Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 22 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

पंचवटीतील टकलेनगर परिसरात १८ वर्षीय वेदांत संतोष काळे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Nov 22, 2026 | 12:07 PM
वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

वेदांत काळे हत्या प्रकरणात मोठी कारवाई; पंचवटी पोलिसांकडून चार आरोपींना अटक

Follow Us
Follow Us:
  • वेदांत काळे हत्या प्रकरणी चौघांना अटक
  • आरोपींना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी
  • फरार आरोपींच्या शोधासाठी चार पथके रवाना
नाशिक : पंचवटीतील टकलेनगर परिसरात १८ वर्षीय वेदांत संतोष काळे याची धारदार शस्त्राने वार करून हत्या केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी चार संशयित आरोपींना अटक केली आहे. पियूष लोखंडे, गणेश रेणुके, अमोल माळोदे आणि पियूष लोट अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. शनिवारी (दि. २१) या चौघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

 

या हत्येच्या घटनेनंतर पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत संशयितांचा शोध सुरू केला होता. त्यानुसार चार आरोपींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. यातील गणेश रेणुके याला इगतपुरी येथून अटक करण्यात आली, तर पियूष लोखंडे, अमोल माळोदे आणि पियूष लोट या तिघांना शहरातून ताब्यात घेण्यात आले.

अन्य आरोपींचा शोध सुरू

या प्रकरणात आठ जणांसह अन्य साथीदारांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, हत्येतील अन्य संशयित आरोपी अद्याप फरार आहेत. त्यांना पकडण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार केली असून, ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी शोध घेत आहेत.

हे सुद्धा वाचा : एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

हत्येमागील कारण शोधण्याचे आव्हान

अटक करण्यात आलेल्या चारही आरोपींची पोलीस कोठडी मिळाल्यानंतर तपासाला वेग येण्याची शक्यता आहे. हत्येचा कट कसा रचण्यात आला, हल्ल्यात आणखी कोणाचा सहभाग होता, धारदार शस्त्रांचा वापर कोणी केला आणि हत्येमागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. पोलीस निरीक्षक सुधीर पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार, या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली असून, फरार संशयितांच्या शोधासाठी चार तपास पथके रवाना करण्यात आली आहेत. उर्वरित आरोपींना लवकरच अटक करण्यासाठी पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

हे सुद्धा वाचा : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

💡

Frequently Asked Questions

  • Que: वेदांत काळे हत्या प्रकरणात किती आरोपींना अटक करण्यात आली आहे?

    Ans: पंचवटी पोलिसांनी पियूष लोखंडे, गणेश रेणुके, अमोल माळोदे आणि पियूष लोट या चार संशयित आरोपींना अटक केली आहे.

  • Que: अटक केलेल्या आरोपींना न्यायालयाने किती दिवसांची पोलीस कोठडी सुनावली?

    Ans: शनिवारी (दि. २१) न्यायालयात हजर केले असता चारही आरोपींना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

  • Que: हत्येतील फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी काय कारवाई केली?

    Ans: फरार संशयित आरोपींचा शोध घेण्यासाठी पंचवटी पोलिसांनी चार स्वतंत्र तपास पथके तयार केली आहेत. ही पथके वेगवेगळ्या ठिकाणी आरोपींचा शोध घेत आहेत.

Web Title: The police have arrested four accused in the vedanta kale murder case nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 22, 2026 | 12:07 PM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक
1

लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार अन् आठ लाखांची फसवणूक; इंटरपोलच्या मदतीने आरोपीला दुबईतून अटक

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना
2

पार्टीच्या बहाण्याने 17 वर्षांच्या मुलीला बोलावले अन् दोन तरुणांनी मिळून…; मिरा रोड परिसरातील धक्कादायक घटना

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक
3

एटीएस अधिकारी असल्याचे सांगून अटकेची धमकी; पुण्यात निवृत्त शासकीय अधिकाऱ्याची पाच लाखांची फसवणूक

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट
4

लग्नाला सहा महिनेच झाले अन् पत्नीने पतीला संपवले; प्रियकरासोबत मिळून रचला हत्येचा कट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.