Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

लातूर शहरातील विमानतळ रोड परिसरात असलेल्या गोल्डन लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणी तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 12:38 PM
लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

लातूरमध्ये गोल्डन लॉजवरील देहव्यवसायाचा पर्दाफाश; पोलिसांच्या छाप्यात तीन महिलांची सुटका

Follow Us
Follow Us:
  • गोल्डन लॉजमधील देहव्यवसायाचा पोलिसांकडून पर्दाफाश
  • तीन महिलांची सुटका; तीन आरोपींवर गुन्हा दाखल
  • ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त
लातूर : लातूर शहरातील विमानतळ रोड परिसरात असलेल्या गोल्डन लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने केलेल्या कारवाईत तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. घटनास्थळावरून रोख रक्कम, मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

 

२० नोव्हेंबर रोजी सायंकाळी ६.२५ वाजण्याच्या सुमारास गोल्डन लॉज येथे अनैतिक देहव्यवसाय सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाच्या पथकाने छापा टाकून कारवाई केली. या प्रकरणात संगीता ऊर्फ स्वाती विभीषण बोंदर (वय ४०), सुदर्शन विभीषण बोंदर (वय २५, दोघे रा. स्वराज्य नगर, बार्शी रोड, लातूर) आणि दत्ता लिंबाजी पवार (वय ४७, रा. विवेकानंद चौक, लातूर) यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या फिर्यादीनुसार, आरोपींनी संगनमत करून आर्थिक फायद्यासाठी बाहेरून महिलांना गोल्डन लॉज येथे बोलावून घेतले होते. पैशांचे आमिष दाखवून शहरातील व परिसरातील पुरुष ग्राहकांना लॉजवर बोलावले जात होते. महिलांकडून देहव्यवसाय करवून घेऊन त्यातून मिळणाऱ्या पैशांवर आरोपी आपली उपजीविका भागवत असल्याचे तपासात समोर आले आहे.

या कारवाईत पश्चिम बंगालमधील एका महिलेसह तीन महिलांची सुटका करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर सूर्यवंशी, एमआयडीसी पोलीस ठाणे, लातूर करीत असून, पोलीस अंमलदार दयानंद आरदवाड त्यांना सहकार्य करीत आहेत. महिला शोषण आणि मानवी तस्करीसारख्या गंभीर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी पोलिसांकडून अवैध व्यवसायांवर लक्ष ठेवून कारवाई केली जात आहे.

मोबाईल, रोख रक्कम व अन्य साहित्य जप्त

कारवाईदरम्यान देहव्यवसायातून मिळालेली ५०० रुपयांच्या तीन नोटा, एकूण १ हजार ५०० रुपये, कंडोमची पाकिटे, विवो कंपनीचे FP तीन मोबाईल आणि मोटोरोलाचा एक मोबाईल जप्त करण्यात आला. मोबाईलची अंदाजे किंमत ४० हजार रुपये असून, अन्य साहित्य व रोख रकमेसह एकूण ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक ८५०/२०२६ अन्वये भारतीय न्याय संहिता कलम १४३ (२), १४३(३), ३(५) तसेच अनैतिक व्यवसाय प्रतिबंध अधिनियम १९५६ च्या कलम ३, ४ व ५ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे सुद्धा वाचा : एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

तीन आरोपींवर पोलिसात गुन्हा दाखल

ही कारवाई पोलीस अधीक्षक, अप्पर पोलीस अधीक्षक आणि पोलीस उपअधीक्षक आर्थिक गुन्हे शाखा यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्ष निरीक्षक समाधान चवरे (आगुशा, लातूर), सहाय्यक पोलीस निरीक्षक अजिनाथ पाटील, पोलीस अंमलदार सदानंद योगी, महिला पोलीस अंमलदार सुधामती वंगे, लता गिरी आणि सचिन मुंडे यांनी केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: लातूरमध्ये पोलिसांनी कुठे देहव्यवसायाचा पर्दाफाश केला?

    Ans: लातूर शहरातील विमानतळ रोड परिसरातील गोल्डन लॉजमध्ये सुरू असलेल्या अनैतिक देहव्यवसायाचा पोलिसांनी छापा टाकून पर्दाफाश केला.

  • Que: या कारवाईत किती महिलांची सुटका करण्यात आली आणि किती आरोपींवर गुन्हा दाखल झाला?

    Ans: पोलिसांनी तीन महिलांची सुटका केली असून, संगीता ऊर्फ स्वाती बोंदर, सुदर्शन बोंदर आणि दत्ता पवार या तीन आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

  • Que: पोलिसांनी कारवाईत किती रुपयांचा मुद्देमाल जप्त केला?

    Ans: पोलिसांनी रोख रक्कम, विवो व मोटोरोलाचे मोबाईल फोन आणि अन्य साहित्य असा एकूण ४१ हजार ५४० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

Web Title: The police have carried out a major operation by raiding the golden lodge in latur nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:37 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Latur Crime

संबंधित बातम्या

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक
1

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक
2

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना
3

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक
4

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.