Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 1 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मुलीला गच्चीवर घेऊन गेला अन्…; पुण्यातील संतापजनक प्रकार

शिकवणीस आलेल्य शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Dec 06, 2024 | 04:25 PM
मुलीला गच्चीवर घेऊन गेला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

मुलीला गच्चीवर घेऊन गेला अन्...; पुण्यातील संतापजनक प्रकार

Follow Us
Follow Us:

पुणे : पुण्यातून एक संतापजनक बातमी समोर आली आहे. शिकवणीस आलेल्य शाळकरी मुलीशी अल्पवयीन मुलाने अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी येरवडा पोलिसांनी अल्पवयीनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याबाबत मुलीच्या ३५ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार, १४ वर्षीय मुलावर गुन्हा दाखल करण्यात आला.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार महिलेची आठ वर्षाची मुलगी येरवडा भागात एका महिलेकडे खासगी शिकवणीस जाते. या शिक्षिकेचा १४ वर्षीय चुलतभाऊ तेथे राहायला आहे. आठवड्यापूर्वी शिक्षिका घरी नव्हती. तेव्हा मुलाने मुलीला गच्चीवर नेऊन तिच्याशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. नंतर मुलगी दोन दिवसांपूर्वी शिकवणीसाठी घरी आली. तेव्हाही शिक्षिका घरी नव्हती. त्यावेळी मुलाने मुलीशी अश्लील कृत्य करण्याचा प्रयत्न केला. घाबरलेल्या मुलीने या घटनेची माहिती आईला दिली.

हे सुद्धा वाचा : बिडी पिताना लुंगीला लागली आग; ज्येष्ठाचा भाजून मृत्यू

चौकशीत शिक्षिकेच्या १४ वर्षीय चुलतभावाने मुलीबरोबर दोनवेळा अश्लील कृत्य केल्याचा प्रकार उघडकीस आला. मुलीच्या आईने याबाबत पोलिसांकडे तक्रार दिली आहे. १४ वर्षीय मुलाविरुद्ध पोलिसांनी बालकांचे लैंगिक अत्याचारांपासून संरक्षण कायद्यान्वये (पोक्सो) गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलीस निरीक्षक प्रियांका देवकर तपास करत आहेत.

राज्यात अत्याचाराचे प्रमाण वाढले

राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसाखाली फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

खामगाव सनी पॅलेसस्थित आशिष गीते (वय 26) याने एका 24 वर्षीय विवाहितेचा फेसबुकवरील ओळखीचा फायदा घेत तिला बोलाविले व तिला मोटरसायकलवर बसवून शेगाव रोडने सनशाईन कॅफेवर नेले. त्या ठिकाणी तुझ्यासोबत फारकती झाल्यानंतर लग्न करेन, असे आश्वासन देऊन शारीरिक संबंध प्रस्थापित केले. या प्रकारानंतर ‘तू माझ्यासोबत फोनवर बोलू नको’, असे म्हणून पीडित विवाहितेचा नंबर ब्लॉकमध्ये टाकला. अशा तक्रारीवरून आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी विनोद ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली केला जात आहे.

अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अल्पवयीन मुलीला धमकावून तिच्यावर अत्याचार करणाऱ्या युवकावर येरवडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याबाबत पीडित मुलीच्या ३५ वर्षीय आईने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानूसार, १८ वर्षीय तरुणावर गुन्हा नोंद केला आहे. आरोपी व पीडित मुलगी एकाच परिसरात राहण्यास आहेत. त्याने मुलीला धमकावून तिच्यावर नातेवाईकाच्या घरी नेहून अत्याचार केला. तिला धमकी देत मारहाण केली. घाबरलेल्या मुलीने याप्रकाराची माहिती तिच्या आईला दिली. सहायक निरीक्षक प्रियांका देवकर अधिक तपास करत आहेत.

Web Title: A case of indecent act with a girl who came for tuition has come to light nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 06, 2024 | 04:25 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड
1

Mumbai Crime : मालाडमधील डे-केअर सेंटरमध्ये ४ वर्षांपासून ठेवला होता मृतदेह! संशयास्पद पार्सलमुळे फुटला भांडाफोड

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले
2

Baramati Chain Snatching: दुचाकीवरुन भामटे आले; किराणा दुकानातून महिलेच्या गळ्यातील सोन्याचे गंठण लांबवले

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास
3

Devendra Fadnavis: तरुणांचे संशोधन महाराष्ट्राला जगाचे ‘इनोव्हेशन हब’ बनवेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विश्वास

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र
4

Ambernath Green Data Center: अंबरनाथमध्ये ग्रीन डेटा सेंटरला सांडपाणी देण्यास मनसेचा तीव्र विरोध; नगरपरिषदेला दिले पत्र

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.