM
बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने नागरिकाची फसवणूक; तब्बल लाखोे रुपयांना घातला गंडा

बँक खाते अद्ययावत करण्याच्या बहाण्याने नागरिकाची फसवणूक; तब्बल लाखोे रुपयांना घातला गंडा

Follow Us
Follow Us:

पुणे : राज्यात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता एक मोठी बातमी समोर आली आहे. बँक खाते अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका ज्येष्ठ नागरिकाला तीन लाख रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी सायबर चोरट्यांवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने वारजे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार, चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार कर्वेनगर भागातील शाहू कॉलनीत राहतात. ते सेवानिवृत्त आहेत. सायबर चोरट्यांनी ज्येष्ठाच्या मोबाइलवर संपर्क साधला. बँकेतून बोलत असल्याची बतावणी त्यांच्याकडे केली. बँक खाते अपडेट करण्याचे काम सुरू आहे. बँक खाते अपडेट न केल्यास खाते बंद पडेल, अशी बतावणी केली. त्यानंतर चोरट्यांनी त्यांच्याकडून बँक खात्याची गोपनीय माहिती घेतली. बँक खात्याच्या माहितीचा गैरवापर करुन चोरट्यांनी ज्येष्ठाच्या खात्यातून २ लाख ९८ हजार ९९८ रुपये ऑनलाइन पद्धतीने खात्यात हस्तांतरित केले. खात्यातून रक्कम दुसऱ्याच खात्यात हस्तांतरित झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक विश्वनाथ काईंगडे अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : वाहन चोरणाऱ्या अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यात; गुन्हे शाखेच्या दरोडा व वाहन चोरी पथकाची कारवाई

कोथरुडमधील व्यक्तीला ३० लाखाला गंडा

कोथरूड भागातील एका नोकरदार व्यक्तीला सायबर चोरट्यांनी टास्क तसेच युट्यूबला लाईक्स मिळवून देण्यासाठी तसेच ऑनलाइन पद्धतीने कामाची संधी (ऑनलाइन टास्क) असल्याच्या आमिषाने २९ लाख ६३ हजार रुपयांना गंडा घातला आहे. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांवर कोथरुड पोलिसांनी गुन्हा दाखल केला. याबाबत ५३ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप देशमाने तपास करत आहेत.

लष्करात भरती करण्याच्या बहाण्याने फसवणूक

महाराष्ट्रातील मुलांना लष्करात भरती करण्याचे आमिष दाखवून प्रत्येक उमेदवाराकडून प्रत्येकी तीन लाख रुपये घेऊन लष्करात नोकरी लावतो म्हणून फसवणूक करणाऱ्या तोतया लष्करी जवानावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मिलिटरी इंटेलिजन्स आणि वन गार्डन पोलीस यांनी ही संयुक्त कारवाई केली आहे. नितीन बालाजी सुर्यवंशी (रा.मु. पो. हेळंब, तालुका देवणी, जिल्हा लातुर) असे बोगस जवानांचे नाव आहे. याबाबत भरत रमेश महाटे (वय 23, रा. नागराळ, तालुका – मुखेड, जिल्हा नांदेड गोंधळेनगर, हडपसर) यांनी फिर्याद दिली आहे. हा प्रकार 13 ऑगस्ट 2024 रोजी ते आज रोजी पर्यंत सदर्न कमांड कैंटीन व सब एरीया कैंटीन कॅप परिसर येथे घडला आहे. यामध्ये फिर्यादीची 1 लाख 75 हजारांची फसवणूक करण्यात आली.

Web Title: A case of fraud of a senior citizen has come to light in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 04, 2025 | 03:51 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Froud
  • maharashtra
  • Pune Crime
  • Pune Police

संबंधित बातम्या

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?
1

डेक्कन जिमखाना भागातील हॉटेलसमोर तरुणाच्या खुनाचा प्रयत्न, तरुणींसह तिघे अटकेत; नेमकं काय घडलं?

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या
2

व्यवसायासाठी पैसे न दिल्याने चुलतीवर चाकूने हल्ला; खडक पोलिसांनी दोघांना ठोकल्या बेड्या

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण
3

‘प्लीज काळी जादू करु नका’, चोराने घराबाहेर ठेवले १९ लाख रुपये… चिठ्ठीमध्ये लिहिली अशी गोष्ट; अनोखं आहे संपूर्ण प्रकरण

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…
4

पिस्तूल बाळगणारे गुंड गजाआड, खडकी रेल्वे स्थानकात पोलिसांची कारवाई; तब्बल…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.