Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या ‘त्या’ नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 01:17 PM
राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

राजकीय वर्तुळात खळबळ! राष्ट्रवादीच्या 'त्या' नेत्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल

Follow Us
Follow Us:

अहिल्यानगर : राज्यासह देशभरात महिलांवरील अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली असून, वाढत्या घटनांमुळे महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. अशातच आता अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरात अल्पवयीन मुलीचा विनयभंग झाल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हा राष्ट्रवादी काँग्रेसशी संबंधित नेता असल्याची माहिती समोर आली आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजण्याच्या सुमारास घडली आहे. पिंकसिटीजवळील परिसरात ही घटना घडल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.या प्रकरणात पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथील रहिवासी विक्रमसिंह बबनराव कळमकर याच्याविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.

फिर्यादी ३३ वर्षीय महिला असून त्या घरकाम करतात. त्या पारनेर तालुक्यातील रहिवासी आहेत. घटनेच्या वेळी त्यांची अल्पवयीन मुलगी घरात एकटी होती. याच संधीचा फायदा घेत आरोपीने घरात प्रवेश करून मुलीसोबत गैरवर्तन केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेबद्दल कोणाला काही सांगू नये, अशी धमकी दिल्याचाही आरोप आहे. सुरुवातीला हा प्रकार पारनेर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता. मात्र घटनास्थळ अहिल्यानगर शहराच्या हद्दीत येत असल्याने झिरो नंबरने गुन्हा वर्ग करण्यात आला. त्यानंतर कोतवाली पोलीस ठाण्यात त्याची नोंद करण्यात आली.

हे सुद्धा वाचा : लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपअधीक्षक डॉ. दिलीप टिपरसे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाची माहिती घेतली असून पुढील तपास सुरू आहे. या घटनेमुळे केडगाव परिसरात खळबळ उडाली आहे. एका राजकीय नेत्यावरच असे गंभीर आरोप झाल्याने या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू आहे.

हे सुद्धा वाचा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही घटना कुठे आणि कधी घडली?

    Ans: ही घटना १६ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता अहिल्यानगर शहरातील केडगाव परिसरातील पिंकसिटीजवळ घडली.

  • Que: या प्रकरणात कोणाविरुद्ध आणि कोणत्या कलमांखाली गुन्हा दाखल झाला आहे?

    Ans: पारनेर तालुक्यातील कळमकरवाडी येथील विक्रमसिंह बबनराव कळमकर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. त्याच्यावर भारतीय न्याय संहिता २०२३ चे कलम ७४ सह पोक्सो कायद्यानुसार गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

  • Que: हा गुन्हा कोतवाली पोलिसात कसा दाखल झाला?

    Ans: सुरुवातीला हा प्रकार पारनेर पोलीस ठाण्यात नोंदवला गेला होता. मात्र घटनास्थळ अहिल्यानगर हद्दीत येत असल्याने झिरो नंबरने गुन्हा वर्ग करून कोतवाली पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली. सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: A case of outraging a girlss modesty has been registered against an ncp leader in ahilyanagar nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 01:17 PM

Topics:  

  • Ajit Pawar NCP
  • Arrested News
  • crime news

संबंधित बातम्या

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका
1

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक
2

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक
3

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना
4

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.