Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुडमधील नागरिकाची फसवणूक; तब्बल 23 लाखांना घातला गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Apr 20, 2025 | 06:20 PM
गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुडमधील नागरिकाची फसवणूक; तब्बल 23 लाखांना घातला गंडा

गुंतवणुकीच्या आमिषाने कोथरुडमधील नागरिकाची फसवणूक; तब्बल 23 लाखांना घातला गंडा

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : देशभरात फसवणुकीचे प्रमाण वाढले आहे. देशातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना दररोज उघडकीस येत असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठ नागरिकाची २३ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत ६८ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने अलंकार पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार ज्येष्ठ नागरिक कोथरूड भागात राहायला आहेत. त्यांच्या मोबाइलवर जानेवारी महिन्यात संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी दाखविले होते. त्यानुसार चोरट्यांच्या बँक खात्यात वेळोवेळी २३ लाख रुपये जमा केले. सुरुवातीला त्यांना परताव्याच्या स्वरुपात काही रक्कम दिली. नंतर चोरट्यांनी त्यांन परतावा दिला नाही, तसेच त्यांचे मोबाइल बंद केल्याचे लक्षात आले.

फसवणूक झाल्याचे उघडकीस आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक सुनीता रोकडे अधिक तपास करत आहेत. अशाच पद्धतीने चोरट्यांनी कोथरूड भागातील हॅप्पी कॉलनीत राहणाऱ्या एका ५६ वर्षीय नागरिकाची दोन लाख ८३ हजार रुपयांची फसवणूक केली आहे.

ऑनलाइन टास्कच्या आमिषाने महिलेची फसवणूक

गेल्या काही दिवसाखाली ऑनलाइन काम देण्याच्या आमिषाने महिलेची १० लाख २६ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली आहे. याप्रकरणी ४२ वर्षीय महिलेने सिंहगड रोड पोलिसांत तक्रार दिली आहे. तक्रारदार महिला नऱ्हे येथे राहते. सायबर चोरट्यांनी त्यांच्या मोबाइलवर संपर्क साधला. सोशल मिडीयावर पोस्ट, व्हिडीओ व ग्राफिक्स याला व्ह्यू मिळवून दिल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष दाखविले. चोरट्यांनी महिलेला प्रथम एक काम दिले. ते पुर्ण केल्यानंतर महिलेला सुरुवातीला पैसेही दिले. त्यामुळे महिलेचा विश्वास बसला. नंतर चोरट्यांनी महिलेला आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. महिलेने १० लाख २६ हजार रुपये गुंतवले. त्यानंतर चोरट्यांनी महिलेला परतावा न देता तिची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उत्तम भजनावळे तपास करत आहेत.

Web Title: A citizen from kothrud has been cheated with the lure of investment

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 20, 2025 | 06:20 PM

Topics:  

  • cmomaharashtra
  • crime news
  • Kothrud News
  • Pune Crime
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद
1

अवैध शस्त्रांविरुद्ध नांदेडमध्ये मोठी कारवाई; ७ अग्निशस्त्रे, ७६ जिवंत काडतुसे जप्त; १७ आरोपी जेरबंद

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी
2

Accident News : दिवे घाटात भीषण अपघातात बाप-लेकीचा मृत्यू; मुलगा गंभीर जखमी

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा
3

Mira Bhayander : रक्षक होतायत भक्षक ! वाहतूक पोलिसांकडूनच हप्त्याची मागणी; वरिष्ठ पोलीस निरीक्षकासह एपीआयवर गुन्हा

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार
4

Pune Crime: हुंड्यासाठी सुनेचा छळ; पिस्तुलाचा धाक दाखवत अमानवीय अत्याचार; पुण्यातील बड्या कुटुंबातील प्रकार

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.