Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार करणे आणि तिच्याकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपातील आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करून दुबईतून भारतात आणले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 11:56 AM
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

Follow Us
Follow Us:
  • आरोपीला दुबईतून भारतात आणले
  • लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार
  • इंटरपोलच्या मदतीने रेड कॉर्नर नोटीस जारी
छत्रपती संभाजीनगर : लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार करणे आणि तिच्याकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपातील आरोपीला छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर कारवाई करून दुबईतून भारतात आणले आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर भारतातून फरार होऊन विदेशात लपलेल्या आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी इंटरपोल आणि केंद्रीय तपास यंत्रणांची मदत घेतली. अखेर १९ नोव्हेंबर २०२६ रोजी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथे आरोपीला ताब्यात घेऊन प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे. महिला अत्याचाराच्या संवेदनशील प्रकरणात शहर पोलिसांनी केलेली ही कारवाई महत्त्वपूर्ण मानली जात आहे.

 

शहराचे पोलीस उपायुक्त पंकज अतुलकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्य आरोपी मोहम्मद माजीन मोहम्मद अब्दुल रशीद याच्याविरुद्ध तक्रारदार महिलेने लग्नाचे आमिष दाखवून शारीरिक संबंध प्रस्थापित करणे आणि आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याची तक्रार दिली होती. आरोपीने अन्य एका महिला साक्षीदारालाही अशाच प्रकारे जाळ्यात ओढून तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित करत फसवणूक केली होती. या तक्रारीवरून सिटी चौक पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ४१२/२०२५ दाखल करण्यात आला. या प्रकरणात भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये कारवाई करण्यात आली.

गुन्हा दाखल होताच विदेशात पलायन

गुन्हा दाखल झाल्यानंतर मुख्य आरोपी भारतातून फरार होऊन विदेशात गेला होता. तो विदेशात लपून बसल्याने त्याला अटक करण्याचे पोलिसांसमोर आव्हान होते. पोलिसांनी तांत्रिक माहितीच्या आधारे त्याचा शोध सुरू केला. तपासादरम्यान आरोपी संयुक्त अरब अमिरातीमध्ये असल्याची माहिती समोर आली. त्यानंतर त्याला भारतात परत आणण्यासाठी कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली. यासाठी पोलिसांनी न्यायालयात भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम ३३५ अन्वये आवश्यक कार्यवाही केली.

इंटरपोलच्या मदतीने रेड कॉर्नर नोटीस 

विदेशात लपलेल्या आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांनी सर्वप्रथम न्यायालयाकडून अटक वॉरंट प्राप्त केले. त्यानंतर इंटरपोल इंडिया आणि गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीआयडी) मदतीने आरोपीविरुद्ध लुकआउट नोटीस जारी करण्यात आली. तसेच रेड कॉर्नर नोटीसही प्रसिद्ध करण्यात आली. त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर आरोपीचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेण्याचा मार्ग मोकळा झाला.

हे सुद्धा वाचा : एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

गृह, परराष्ट्र मंत्रालयाच्या समन्वयातून कारवाई

आरोपीला भारतात आणण्यासाठी केंद्रीय गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय तसेच संयुक्त अरब अमिरातीतील विविध सरकारी यंत्रणांशी समन्वय साधण्यात आला. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातील प्रत्यार्पणविषयक प्रक्रियेनुसार १९ नोव्हेंबर रोजी दुबई येथे आरोपीला ताब्यात घेऊन भारतात परत आणण्याची कार्यवाही पूर्ण करण्यात आली. यासाठी छत्रपती संभाजीनगर पोलिसांचे विशेष पथक दुबईला पाठविण्यात आले होते. या पथकाने संबंधित यंत्रणांशी समन्वय साधत संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरीत्या पूर्ण केली.

💡

Frequently Asked Questions

  • Que: आरोपीला कोणत्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे?

    Ans: लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर शारीरिक अत्याचार करणे आणि तिच्याकडून आठ लाख रुपये घेऊन फसवणूक केल्याच्या आरोपाखाली मोहम्मद माजीन मोहम्मद अब्दुल रशीद याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • Que: फरार आरोपीला पोलिसांनी कुठून आणि कधी ताब्यात घेतले?

    Ans: छत्रपती संभाजीनगर पोलिसांनी इंटरपोल आणि केंद्रीय तपास यंत्रणांच्या मदतीने १९ नोव्हेंबर २०२६ रोजी संयुक्त अरब अमिरातीतील दुबई येथून आरोपीला ताब्यात घेऊन भारतात आणले.

  • Que: आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: पोलिसांनी न्यायालयाकडून अटक वॉरंट मिळवले. तसेच इंटरपोल इंडिया आणि सीआयडीच्या मदतीने लुकआउट नोटीस व रेड कॉर्नर नोटीस जारी केली. गृह मंत्रालय, परराष्ट्र मंत्रालय आणि दुबईतील संबंधित यंत्रणांच्या समन्वयातून प्रत्यार्पणाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

Web Title: The police traveled to dubai and arrested the accused who had defrauded a woman nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Fraud Case

संबंधित बातम्या

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना
1

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक
2

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट
3

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल
4

धक्कादायक ! UPSC क्लासेसच्या तक्रारी मागे घेण्यासाठी 10 लाखांची खंडणी; पुण्यातील विद्यार्थ्याविरुद्ध गुन्हा दाखल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.